संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जयपूरमध्ये घडली. मृतांमध्ये एका तरुण जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे.

    जयपूर : एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जयपूरमध्ये घडली. मृतांमध्ये एका तरुण जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश यादव (वय 25) हे सिलिंडर बदलत असताना सिलिंडरमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली.

    या आगीत राजेश यादव, त्यांची पत्नी रुबी (वय 24), त्यांच्या मुली इशू (वय 7), खुशमणी (वय 4) आणि मुलगा दिलखुश (वय 2) यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत होते. घटनेच्यावेळी त्यांच्यापैकी कोणीही बाहेर येऊ शकले नाही. आगीने संपूर्ण खोलीला वेढले आणि सर्वजण जिवंत जळाले. या घरात 17-18 खोल्या आहेत. यातील एका खोलीत राजेशचे कुटुंबीय गेल्या चार महिन्यांपासून राहत होते. हे कुटुंब मूळचे मोतिहारी, बिहारचे आहे.

    राजेश एका कारखान्यात काम करायचा. सकाळी त्याने सिलिंडर भरला होता आणि तो बदलत असताना अपघात झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आणि मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून, मदतीचे आश्वासन दिले आहे.