Maharashtra Breaking News Updates Today:
India Share Market Update: जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांचा विचार करता आज १६ जून रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, संथ गतीने उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात सपाट असल्याचे दर्शवतात. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास १५ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,९३२ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
16 Jun 2026 06:30 PM (IST)
ICAI CA Final Result 2026: द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) अधिकृतपणे घोषणा केली आहे की, मे २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) फायनल परीक्षेचा निकाल १८ जून २०२६ रोजी संध्याकाळपर्यंत जाहीर केला जाईल. उमेदवारांना त्यांचा निकाल संस्थेच्या अधिकृत पोर्टलवर म्हणजेच caresults.icai.org वर जाऊन पाहता येईल. या निकालासोबतच गुणवत्ता यादी (Merit List) आणि टॉपर्सच्या नावांची घोषणा होण्याचीही दाट शक्यता आहे.
16 Jun 2026 06:24 PM (IST)
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी बुधवार, १७ जून हा दिवस अत्यंत रोमांचक आणि ऐतिहासिक ठरणार आहे. सध्या टीम इंडियाचे वेगवेगळे संघ जगातील विविध मैदानांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहेत. एका बाजूला अफगाणिस्तानचा वरिष्ठ संघ भारत दौऱ्यावर आहे, तर दुसऱ्या बाजूला युवा खेळाडूंचा समावेश असलेला भारत ‘अ’ संघ श्रीलंका दौऱ्यावर तिरंगी मालिका खेळत आहे. याचदरम्यान इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार रंगला आहे. विशेष म्हणजे, या तीनही स्पर्धांमध्ये बुधवार, १७ जून रोजी भारताचे तीन वेगवेगळे संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत चाहत्यांना क्रिकेटचा नॉन-स्टॉप ओव्हरडोज मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही सामन्याचा थरार चुकू नये म्हणून या सर्व सामन्यांची अचूक वेळ आणि शेड्युल आधीच नोंदवून ठेवा.
16 Jun 2026 06:18 PM (IST)
India-Slovakia Deal: भारत आणि स्लोव्हाकियाने उच्च शिक्षण, संशोधन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या (Emeriting Technologies) क्षेत्रात आपले सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जून २०२६ रोजी स्लोव्हाकिया दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांमधील शैक्षणिक आणि तांत्रिक भागीदारीला नवीन दिशा देण्यावर सहमती झाली. या अंतर्गत प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक यांच्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीवर विशेष भर देण्यात आला आहे.
16 Jun 2026 06:12 PM (IST)
Maharashtra Gutkha Ban: राज्यात गुटखाबंदी लागू असताना खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवणूक व वितरणाचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघड झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
16 Jun 2026 06:06 PM (IST)
Bharti Fulmali Story/तेजस भागवत: ‘द मेकिंग ऑफ क्रिकेटर‘ या सिरिजमधून आपण आज भारती फुलमाळीच्या संघर्षाबद्दल जाणून घेणार आहोत. तब्बल संत वर्ष भारतीय संघातून बाहेर असणाऱ्या भारती फुलमाळीला काही विकृत मानसिकतेच्या लोकांनी सोशल मिडियावर तिच्या ‘रूपामुळे’ घेरले. लहानपणापासून बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या या वाघिणीने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय संघात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज आपण विदर्भाच्या भारती फुलमाळीच्या संघर्षाची कहाणी पाहुयात.
16 Jun 2026 06:00 PM (IST)
Unemployment Rate: जगभरात महागाईचे आकडे खुपच बिघडत चालले आहेत. त्याचबरोबर भारताची आकडेवारीदेखील चिंताजनक आहे. बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्यात त्यात ५.५ टक्क्यांची वाढ झाली. एप्रिलमध्ये ५.२ टक्के असलेला बेरोजगारीचा दर आता ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या ११ महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? जाणून घेऊयात.
16 Jun 2026 05:50 PM (IST)
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत सहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी विकासाला गती देण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयांमुळे नागरिकांना विविध स्तरांवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
16 Jun 2026 05:40 PM (IST)
Mamata Banerjee: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा मोठा पराभव झाला. भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, या निवडणुकीतील पराभव स्वीकारणे ममता बॅनर्जी यांच्यासाठी कठीण झाले आहे. आता त्यांनी भवानीपूर जागेच्या निवडणूक निकालांना आव्हान देणारी याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
16 Jun 2026 05:30 PM (IST)
India France Relations : फ्रान्सने भारताने विकसित केलेल्या पिनाका रॉकेट सिस्टम खरेदीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्रान्सने अधिकृतपणे पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉंचर खरेदीला नकार दिला आहे. काही महिन्यांपूर्वी फ्रान्सने भारताची ही प्रणाली खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. पण आता स्वत:च्या देशात तयार होणाऱ्या संरक्षण प्रणालींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या फ्रान्स आपल्या जुन्या रॉकेट्सची सिस्टमची जागा भरुन काढण्याची अधिक ताकदवान प्रणाली विकसित करण्याची तयारी करत आहे. यासाठी देशातील कंपन्यांना नवी रॉकेट प्रणाली विकसित करण्याचे काम देण्यात आले आहे. फ्रान्स पूर्णपणे स्वदेशी संरक्षण यंत्रणांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेकडून खरेदी केलेल्या M270 LRU प्रणालींचा जुना ताफा बदलण्याचा याचा उद्देश आहे.
16 Jun 2026 05:20 PM (IST)
Dipti Sharma: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तानच्या संघाचा तब्बल ६४ रन्सने पराभव केला आहे. या सामन्यात फलंदाजीत आणि गोलंदाजीत भारताने चांगली कामगिरी केली. दीप्ती शर्माने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या. दरम्यान आता पुढील सामन्यात दीप्ती शर्माकडे झूलन गोस्वामीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
16 Jun 2026 05:10 PM (IST)
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL)च्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 ला प्रिक्स व्हर्सायल्सच्या 2026 मधील ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, या यादीत पहिल्यांदाच भारतातील दोन विमानतळांची एकाच वेळी निवड झाली असून, हा देशासाठी मोठा सन्मान मानला जात आहे. आर्किटेक्चर, नाविन्य, शाश्वतता, सांस्कृतिक ओळख आणि प्रवाशांना मिळणारा अनुभव या निकषांच्या आधारे प्रिक्स व्हर्सायल्स पुरस्कार दिला जातो. पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयाशी संलग्न असलेला हा पुरस्कार जागतिक स्तरावरील उत्कृष्ट डिझाइन आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा गौरव करतो.
16 Jun 2026 04:52 PM (IST)
जगभरात महागाईचे आकडे खुपच बिघडत चालले आहेत. त्याचबरोबर भारताची आकडेवारीदेखील चिंताजनक आहे. बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा वाढला आहे. मे महिन्यात त्यात ५.५ टक्क्यांची वाढ झाली. एप्रिलमध्ये ५.२ टक्के असलेला बेरोजगारीचा दर आता ५.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या ११ महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शहरांमधील परिस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी, ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडत आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळत नाहीये आणि यामुळे रोजगार बाजारात संकट निर्माण झाले आहे. नेमकी काय आहे परिस्थिती? जाणून घेऊयात.
16 Jun 2026 04:47 PM (IST)
अंकशास्त्रामध्ये, मूळ अंकाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेतील अंकांच्या बेरजेला त्यांचा मूळ अंक म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या मूळ अंकाचा उपयोग त्यांचे करिअर आणि व्यक्तिमत्त्व ठरवण्यासाठी केला जाऊ शकतो. अंकशास्त्रानुसार, एक असा मूळ अंक आहे जो कठोर परिश्रम करणाऱ्या आणि राजेशाही वृत्ती असलेल्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतो. त्यांची विचारशक्ती देखील उच्च पातळीची असते. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की तो मूळ अंक कोणता आहे. चला तर मग जाणून घेऊया…
16 Jun 2026 04:37 PM (IST)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवले जात असल्याचा दावा केला जात असून, याच ‘ऑपरेशन टायगर‘ च्या अंतर्गत ठाकरे गटातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वाचा सविस्तर...
16 Jun 2026 04:27 PM (IST)
स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका दूरचित्रवाणीवरून बंद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालिकेच्या पुनरागमनाची माहिती दिली आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. वाचा सविस्तर...
16 Jun 2026 04:17 PM (IST)
राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच पूर्व विदर्भातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेत काही ठिकाणी पक्षांतरे, तर काही ठिकाणी नगरसेवकांच्या गूढ अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे वाचा सविस्तर...
16 Jun 2026 04:07 PM (IST)
एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने पिंपरी-चिंचवड शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट घोंघावू लागले आहे. शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा धोकादायक पातळीपर्यंत खालावल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, महापौर रवी लांडगे यांनी सोमवारी (दि. १५) घेतलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी जपून वापरण्याचे कडक आदेश देत, खासगी व महापालिकेचे जलतरण तलाव तातडीने बंद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. वाचा सविस्तर...
16 Jun 2026 03:55 PM (IST)
India-Slovakia MOU Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच स्लोव्हाकिया दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी भारत-स्लोव्हाकियाचे संबंध मजबूत केले. या दौऱ्यात त्यांना स्लोव्हाकियाने सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ द व्हाइट डबल क्रॉस(फर्स्ट क्लास)’ गौरविण्यात आले. १९९३ मध्ये स्लोव्हाकियाला स्वातंत्र मिळाले होते. यामुळे पतप्रधान मोदी स्लोव्हाकियाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे. यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:50 PM (IST)
Maharashtra Women Scheme News Marathi : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांना (Mahila Bachat Gat) १ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यासोबतच १ लाख रुपयांचे अनुदान देण्याची नवी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महिलांना स्वावलंबी बनवणे, ग्रामीण भागात उद्योग-व्यवसाय वाढवणे आणि बचत गटांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून ही मोठी पाऊले उचलली जात आहेत. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:45 PM (IST)
इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवरील मेन्यू कार्डवरून सध्या ‘पनीर’चे पदार्थ अचानक गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, काही हॉटेल चालकांनी पनीरच्या भाजीमागे थेट ३० ते ४० रुपयांची दरवाड केल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ‘बोगस पनीर’ तयार होत असल्याची चर्चा रंगली असतानाच, अचानक निर्माण झालेल्या या टंचाईमुळे प्रवाशांमध्ये आणि खवय्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत आपण नेमके काय खात होतो? गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील ग्रामीण भागात बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे पनीर तयार करून ते बाजारात विकले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:40 PM (IST)
नाशिक: राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्या अडचणी वाढल्या आहेत. फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात त्यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस त्या नाशिक आणि शिर्डी पोलिसांच्या हाती लागल्या नव्हत्या. अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तपासातील गंभीर पुरावे लक्षात घेत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता त्यांची पोलीस कोठडीत चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:35 PM (IST)
जैन मुनींसाठी रस्त्यांवर काढण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नसून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुन्हा एकदा या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन समाजाला पांढऱ्या पट्ट्यांऐवजी हिरवी झाडे लावण्याचा प्रस्ताव देत या वादाला नवे वळण दिले आहे. याचवेळी त्यांनी राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. वाचा संपूर्ण प्रकरण
16 Jun 2026 03:30 PM (IST)
पुणे : महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती, पुणे यांच्या वतीने एसटी कामगारांच्या विविध आर्थिक व प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विभाग नियंत्रक कार्यालयासमोर दुपारी १:३० ते २:०० या वेळेत कामगारांनी जोरदार ‘घंटानाद’ करत आणि ‘महाआरती’ करून प्रशासनाचा व शासनाचा निषेध करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:25 PM (IST)
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एकधक्कादायक प्रकार समोर आलं आहे. एका २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मुलीसोबत लग्नाला कुटुंबीयांनी होकार दिल्यानंतर अवघ्या काही तासातच तरुणावर जीवघेणा हल्ला करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी मुलीचे दोन भाऊ आणि मेहुण्याला पोलिसांनी आता केली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घडलेली घटना कळवण तालुक्यात घडली. वाचा नेमकं काय घडलं?
16 Jun 2026 03:20 PM (IST)
पाटण : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूरहून बारामतीला जात असताना कराड येथे पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चा सेवकांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पाटण मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. पाटण तालुक्यातील सर्वात जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र, प्रमाणपत्र देण्यासाठी चुकीचे निकष लावून जाणुनबुजून अडथळे निर्माण केले जात आहेत, ते खपवून घेणार नाही. याबाबतीत माझ्याकडे अनेकदा तक्रारी आल्या आहेत. यासाठी मी लवकरच पाटणला भेट देणार आहे, असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी पाटणवासियांना दिले. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:15 PM (IST)
पुणे : भारतीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना व्यवसायवृद्धीसाठी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने अॅमेझॉन इंडियाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित विक्रेता सहाय्यक सुविधा अधिक व्यापक स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे व्यवसाय सुरू करण्यापासून ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर विक्रेत्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. उत्पादनांची माहिती तयार करणे, साठा नियोजन, विक्री व्यवस्थापन, ग्राहकांपर्यंत पोहोच वाढविणे तसेच विविध देशांतील नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक सहाय्य या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:10 PM (IST)
IND Vs AFG Vs SL Live: सध्या श्रीलंकेत ट्राय सिरिज सुरू आहे. भारत, श्रीलंका आणि अफगणिस्तान यांच्यात सिरिज सुरू आहे. भारत अ संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करत आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान भारतीय संघात एका नव्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर
16 Jun 2026 03:05 PM (IST)
विजय काते, मीरा-भाईंदर : शहरातील वाढती पाणीटंचाई आणि वारंवार उद्भवणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असताना, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मिरा-भाईंदरमध्ये आगळेवेगळे आंदोलन छेडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध देवतांचे वेश परिधान करून महानगरपालिका परिसरात प्रवेश करत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर
16 Jun 2026 02:58 PM (IST)
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 16 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात लागणे अपेक्षित होते. मात्र, निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं सांगत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला आहे. आता या खटल्याचा अंतिम निकाल 20 जून 2026 रोजी लागण्याची शक्यता आहे.
16 Jun 2026 02:49 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक फेरबदलांना वेग आला असून रिक्त पदे भरणे आणि काही महत्त्वाच्या नियुक्त्यांबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तसेच महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे.
16 Jun 2026 02:42 PM (IST)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला दिलासा दिला होता. इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. मात्र आता कराराच्या मसुद्यातील एक अट खोटी असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'इराणने कधीही अणुशस्त्र न बाळगण्याचे मान्य केले आहे! तसेच, अमेरिका इराणला ३०० मिलियन डॉलर्स देत आहे ही बातमी म्हणजे 'डमोक्रॅट्स'नी (Dumocrats) पसरवलेली एक खोटी बातमी आहे." असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
16 Jun 2026 02:31 PM (IST)
नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारने 21 जूनपर्यंत टेलिग्राम अपवरील काही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मेसेज एडिटिंगचे वैशिष्ट्यही तात्पुरते निष्क्रिय करण्यात आले आहे. परीक्षेसंदर्भातील संवेदनशील माहितीचा गैरवापर टाळणे आणि पारदर्शकता राखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
16 Jun 2026 02:20 PM (IST)
पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल 20 जूनला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ओमराजे निंबाळकर भावूक झाले. त्यांनी सांगितले की, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली. या घटनेची वेदना आजही मनात ताजी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, या प्रकरणात पूर्ण न्याय मिळावा आणि सत्य सर्वांसमोर यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
16 Jun 2026 02:12 PM (IST)
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंत्रालयाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
16 Jun 2026 02:00 PM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट युजी २०२६ (NEET UG 2026) पुनरपरीक्षेबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. या पुनरपरीक्षेत बसणाऱ्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आले आहेत. हे हॉल तिकीट एनटीएच्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून, विद्यार्थी त्यांच्या लॉगिन तपशीलांच्या मदतीने ते डाऊनलोड करू शकतात. ही परीक्षा २१ जून २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे. अशा परिस्थितीत, सर्व उमेदवारांना नियमितपणे वेबसाइट चेक करण्याचा आणि आपले ॲडमिट कार्ड वेळेत डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
16 Jun 2026 01:55 PM (IST)
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या अलीकडील वाढलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत झाले आहे. लोक महागाईबद्दल बरीच तक्रार करताहेत. पण माहिती आहे का? या मोठ्या गोष्टींचा विचार करता लहान गोष्टींकडे आपण लक्षच दिला नाही. ज्यांनी आपल्या खिशाला कधीच कात्र लावली आहे. गेल्या १५ दिवसांत इतर अनेक वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत, ज्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित माहिती नसेल. चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांनी मागील १५ दिवसांत आपला दर बदलला आणि महाग झाल्यात.
16 Jun 2026 01:50 PM (IST)
प्राइम व्हिडिओने आपल्या बहुप्रतीक्षित रिअॅलिटी सीरिज **‘अलायन्स’**च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. 26 जूनपासून सुरू होणारा हा शो प्राइम व्हिडिओचा पहिला डेली रिअॅलिटी शो ठरणार असून भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये स्ट्रीम केला जाणार आहे. एकूण 42 भागांचा हा शो सहा आठवडे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. विशेष म्हणजे, या शोचा नवा भाग दररोज दुपारी 12 वाजता प्रदर्शित केला जाईल.
16 Jun 2026 01:45 PM (IST)
विदर्भ वगळता सर्व शाळा कालपासून सुरू झाल्या असल्या तरी अजूनही नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके प्राप्त झाली नाहीत, त्यामुळे आता शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेल्या सेतू पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिकवले जावे, असे सुचवले आहे. आता ही पुस्तके विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत मिळतील असे बालभारतीने सांगितले आहे.
16 Jun 2026 01:40 PM (IST)
काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येला जवळपास दोन दशके उलटल्यानंतर, महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वपूर्ण राजकीय हत्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाकडून १६ जून रोजी आपला निकाल देणार होते. मात्र निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज असल्याचं सांगत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला आहे. राजकीय वैर, सुपारी देऊन हत्या करण्याचा कट आणि ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्यावरील खटल्याचा समावेश असलेले हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. पाटील हे एकेकाळी उस्मानाबाद (आताचा धाराशिव) भागातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. या निकालाचे मोठे राजकीय आणि कायदेशीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
16 Jun 2026 01:35 PM (IST)
९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या यशाच्या शिखरावर आहे. ती एकापाठोपाठ एक टीव्ही शोमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. सध्या ती शिल्पा शेट्टीच्या ‘माँ है ना’ या शोमध्ये दिसत आहे. तिची मुलगी टीनाने शिल्पाच्या शोमधूनच पदार्पण केले. सुनीता आपल्या स्वयंपाकात विनोदाची जोड देते. विनोदाच्या नावाखाली सुनीता अनेकदा तिचा नवरा गोविंदाची खिल्ली उडवताना दिसली आहे. पुन्हा एकदा, ती गोविंदाच्या बनावट केसांवर टीका करताना दिसली होती.
16 Jun 2026 01:25 PM (IST)
महागाईचा भडका आणि वाढत्या ताण या सगळ्यात आपण कुठे प्रवासाला जायचा विचारच करत नाही. जरी विचार केला तरीही विमान प्रवास हा खिशाला परवडण्यासारखा नाही म्हणून आपण प्लॅनच कॅन्सल करतो. पण आता असं करायची गरज नाही. वाढलेल्या तिकीटांच्या अडचणीवर Air India ने फंडा शोधून काढला आहे. नेमका काय जाणून घेऊयात.
16 Jun 2026 01:15 PM (IST)
केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC (Union Public Service Commission) ही आज देशातील सर्वोच्च भरती संस्थांपैकी एक मानली जाते. आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयएफएस (IFS) यांसारख्या उच्च सेवांमधील अधिकाऱ्यांची भरती याच आयोगामार्फत केली जाते. परंतु, यूपीएससीची सुरुवात स्वतंत्र भारतात झालेली नसून, ती ब्रिटिश राजवटीत झाली होती.
16 Jun 2026 01:05 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत शेतात उचलून नेट पाशवी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. नराधम ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना केज तालुक्यात घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
16 Jun 2026 12:48 PM (IST)
अन्न आणि औषध प्रतिबंधक विभागाने संपूर्ण राज्यात बेकायदेशीर धंदे आणि भेसळ करणाऱ्या विरोधात कारवाईचे जोरदार सत्र सुरु केले असल्याने बेकायदेशीर धंदे आणि भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. संपूर्ण राज्यात कारवाया सुरु असतानाच या विभागाने पुरंदरकडे मोर्चा वळविला आहे. पुरंदरच्या सासवडमध्ये पहिल्याच कारवाईत गुटखा विक्रीचे दुकान सील करून मोठा झटका दिली आहे. या कारवाईने तालुक्यातील मावा, गुटखा, पानमसाला विक्री करणारे कोमात गेले आहेत. सासवडला पहिलीच मोठी कारवाई झाल्यानंतर मावा, गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अनेक दुकानातून मावा तसेच वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा बंद झाल्याचे पाहायला मिळत आहे. नियमित येणाऱ्या ग्राहकालाच आतल्या हाताने मावा, गुटखा मिळत आहे. अनोळखी ग्राहकाला विनंती करूनही शिल्लक नाही किंवा आम्ही मावा, गुटखा विकत नाही असे सांगताना पाहायला मिळत आहे.
16 Jun 2026 12:36 PM (IST)
दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींचा माग काढत असताना १६ मे रोजी मुख्य आरोपी शेखर जाधव आणि मुस्तफा (उर्फ भाईजान) हे रांजणगाव (पुणे ग्रामीण) परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस पथक त्यांना पकडण्यासाठी गेले असता, आरोपींनी थेट पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकावरच गोळीबार केला आणि उसाच्या शेताचा फायदा घेत तिथून पळ काढला. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यातही त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि गोळीबाराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
16 Jun 2026 12:24 PM (IST)
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार जणांच्या टोळक्याने मोठा राडा घालत दोन तरुणांवर वार केले अन् नंतर परिसरात हत्यारे हवेत फिरवून दहशत माजवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, तिघे अद्यापही फरार आहेत. शोएब रशीद कुरेशी (वय २६, रा. पंचशीलनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात ३२ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गन्हा नोंद केला आहे. हा प्रकार येथील पंचशीलनगर येथील दयावान समाज मंदिराजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला आहे.
16 Jun 2026 12:12 PM (IST)
दोन गटात सुरु असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना शहरात घडली. विशेष म्हणजे ही घटना शहर पोलिस स्टेशन समोरच अंदाजे शंभर फुटावर घडली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. फरार झालेल्या सहा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत माहिती अशी की, परवेझ खान (रा. करीमनगर) व त्याचे काका आदील खान यांच्यात घरगुती वाद झाल्याने रविवारी रात्री दोन्ही बाजुंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या. तक्रारी देवून पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले. तुंबळ हाणामारी झाली. यात नवीद अक्रम शेख याचा खून झाला. तर परवेझ खान व मोबीन शेख हे जखमी झाले.
16 Jun 2026 12:00 PM (IST)
अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षणाचा लाभ वंचित व अतिमागास घटकांपर्यंत पोहोचवावा, या प्रमुख मागणीसाठी सातारा जिल्हा मातंग समाजाच्या वतीने बुधवार (१७ जून) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, शाहू चौक येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्ह्यातील मातंग समाज बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
16 Jun 2026 11:50 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता ‘ऑपरेशन टायगर‘ची निव्वळ चर्चा नाही तर, ७ खासदार आमच्या संपर्कात आहेत. कोणत्याही ऑपरेशनपूर्वी विविध चाचण्या घेतल्या जातात. तशा सर्व चाचण्या झाल्या असून, तारीख निश्चित व्हायची आहे. येत्या पंधरवड्यात चित्र बदललेले दिसेल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने केला.
16 Jun 2026 11:40 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना सोमवारी (१५ जून) स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्लोव्हाकियाचे राष्ट्रापती पीटर पेलेग्रिनी यांनी ब्रातिस्लाव्हा शहरात एका कार्यक्रमादरम्यान मोदींना ‘द ऑर्डर ऑफ द व्हाइट डबल क्रॉस(फर्स्ट क्लास)’ या पुरस्काराने सन्मानित केले. स्लोव्हाकियातर्फे परदेशी नागरिकांना दिला जाणारा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान आहे.






