(फोटो सौजन्य: Pinterest)
केसांना तेल लावा
आपल्या केसांना तेल मालिशची गरज असते. सर्वात आधी नारळाचे, बदामाचे किंवा ऑलिव्ह आईल हलके गरम करा. आता या गरम तेलाला टाळूवर टाका आणि हलक्या हाताने मसाज करा. १०-१५ मिनिटे तुम्हाला केसांची छान मसाज करायची आहे. यामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास आणि केसांच्या मुळांना पोषण मिळवून देण्यास मदत होते.
केसांना वाफ द्या
त्वचेतील पोर्स खुले करण्यासाठी तिला स्टीफ म्हणजेच वाफ दिल्याचे तुम्हा ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? ही पाण्याची वाफ केसांचे आरोग्य सुधारण्यासाठीही फायद्याची ठरते. यामुळे तेल केसांच्या मुळांपर्यंत सहज पोहचते. यासाठी एक टाॅवेल गरम पाण्यात भिजवा आणि यातील अतिरिक्त पाणी पिळून काढा. यानंतर डोक्यावर हा टाॅवेल १० मिनिटे गुंडाळून ठेवा. या प्रक्रियेमुळे केसांचे क्यूटिकल्स उघडण्यास मदत होते.
माइल्ड शॅम्पूने केस धुवा
केसांना स्टीम दिल्यानंतर कोणत्याही माइल्ड आणि कमी केमीकलयुक्त शॅम्पूने केस चांगले धुवा. यामुळे केसांमधील अतिरिक्त घाण आणि एक्स्ट्रा तेल निघून जातो. तसेच यामुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. यासोबतच केस धुताना कधीही फार गरम पाण्याने केस धुवू नका, तर यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
हेअर मास्कचा वापर करा
हेअर स्पा करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हेअर मास्क. यासाठी तुम्ही बाजारात विकत मिळणाऱ्या हेअर मास्कचाही वापर करु शकता. घरीच हा पॅक तयार करायचा असल्यास केळी, दही, मध आणि कोरफड अशा घटकांना एकत्र मिसळून पेस्ट बनवा आणि मग केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत ही पेस्ट चांगली लावा. २० मिनिटे हा मास्क केसांवर राहूद्या आणि मग कोमट पाण्याने केस धुवून काढा.
कंडिशनर लावायला विसरु नका
शेवटी तुमच्या केसांना गरज असते ती कंडीशनरची. यामुळे केस मऊ राहतात आणि यात गुंता होत नाही. कंडीशनर केसांना २-३ मिनिटे लावून ठेवा आणि मग पाण्याने केसांना पुन्हा धुवा. चागंल्या परिणामांसाठी तुम्ही महिन्यातून एकदा हा घरगुती हेअर स्पा आपल्या केसांवर करुन पाहू शकता.






