गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या G20 शिखर परिषदेला (Delhi G20 Summit 2023) आजपासून सुरुवात झाली.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शनिवारी सकाळी G20 शिखर परिषदेचे ठिकाण असलेल्या ‘भारत मंडपम’ येथे जागतिक नेत्यांचे स्वागत केले. या परिषदेला 19 देशांचे नेते उपस्थित आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह अनेक नेते G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत.
[read_also content=”दिल्लीत जी-२० मुळे २०० रेल्वेगाड्या कराव्या लागल्या रद्द, तर काही गाड्यांचे मार्ग बदलले https://www.navarashtra.com/india/new-delhi-g-20-conference-india-narendra-modi-railway-trains-closed-in-delhi-455647.html”]
G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोमोरोस युनियनचे अध्यक्ष आणि आफ्रिकन युनियन (AU) चे अध्यक्ष अझाली अस्सुमानी यांची गळाभेट घेतली. आफ्रिकन युनियन आज G20 चा स्थायी सदस्य बनला आहे. मोदी यांनी भाषणाला सुरुवात करण्यापुर्वी मोरोक्कोमधील भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो. या कठीण काळात भारत मोरोक्कोला सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
G20 शिखर परिषदेला नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर नव्याने बांधलेल्या संमेलनस्थळी पंतप्रधान मोदींनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले. संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे आणि नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद टिनुबू, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम, दिल्लीतील प्रगती मैदानावर, G20 शिखर परिषदेचे ठिकाण ‘भारत ‘मंडपम’ आगमना झाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना सुद्धा भारत मंडपात पोहोचल्या. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांचे दिल्लीतील प्रगती मैदानावर G20 शिखर परिषदेच्या ठिकाणी भारत पॅव्हेलियनमध्ये आगमन झाले. या कायक्रम स्थळी 13व्या शतकातील प्रसिद्ध कलाकृती कोणार्क चक्राची प्रतिकृती स्थापित करण्यात आली आहे. हे वर्तुळ काळ, प्रगती आणि सतत बदलाचे प्रतीक मानले जाते.
#WATCH | G 20 in India: United Kingdom PM Rishi Sunak arrives at Bharat Mandapam, arrives at the venue for G 20 Summit in Delhi’s Pragati Maidan. pic.twitter.com/EUVAtTTBIm — ANI (@ANI) September 9, 2023