२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. (फोटो - सोशल मीडिया)
P. Chidambaram on PM Modi : मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पी चिदंबरम यांनी आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या दबावामुळे हल्ल्यानंतर कोणतीही कारवाई केली नसल्याचे कबुल केले. ऑपरेशन सिंदूरनंतर आलेल्या पी चिदंबरम यांच्या वक्तव्याची संपूर्ण देशामध्ये चर्चा झाली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हल्ल्याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. तसेच चिदंबरम यांच्या वक्चव्याचा खरपूस समाचार घेतला. यानंतर आता पुन्हा एकदा पी चिदंबरम यांनी सोशल मीडिया पोस्ट करत पंतप्रधान मोदींचे शब्द हे काल्पनिक असल्याची टीका केली.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यात वादंग सुरु झाला आहे. पंतप्रधान मोदींनी आरोप केला की, २६/११ च्या हल्ल्यानंतर काँग्रेस सरकारने परकीय दबावामुळे पाकिस्तानवर प्रत्युत्तर दिले नाही. पी. चिदंबरम यांनी या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ते पूर्णपणे खोटे आणि बनावट असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी कधीही त्यांच्याशी संबंधित शब्द उच्चारले नाहीत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बुधवारी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कोणाचेही नाव न घेता सांगितले की, काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्र्यांनी २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्यास लष्कर तयार असल्याचे कबूल केले होते, परंतु तत्कालीन सरकारने दुसऱ्या देशाच्या दबावाखाली हल्ला थांबवला तेव्हा वाद निर्माण झाला. पंतप्रधान मोदींनी याला काँग्रेस पक्षाची कमकुवतपणा असल्याचे सांगत म्हटले की, पक्षाने दहशतवादासमोर शरणागती पत्करली आणि देशाला त्याचे परिणाम भोगावे लागले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत पी चिदंबरम यांनी सोशल मीडिया पोस्ट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मी माननीय पंतप्रधानांचे शब्द सांगतो (जसे की टीओआय मध्ये वृत्त आहे): “…..ने म्हटले आहे की भारत २६/११ नंतर प्रत्युत्तर देण्यास तयार होता, परंतु काही देशांच्या दबावामुळे तत्कालीन काँग्रेस सरकारने भारताच्या सशस्त्र दलांना पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून रोखले.” विधानाचे तीन भाग आहेत आणि त्यापैकी प्रत्येक भाग चुकीचा आहे, अत्यंत चुकीचा आहे भारताच्या माननीय पंतप्रधानांनी हे शब्द कल्पना करून ते माझ्या नावावर ठेवले हे वाचून निराशा झाली, अशा शब्दांत कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
I quote the Hon’ble PM’s words (as reported in ToI): “…..has said India was ready to respond after 26/11, but because of the pressure exerted by some country, then Congress govt stopped India’s armed forces from attacking Pakistan.” The statement has three parts, and each one… — P. Chidambaram (@PChidambaram_IN) October 9, 2025