indian army
संग्रहित फोटो

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. प्राण गमावलेले अधिकारी मेजर दर्जाचे होते. लष्कराच्या 16 कॉप्स मिलिटरी युनिटच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

    जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत (Firing in Rajouri) दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले. प्राण गमावलेले अधिकारी मेजर दर्जाचे होते. लष्कराच्या 16 कॉप्स मिलिटरी युनिटच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

    धर्मसालच्या बाजीमल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम राबवली. दरम्यान, जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.

    श्रीनगरमध्ये ‘लष्करे’च्या 2 दहशतवाद्यांना अटक

    जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए- तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 4 मॅगझिन, 2 फिलर मॅगझिन आणि 8 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. मुमताज अहमद लोन आणि जहांगीर अहमद लोन हे कुपवाडा येथील त्रेहगाम येथील रहिवासी आहेत.