बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन; भाजपचा मोठा चेहरा हरपला

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांचं दीर्घ आजारानं सोमवारी रात्री निधन झालं. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन ही बातमी दिली आहे.

    पाटना : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांचं दीर्घ आजारानं सोमवारी रात्री निधन झालं. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. सुशील कुमार यांनी बिहारच्या राजकारणात अनेक पदे भूषविली होती. त्यांच्या या निधनाने भाजपची मोठी हानी झाल्याचे म्हटले जात आहे.

    याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी सुशील कुमार मोदी यांच्यामधील जुन्या आठवणी सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, आम्ही विद्यार्थी परिषदेपासून आत्तापर्यंत संघटनेसाठी काम केलं. सुशील कुमार मोदी यांचं संपूर्ण आयुष्य बिहारसाठी समर्पित राहिलं. बिहारला जंगलराजमधून बाहेर काढत विकासाच्या मार्गावर आणण्यात सुशील कुमार मोदी यांचं योगदान महत्वाचं होतं. त्यांचं नसणं हे आता भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी हानी असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.