अकोल्यामध्ये छगन भुजबळ समर्थक विजय बोचरे यांनी ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली (फोटो - सोशल मीडिया)
OBC Reservation : नाशिक : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. कुणबी प्रमाणपत्र देत सर्वच मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. याला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. ओबीसी नेते असलेले आणि मंत्रिमंडळामध्ये असलेल्या छगन भुजबळ यांनी देखील या मागणीला विरोध केला आहे. यावरुन मत-मतांतरे सुरु असताना भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. छगन भुजबळ यांचा समर्थक असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केली.
अकोल्यामध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज ९ ऑक्टोबरला पहाटे जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगाव येथे एका व्यक्तीने आत्महत्या करुन जीवन संपवले. ओबीसी नेते विजय बोचरे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या नावे त्यांनी एक पत्र लिहून ते आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवले. त्यामध्ये त्यांनी सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या हत्येमुळे मंत्री छगन भुजबळ यांना धक्का बसला असला असून राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत याबाबत जीआर काढला. यानुसार, हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मूळ ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यावरून सकल ओबीसी समाजाने देखील आता आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणावरून अकोला जिल्ह्यात खळबळजनक घटना समोर आली. ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये’, ‘जातीय जनगणना झाली पाहिजे असे पत्रामध्ये नमूद करीत अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे ( वय वर्षे ५९) यांनी आज पहाटे आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचे विजय बोचरे हे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. आत्महत्येपूर्वी विजय बोचरे यांनी आपल्या व्हॉट्सअॅपवर सलग तीन स्टेटस ठेवले होते. यामध्ये आरक्षणाबाबत भावनिक साद घालण्यात आली होती. त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी हे स्टेटस ठेवले. त्यानंतर त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले होते. ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आमच्या मुला-बाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चालले आहे. आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही. जय ओबीसी, जय संविधान, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. “जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असे मत त्यांनी मांडले.