कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी 58 निरिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र)
पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष एक्शनमोडमध्ये आला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बिहारमध्ये पक्षच्या बळकटीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस मुख्यालयातून जाहीर झालेल्या निरीक्षकांच्या यादीत निवृत्त विंग कमांडर यांच्यासह 58 नेत्यांची नावे आहेत.
2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावलेले महागठबंधन यंदाच्या निवडणूकीमध्ये कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत, ‘ महागठबंधन’चा सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या राजदने 144 जागा लढवल्या होत्या आणि 75 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 70 जागांवर निवडणूक लढवली होती, परंतु केवळ 19 जागांवर विजय मिळवला. या आघाडीचा आणखी एक मित्रपक्ष असलेला, सीपीआय (एमएल) लिबरेशनने 19 जागा लढवत 12 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणूक निकालामुळे बिहारमधील काँग्रेसच्या तयारीवर आणि कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यामुळेच यावेळी काँग्रेस निवडणुकीत आपले अस्तित्व मजबूतपणे दाखविण्याची तयारी करत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये केलेल्या 58 निरीक्षकांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अभिनंदन केले आहे. बिहार काँग्रेसने सोशल मीडियावर निरीक्षकांची यादी देखील शेअर केली. यावेळी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांना एआयसीसी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली आहे. बिहार काँग्रेस परिवारातील तुम्हा सर्व आदरणीय सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.”
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बिहारमध्ये ‘सुपर 58’ निरिक्षक नियुक्त करताना काँग्रेसने राजकीय समीकरणेही लक्षात ठेवली आहेत. या यादीत सर्व विभागातील नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ओबीसी, एससी, अल्पसंख्याक तसेच उच्च जातीतील नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. या पथकाबाबत असे मानले जाते की, विधानसभा मतदारसंघांनुसार या लोकांना जबाबदारी दिली जाईल. हे सर्व ५८ निरीक्षक स्थानिक कामगारांशी संवाद साधतील आणि जमिनीवरील वास्तवाचे मूल्यांकन करतील. यासोबतच, आम्ही विधानसभेपासून ते बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत करू. आता हे पथक पक्षासाठी किती आणि काय काम करू शकते हे पाहणे बाकी आहे.
माननीय कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge जी ने बिहार में आगामी विधानसभा चुनावों के लिए निम्नलिखित पार्टी पदाधिकारियों को एआईसीसी पर्यवेक्षकों के रूप में नियुक्त करने के प्रस्ताव को तत्काल प्रभाव से मंजूरी दे दी है।
आप सभी सम्मानित साथियों को बिहार कांग्रेस परिवार की ओर से हार्दिक… pic.twitter.com/5TawkRFP35
— Bihar Congress (@INCBihar) June 29, 2025
या यादीमध्ये निवृत्त विंग कमांडर अनुमा आचार्य, मेहंदी, अशोक चंदना, मनोज यादव, नदीम जावेद, शोएब खान, अखिलेश यादव, वीरेंद्र यादव अशा नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर अजित भारतीय, अली मेहंदी, आरिफ मसूद, अरुण विद्यार्थी, अशोक चंदना, भुवनेश्वर बघेल, दीन बंधू बोईपाई, धीरेश कश्यप, देवेंद्र सिंह राजपूत आणि देवेंद्र निषाद यांचा समावेश आहे. कॉंग्रेसने सर्व निरिक्षकांची यादी जाहीर केली आहे.