भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake tremors from Delhi-NCR to Jammu-Kashmir )दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला.
भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये मंगळवारी भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake tremors from Delhi-NCR to Jammu-Kashmir )दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजण्यात आली आहे. आज पहाटे 1.33 वाजता हा भूकंप झाला.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता. त्याचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 6 किलोमीटर होती. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी होती.
मार्चमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते
याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 इतकी होती. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
Web Title: Earthquake tremors from delhi ncr to jammu kashmir earth shook in pakistan china too nrab