GT Vs RCB Final Pitch Report (फोटो- ai gemini)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अन् गुजरात टायटन्स फायनलमध्ये भिडणार
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार महामुकाबला
31 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 GT Vs RCB Final At Ahmedabad: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. उद्या म्हणजेच 31 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स फायनलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघांना दुसऱ्यांदा आयपेल ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. हा सामना (IPL 2026) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टी कशी असणार हे जाणून घेऊयात.
क्वालिफायर 1 मध्ये आरसीबीने गुजरातचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. तर क्वालिफायर 2 मध्ये गुजरातने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये फायनलचा सामना होणार आहे. त्यामुळे उद्याचा सामना अत्यंत रोमांचक आणि हाय स्कोअरिंग होण्याची शक्यता आहे.
कसे असणार अहमदाबादचे पीच?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल समजली जाते. त्यामुळे उद्या या ठिकाणी हाय स्कोअरिंग सामना होण्याची शक्यता आहे. या मैदानावर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये फलंदाजांना चांगला फायदा मिळू शकतो. तर गोलंदाजांना चांगला स्विंग मिळू शकतो. या ठिकाणी दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करणे पसंत करू शकतो.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून देवदत्त पडीकल, वेंकटेश अय्यर, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, रासिख डार आणि कर्णधार रजत पाटीदार हे खेळाडू अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. तर गुजरात टायटन्सकडून कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, राशीद खान, साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर हे जबरदस्त फॉर्ममध्ये कामगिरी करत आहेत. त्यामुळे उद्याचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक आणि चुरशीचा होणार आहे यात शंका नाही.
RCB Vs GT Live scorecard: गुजरात टायटन्सने टॉस जिंकला; घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय
आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार.
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा.






