TMC खासदाराने संसदेत ओढली ई-सिगरेट? (Photo Credit - X)
कीर्ति आझाद यांच्यावर भाजपचा निशाणा
भाजपचे नेते अमित मालवीय यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मालवीय यांनी दावा केला की, संसदेत ई-सिगरेट ओढणारे दुसरे कोणी नसून टीएमसी खासदार कीर्ति आझाद आहेत.
मालवीय यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “अनुराग ठाकूर यांनी ज्या खासदारावर आरोप केला होता, ते कीर्ति आझाद आहेत. अशा लोकांसाठी नियम आणि कायद्याला काहीच अर्थ नाही. संसदेत बसलेले असताना हाताच्या तळव्यात ई-सिगरेट लपवण्याचे धाडस त्यांनी केले. धूम्रपान बेकायदेशीर नसेल, पण संसदेत त्याचा वापर पूर्णपणे अस्वीकार्य आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या खासदाराच्या या वर्तणुकीवर स्पष्टीकरण द्यावे.”
The TMC MP accused by BJP MP Anurag Thakur of vaping inside Parliament is none other than Kirti Azad. For people like him, rules and laws clearly hold no meaning. Just imagine the audacity, hiding an e-cigarette in his palm while in the House! Smoking may not be illegal, but… pic.twitter.com/kZGnYcP0Iu — Amit Malviya (@amitmalviya) December 17, 2025
अनुराग ठाकूर यांची लेखी तक्रार
गेल्या आठवड्यात भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या प्रकरणाची लेखी तक्रार केली होती. सभागृहाचे कामकाज सुरू असताना टीएमसीचे एक खासदार आपल्या जागेवर बसून उघडपणे इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा वापर करत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. अनेक खासदारांनी हे दृश्य पाहिले असून, ही घटना संसदीय मर्यादेचे उल्लंघन असल्याचे ठाकूर यांनी म्हटले होते.
‘व्हॅप’ किंवा ई-सिगरेट म्हणजे काय?
व्हॅप (Vape) हे बॅटरीवर चालणारे एक छोटे यंत्र आहे, ज्याचा वापर ई-सिगरेट किंवा इतर नशीले पदार्थ ओढण्यासाठी केला जातो. महत्त्वाचे म्हणजे, भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर देशात पूर्णपणे बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत संसदेत याचा वापर होणे हा केवळ शिस्तभंगाचा विषय नसून कायदेशीर गुन्हाही आहे.






