Sonia Gandhi Discharge: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, रुग्णालयातून सुटका
Sonia Gandhi Discharge: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली. त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली होत्या. डोळ्यांवरील शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे. सोनिया गांधी यांना १०, जनपथ येथील त्यांच्या निवासस्थानी परतल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, शस्त्रक्रिया नियमित आणि नियोजित स्वरूपाची होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. शस्त्रक्रियेचे नेमके स्वरूप किंवा वैद्यकीय तपशील तात्काळ जाहीर करण्यात आलेले नाहीत. ७९ वर्षीय सोनिया गांधी गेल्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार घेत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च २०२६ मध्ये अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सर गंगाराम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि कन्या प्रियांका गांधी -वाड्रा ( Priyanka Gandhi Vadra) रुग्णालयात उपस्थित होते.
बातमी अपडेट होत आहे….






