rahul gandhi- smruti irani
नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या टीका टीपण्ण्या संपूर्ण देशाने पाहिल्या. अनेकदा स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर अत्यंत गलिच्छ आरोपही केले. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राहूल गांधींवर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. पण आता राहुल गांधी यांनी काँग्रेसमधील नेत्यांना स्मृती इराणींवर असभ्य भाषेत टीका करणाऱ्यांना अक्षरश: दम भरला आहे.
यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यावर असभ्य आणि अशोभनीय भाषेत टीका करू नये. आयुष्यात हार-जीत होत असते, पण एखाद्याचा अपमान करणे हे ताकदीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहीताना त्यांनी आपल्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. स्मृती इराणी यांच्याबद्दल कोणत्याही काँग्रेस नेत्याने चांगले-वाईट बोलू नये. लोकांचा अपमान करणे हे ताकदीचे नव्हे तर दुर्लभतेचे लक्षण आहे. त्यामुळे असे वागणे टाळा, असा सल्लाच राहुल गांधींनी दिला आहे. पण त्यांच्या या भूमिकेमागचे कारण काय असू शकते, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर स्मृती इराणी यांना सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात होते. या जागेवरून काँग्रेस नेते किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. यावेळी स्मृती इराणी अमेठीमधून पराभूत झाल्यामुळे त्यांना ट्रोल केले जाऊ लागले. बंगला रिकामा करण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले.
राहुल गांधींनी सोशल मीडियावर टाकलेल्या आवाहनात्मक पोस्टवर युजर्स आणि त्यांच्या समर्थकांकडूनही कमेंट करण्यात आल्या. एका यूजरने लिहिले की, ‘बरोबर आहे सर, पण हे लोक तुमच्या आणि आमच्याबद्दल जास्त भयानक गोष्टी बोलायचे. तरीही तुम्ही बोललात हे बरे झाले. तर ‘राहुल गांधीजी बरोबर होते. लोकांनी स्त्रीला संबोधित करताना सावधगिरी बाळगावी, राजकीय मतभेद कोणाची तरी बदनामी किंवा मानहानी करण्यास परवानगी देत नाहीत. नैतिक मूल्ये जपताना राजकीय मतभेदांवर नेहमीच टीका केली पाहिजे.’ अशी कमेंट दुसऱ्या यूजरने केली आहे.