Maharashtra Breaking News Updates Today:
Rohit Pawar Protest Pandharpur: राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी (Farm Loan Waiver) आणि कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले ‘अन्नत्याग आंदोलन’ आज (१३ जून) दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही रोहित पवार आपल्या मागण्यांवर ठाम असून, त्यांनी महायुती सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.
13 Jun 2026 05:45 PM (IST)
एकीकडे राज्यात विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजलेले असताना आता दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्र्रवादि काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीनीकरण होत असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावर भाष्य केल्याने त्या चर्चाना अजून जास्त उधाण आले. आता यावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी आज (शनिवार, १३ जून) माध्यमांशी संवाद साधला यावेळी राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या कथित विलीनीकरणाच्या चर्चेबाबत त्या म्हणाल्या, “आमदार, खासदार किंवा अन्य कोणाशीही कोणीच संपर्क केलेला नाही, विलीनीकरणाची हि चर्चा कुठून झाली, याची कल्पना मला नाही. कोण कोणाच्या संपर्कात आहे, याची मला कल्पना नाही. शरद पवार यांच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही,” असे थेट भाष्य त्यांनी यावेळी केले.
13 Jun 2026 05:30 PM (IST)
Naeem Hasan: सध्या बांग्लादेशचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सिरिज खेळत आहे. दरम्यान याच दरम्यान बांग्लादेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांग्लादेशी क्रिकेटपटू नईम हसन याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी मारहाण केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
13 Jun 2026 05:15 PM (IST)
Bigg Boss 19th चा सेकंड रनर अप प्रणित मोरे सध्या वादात अडकला आहे. प्रणितचा ‘The Pranit More Show’ एक लोकप्रिय शो आहे, अनेकांकडून या शोला पाहिले जाते, पण याच शो दरम्यान घडलेल्या काही घटनांनी एका Controversy ला जन्म दिला आहे. यामध्ये ‘370 ची बिर्याणी’ आणि ‘सेजल पवार Controversy’ या दोन मुद्द्यांनी प्रणित मोरेच्या लोकप्रियतेवर गदा आणली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रणितचे सोशल मीडिया हॅन्डल डिऍक्टिव्हेट करण्यात आले होते. काही काळाने प्रणितचे सोशल मीडिया हॅन्डल पुन्हा ऍक्टिव्हेट झाले. ऍक्टिव्हेट होताच प्रणितने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत त्याच्या शोमधील काही स्टेटमेंटमुळे दुखावलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे.
13 Jun 2026 05:00 PM (IST)
Kamakhya Devi Dham : आसामची राजधानी गुवाहाटीजवळ नीलाचल टेकडीवर असलेले कामाख्या मंदिर, हे भारतातील सर्वात प्राचीन आणि शक्तिशाली शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर देवी सतीच्या योनीशी असलेल्या संबंधामुळे देशभरात प्रसिद्ध आहे. येथे कोणतीही मूर्ती नाही, त्याऐवजी एका नैसर्गिक तलावाची पूजा केली जाते. कामाख्या देवीला शक्तीची अधिष्ठात्री देवता मानले जाते आणि हे ठिकाण तांत्रिक साधनांसाठी जगप्रसिद्ध आहे.
13 Jun 2026 04:55 PM (IST)
जागतिक परिस्थिती अजून ताणलेली असताना त्याचा परिणाम तेलांच्या किंमतीवर दिसून येत आहे. यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. पण रोजच्या जीवनात इंधनाची गरज भासते म्हणून लोकंही त्याची अतिरिक्त खरेदी करत असतात. पण यासगळ्यावर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसुलात होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. म्हणजेच नवीन नियमांनुसार घाऊक खरेदीदार यापुढे किरकोळ पेट्रोल पंपावरून तेल खरेदी करू शकणार नाहीत. नेमकी काय आहे ती लिमीट? वाचा सविस्तर..
13 Jun 2026 04:45 PM (IST)
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने शुक्रवारी (दि. १२ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या शांत स्वभाव, नेतृत्वगुण आणि सातत्यपूर्ण कामगिरीने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या विल्यमसनला जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही विल्यमसनच्या निवृत्तीवर आपली भावना व्यक्त केली. कोहलीने सोशल मीडियावर केन विलियमसनसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर..
13 Jun 2026 04:37 PM (IST)
भारताचे राष्ट्रीय फळ आंबा त्याला फळांचा राजा असंही म्हणतात. जगभरात आंब्यांच्या 1500 हून अधिक जाती आहेत आणि आंब्याची 140 हून अधित देशांत लागवड केली जाते.भारतातच 1000 हून अधिक जातींची लागवड केली जाते. यामध्ये ‘मलिहाबादी दशहरी’पासून ते ‘रत्नागिरी हापूस’ पर्यंतच्या विविध जातींचा समावेश आहे. आंबा उत्पादक देशांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. या बाबतीत तो जगात अग्रेसर आहे. त्याचबरोबर त्याची जगभरात मागणीही तितकीच आहे. वाचा सविस्तर..
13 Jun 2026 04:29 PM (IST)
नांदेडमधील बहुचर्चित सक्षम ताटे हत्याकांडाला आता भावनिक वळण मिळाले आहे. (Nanded Crime)प्रेमसंबंधातून झालेल्या या ऑनर किलिंग प्रकरणानंतर सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न करून सासरी राहण्याची शपथ घेणारी आंचल मामीडवार आता सासरचे घर सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. सक्षमच्या आईने एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपली व्यथा मांडली असून, मुलाच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले आहे. वाचा सविस्तर..
13 Jun 2026 04:25 PM (IST)
आसाममधील जोरहाट हवाई तळावर (रौरिया हवाई तळ) भारतीय हवाई दलाचे (IAF) एक AN-32 विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, विमान उतरल्यानंतर आग लागली. ही घटना जोरहाट हवाई तळाच्या परिसरात घडली. हवाई तळावर उपस्थित असलेले अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. भारतीय हवाई दलाने एक निवेदन जारी करून सांगितले की, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आसाममधील जोरहाट येथे एका नियमित उड्डाणादरम्यान त्यांचे एक AN-32 विमान कोसळले. वाचा सविस्तर..
13 Jun 2026 04:16 PM (IST)
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासंबंधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आली आहे. विमानतळाच्या भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सात गावांतील शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर..
13 Jun 2026 03:59 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी घाटातून समोर आलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. लग्नात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून एका शिक्षकाने आपल्या वडील आणि मामाच्या मदतीने 25 वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. मृतदेह घाटातील झुडपात फेकून अपघाताचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासामुळे अखेर या थरारक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
13 Jun 2026 03:50 PM (IST)
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. यजमान इंग्लंडने महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि.१२) बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने एमी जोन्स आणि डॅनी वायट-हॉज यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर २० षटकांत एक विकेट गमावून २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेचा महिला संघ २० षटकांत केवळ १३२ धावाच करू शकला आणि सर्वबाद झाला. यासह, इंग्लंडच्या महिला संघाने विश्वचषकातील पहिला सामना ८७ धावांनी जिंकला. महिला टी-२० विश्वचषकातील कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, २०२३ मध्ये इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध २१३/५ धावा केल्या होत्या. या सामन्यात अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद झाली.
13 Jun 2026 03:38 PM (IST)
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे EPFO सदस्य त्यांच्या PF खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याजदर ८.२५% इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. हा दर जैसे-थे ठेवण्याचा निर्णय होऊन दोन महिने उलटूनही, सदस्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. आता यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मार्च २०२६ मध्ये, EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी EPF ठेवींवर ८.२५% वार्षिक व्याजदराची शिफारस केली. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २ मार्च रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, CBT ने शिफारस केली आहे की हे व्याज संबंधित आर्थिक वर्षासाठी सदस्यांच्या ईपीएफ खात्यांमध्ये जमा केले जावे.
13 Jun 2026 03:25 PM (IST)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (१३ जून) धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर होणार आहे. पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पावसामुळे व्यत्यय आला आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार शुभमन गिल आणि हशमतुल्लाह शाहिदी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:०० वाजता मैदानात उतरणार होते. परंतु, धर्मशाळा येथे पाऊस पडत असल्याने, नियोजित वेळेनुसार नाणेफेक होऊ शकलेली नाही. धर्मशाळामध्ये पावसाचा जोर आता वाढला आहे. यामुळे, खेळपट्टी सध्या कव्हर्सने झाकलेली आहे.
13 Jun 2026 03:11 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांसाठी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन’ पार पडत असून आज (शनिवार, १३ जून) आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. विविध मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सत्त्ताधारी नेत्यांनी यावरून रोहित पवार यांना लक्ष्यही केले आहे. विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेटून विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या या अन्नत्याग आंदोलनात जाहीर पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलना आपला पाठिंबा दर्शवला आहे.
13 Jun 2026 02:59 PM (IST)
भाजप एकनाथ शिंदेंचा पक्ष लवकरच विसर्जित करणार, असा गंभीर आरोप शिवसेना UBT नेते विनायक राऊत यांनी केलाय. गरज संपली भाजप कोणत्याही पक्षाला विसर्जित करून टाकतो, गरज सरो आणि वैद्य मरो हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय.
13 Jun 2026 02:51 PM (IST)
लाखो पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणी १५ जूनपासून पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सेवा १५ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने याबाबत आदेश जारी केले आहेत. दरम्यान या चार महिन्याच्या कालावधीत अमन लॉज ते माथेरानदरम्यानची शटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
13 Jun 2026 02:40 PM (IST)
नाशिकनंतर जळगावातही बंड शमलंय. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा तिढा सुटला. रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी जळगाव विधानपरिषदेसंदर्भात काळे यांच्याशी चर्चा केली, तसंच गुलाबराव पाटलांशी देखील बोलणं झाल्याचं शिंदे म्हणाले.
13 Jun 2026 02:31 PM (IST)
ठाणे जिल्ह्यावर पाणी संकट गडद झालंय. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 33 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलायं. त्यामुळे दिवसभरात शंभरच्या आसपास टँकरने पाणी शहरात पोचवलं जात आहे. बारवी ,मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणात पाण्याची पातळी घटली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यापासूनच वातावरणात उष्णतेत झालेली कमालीची वाढ त्यातच पाऊस देखील लांबल्याने धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. जून महिन्यात देखील ठाणे शहर , कळवा मुंब्रा दिवा आणि घोडबंदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टँकरने पाणी पोहोचवलं जातं.
13 Jun 2026 02:20 PM (IST)
कोकणात जाणाऱ्या मार्गावर इंदापुर आणि माणगावमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तीन किलो मिटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत. उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरु होण्याच्या कालावधील शेवटचा विकएन्ड असल्याने कोकणात जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे
13 Jun 2026 02:12 PM (IST)
आसाममधील जोरहाट येथे असणाऱ्या वायुदलाच्या तळावर उतरताना एक लष्करी विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात पुरवठा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एएन-32 मालवाहू विमानाचा भीषण अपघात झाला. हवाई तळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
13 Jun 2026 02:03 PM (IST)
शासकीय वसतिगृह प्रवेशावरून नवा वाद उदभवण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. उपवर्गीकरण लागू केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. समाजकल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचे स्वतंत्र उपविभाजन करण्यात आलं आहे. जाहिरातीत प्रवर्गाचा कॉलममध्ये 'मांग', 'मेहतर' आणि 'इतर एससी' असा उल्लेख असल्यानं सामाजिक संघटनांचा तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यात एससी उपवर्गीकरणाचा मुद्दा पेटलेला असतानाच नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे.
जाहिरातीमागील कायदेशीर आधार सार्वजनिक करण्याची मागणी.
13 Jun 2026 01:55 PM (IST)
टेक कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी ए सिरीजमधील आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy A27 5G या नावाने सादर केला आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आता अखेर दक्षिण कोरियाई कंपनीने हा स्मार्टफोन सादर केला आहे. नव्या स्मार्टफोनची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे या डिव्हाईससाठी कंपनी 2032 पर्यंत सॉफ्टवेयर अपडेट जारी करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए27 5G सध्या चेक रिपब्लिकमध्ये लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतासह इतर देशांमध्ये देखील लाँच करणार आहे.
13 Jun 2026 01:45 PM (IST)
जागतिक राजकारणात भारताचे स्थान दिवसेंदिवस किती मजबूत होत चालले आहे, याची प्रचिती देणारी एक मोठी घडामोडी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शनिवार, १३ जून २०२६ रोजी त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन देशांच्या युरोप दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या पाच दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या देशांना भेटी देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात केवळ द्विपक्षीय संबंधच मजबूत होणार नाहीत, तर फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित G-7 शिखर परिषदेत भाग घेऊन पंतप्रधान मोदी जागतिक आव्हानांवर भारताची भूमिका मांडतील. विकसनशील देशांचा म्हणजेच ‘ग्लोबल साऊथ’चा एक बुलंद आवाज म्हणून या परिषदेत भारताकडे पाहिले जात आहे.
13 Jun 2026 01:35 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशात २.२ लाख इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या. क्रिसील रेटिंग्सच्या अंदाजानुसार, २०२७-२८ पर्यंत वार्षिक विक्री ५ लाखांपेक्षा जास्त होऊ शकते आणि एकूण कार बाजारात त्यांचा वाटा १०% पर्यंत पोहोचू शकतो.
13 Jun 2026 01:25 PM (IST)
नॅरोगेजवर चालणारी नेरळ माथेरान नेरळ ही माथेरान येथील पर्यटनस्थळाचा आर्थिक कणा समजली जाते.यावर्षी अनेक वर्षांनी ही मिनी ट्रेन पर्यटकांना चांगली सेवा देणारी ठरली आहे. संपूर्ण उन्हाळी हंगाम पर्यटकांची गर्दी वाहून नेणारी मिनीट्रेन हेरिटेज नामांकन कधी मिळवणार? हा प्रश्न कायम आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनचा प्रवास माथेरान या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हवाहवासा वाटत असतो.२१ किलोमीटर अंतर पार करीत असताना ही मिनीट्रेन तब्बल २२० वळणे घेऊन माथेरान येथे पोहचत असते.८०० मीटर उंचीवर असलेल्या माथेरान शहरात घेऊन जाणारी ही मिनीट्रेन त्यामुळेच आबालवृद्ध पर्यटकांची आवडती ठरत असते.
13 Jun 2026 01:15 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही. मोदी आणि अमित शाह यांचे राजकारण सुरू झाल्यापासून देशातील राजकीय विकृतीने कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्ला शिवसेना (उबाठा) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. पक्ष आणि माणसे फोडणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप करत त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर पक्षाची भूमिका मांडली.
13 Jun 2026 01:05 PM (IST)
पश्चिम आशियातील आणि विशेषतः आखाती देशांमधील वाढत्या सागरी तणावाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांत भारतीय खलाशी असलेल्या जहाजांविषयी अनेक चिंताजनक बातम्या समोर येत आहेत. यातच सोशल मीडिया आणि काही अनधिकृत माध्यमांवर ओमान आणि होर्मुझ सामुद्रधुनीजवळ (Hormuz Region) एका मालवाहू जहाजावर भीषण हल्ला झाला असून त्यात ४ भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. या बातमीमुळे खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये आणि देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता भारत सरकारने या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत वक्तव्य जारी करत या अफवांना पूर्णपणे पूर्णविराम दिला आहे.
13 Jun 2026 01:02 PM (IST)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू असून, विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमाशी सुसंगतपणे जुळवून घेता यावे यासाठी यंदा शाळा सुरू होताच सेतू अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. इयत्ता तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेतू अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून, तो पूर्ण झाल्यानंतर नियमित अध्यापनाला सुरुवात केली जाणार आहे.
13 Jun 2026 12:48 PM (IST)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. दारिद्रय रेषेखाली जाणे व वर येणे ही एक प्रक्रिया आहे असे बेजबाबदार वक्तव्य करत मोदी सरकारच्या काळात गरिबी निर्मलून करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हे सांगताना देशातील ८० कोटी जनतेला मोदी सरकारच ५ किलो धान्य रेशनवर मोफत देते याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. गरिबी निर्मुलन झाले तर हे ८० कोटी लोक कोण आहेत? स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली अशीही धादांत खोटी थाप मारून ते मोकळे झाले. अशा थापाड्या मुख्यमंत्र्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
13 Jun 2026 12:36 PM (IST)
हिंजवडीतील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाने आयटी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सततचा मानसिक छळ, खोट्या तक्रारी आणि कामाच्या ठिकाणी होणारा अपमान यामुळेच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख संबंधित कर्मचाऱ्याने सुसाइड नोटमध्ये केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीसह टीसीएसमधील दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित अभय ब्रह्मे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विनोद जेठालाल पालीचा तसेच टीसीएस, हिंजवडी येथील अर्चना आणि शाश्वती या कर्मचाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांचा मुलगा अनिश अमित ब्रह्मे (वय १९, रा. भोसरी) याने मंगळवारी (दि. ९) याबाबत फिर्याद दिली.
13 Jun 2026 12:24 PM (IST)
पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर रशिद शेख (वय ३२), हैदर रशिद शेख (वय ३४, दोघेही रा. कलवड) तसेच अन्वर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास शांतिरक्षक सोसायटीच्या गेटसमोर घडली आहे.
13 Jun 2026 12:12 PM (IST)
राज्यासह देशभरात अपघाताचे प्रमाण वाढले असून, जररोज अनेकांना अपघातांमध्ये जीव गमवावा लागत आहे. अशातच आता धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी पुलाजवळ शुक्रवारी (१२ जून) सकाळी भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्यालगतच्या दामोधरण लॉजमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ट्रक चालक विनोद चंद्रशेखर पांडे यांचा मृत्यू झाला, तर क्लिनर राघव कुमार मिश्रा (वय २२) गंभीर जखमी झाला आहे. अपघातात लॉज व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लासूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारा (जीजे-०४-एएक्स-९७९९) क्रमांकाचा ट्रक सुमारे ३२ टन वॉशिंग पावडरचा माल घेऊन जात होता. सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास करोडी पुलाजवळ ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दामोधरण लॉजमध्ये घुसला.
13 Jun 2026 12:00 PM (IST)
आंतरराष्ट्रीय सागरी सीमांच्या सुरक्षेवरून आणि आखाती देशांमधील लष्करी हालचालींवरून भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील राजनैतिक तणाव आता कमालीचा वाढला आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय जलमार्गामध्ये अमेरिकेच्या नौदलाने (US Navy) केलेल्या एका वादग्रस्त कारवाईदरम्यान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण भारतामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, भारत सरकारने या मुद्द्यावर थेट अमेरिकेला आंतरराष्ट्रीय नियमांची आठवण करून देत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
13 Jun 2026 11:50 AM (IST)
ग्वालियरमध्ये 60 वर्षीय आजोबानेच आपल्या अल्पवयीन नातीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी तिला अश्लील व्हिडिओ दाखवत चुकीचा स्पर्श करत होता. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहे.
13 Jun 2026 11:40 AM (IST)
आंतरराष्ट्रीय सागरी सीमांच्या सुरक्षेवरून आणि आखाती देशांमधील लष्करी हालचालींवरून भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील राजनैतिक तणाव आता कमालीचा वाढला आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ आंतरराष्ट्रीय जलमार्गामध्ये अमेरिकेच्या नौदलाने (US Navy) केलेल्या एका वादग्रस्त कारवाईदरम्यान तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी आणि गंभीर घटनेमुळे संपूर्ण भारतामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, भारत सरकारने या मुद्द्यावर थेट अमेरिकेला आंतरराष्ट्रीय नियमांची आठवण करून देत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
13 Jun 2026 11:30 AM (IST)
ग्रीसमधील मेगालोपोलिस (Greece, Megalopolis) खोऱ्यातील प्रसिद्ध ‘मॅराथुसा १’ (Marathousa 1) या पुरातत्व स्थळावर शास्त्रज्ञांना तब्बल ४ लाख ३० हजार वर्षे जुनी हाताने वापरली जाणारी लाकडी अवजारे सापडली आहेत. जागतिक विज्ञान जगतात या शोधामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, मानवाच्या प्राचीन तंत्रज्ञानाचा हा सर्वात जुना आणि जिवंत पुरावा ठरला आहे.
13 Jun 2026 11:20 AM (IST)
महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि खान अकॅडमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘गणित गुरुवार’ उपक्रमामुळे महानगरपालिकेच्या शाळांच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. यासोबतच आता या शैक्षणिक वर्षापासून ‘सायन्य सोमवार’ हा उपक्रम सुरु करण्याचा पालिका शिक्षण विभागाचा मानस आहे. येत्या काही दिवसात हा उपक्रम अभ्यासक्रमात दाखल होणार आहे.
13 Jun 2026 11:15 AM (IST)
भारतीय क्रिकेट संघ आज अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेला सुरुवात करत आहे. या मालिकेद्वारे संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाची तयारी करणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या सामन्यासाठीच्या तंदुरुस्तीची कसोटी लागणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित आयपीएलमधील पाच सामने खेळू शकला नाही. दुखापतीतून परतल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये क्षेत्ररक्षण केले नाही. ५० षटकांच्या सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून रोहित आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
13 Jun 2026 11:05 AM (IST)
लातूरमधील हनमंत पाटील हे लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. कौटुंबिक वाद, पत्नीने दाखल केलेला 2 कोटींचा दावा आणि मानसिक तणावामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केलेल्या शेवटच्या फोनमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
13 Jun 2026 10:40 AM (IST)
मुंबईची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या बेस्ट या परिवहन सेवेला मुंबई मनपाकडून मिळणाऱ्या आर्थिक अनुदानावर स्थायी समितीने स्थगिती दिली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी निर्देश दिले आहेत की, यापूर्वी मंजूर झालेले १०० कोटींचे अनुदान कोठे आणि कोणत्या उद्देशासाठी वापरले गेले, याची सविस्तर माहिती सादर केल्यानंतरच २०२६-२७ या आर्थिक वर्षांसाठी नवीन अनुदान मंजूर केले जाईल. शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालयात स्थायी समितीची बैठक झाली. समितीसमोर २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी बेस्ट वीजपुरवठा आणि चाहतूक उपक्रमाला महानगरपालिकेकडून १,०६० कोटींच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव पुनर्विचारासाठी परत पाठवला.
13 Jun 2026 10:30 AM (IST)
कात्रज दूध संघाच्या कारभाराबाबत दाखल झालेल्या तक्रारींमध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. अस्तित्वात नसलेल्या किंवा निष्क्रय दूध संस्थांच्या नावावर दूध संकलन दाखविण्यात आले का, वाहतूक खर्चात गैरव्यवहार झाला का आणि सभासदत्व देताना नियम व उपविधी डावलण्यात आले का, याची सखोल चौकशी होणार आहे.
13 Jun 2026 10:15 AM (IST)
व्हिडिओमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक नेता पक्षांतरासाठी भाजपमध्ये सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यालयात गेल्याचे दिसते जिथे हिरव्या रंगाने त्याचे स्वागत करण्यात आले. तुम्हाला वाटेल की, नेत्याने भाजपमध्ये सामील होणे यात नवीन काही नाही. परंतु व्हिडिओत काही भलतेच घडताना दिसले. भाजप कार्यकर्त्यांनी TMC च्या नेत्याला हिरवा रंग लावला खरा पण या रंगासहच त्याला पार्टीत सामील न करताच कार्यालयातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
13 Jun 2026 10:05 AM (IST)
पुण्याचे आयटी हब असलेल्या हिंजवडीमधून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका आयटी अभियंत्याने २ पानांचा सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याने कामाच्या ठिकाणी रिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि एका मित्राकडून मिळणारा होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून ही घटना २ जून रोजी घडली.
13 Jun 2026 09:55 AM (IST)
तुम्ही देखील एखाद्या जुन्या आयफोन मॉडेलचा वापर करत आहात का? तर तुमच्यासाठी वाईट बातमी आहे. टेक कंपनी मेटाने घोषणा केली आहे की, 30 नोव्हेंबरपासून काही आयफोन आणि आयपॅड्सवर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद केला जाणार आहे. या आयफोन आणि आयपॅड यूजर्सकडे व्हॉट्सॲप सपोर्ट सुरु ठेवण्यासाठी iOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन आणि iPadOS 15.5 किंवा त्यानंतरचे वर्जन असणं आवश्यक आहे. अॅपलच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणाऱ्या डिव्हाईसचे यूजर्स जोपर्यंत त्यांचे डिव्हाईस अपडेट करत नाहीत, त्यांना व्हॉट्सॲप सपोर्ट मिळणार नाही.
13 Jun 2026 09:50 AM (IST)
जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या Lenovo ने चीनमध्ये त्यांच्या योगा प्रोडक्ट लाइनअपमधील सर्वात स्वस्त मेंबर म्हणून एक नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीने लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्स चीनमध्ये लाँच केले आहेत. हे नवीन ट्रू वायरलेस स्टीरियो ईयरफोन्स 40dB पर्यंत अॅक्टिव नॉइज कँसलेशन (ANC), 12.2mm डायनामिक ड्राइवर्स आणि डुअल-डिवाइस कनेक्टिविटी सपोर्टसह लाँच करण्यात आले आहेत. लेनोवोने इन्स्टंट पेअरिंग आणि सॉफ्टवेअर-आधारित नियंत्रणांद्वारे या ईअरबड्सना आपल्या ‘योगा पीसी’ इकोसिस्टममध्ये देखील समाविष्ट केले आहे.
13 Jun 2026 09:45 AM (IST)
भारतात 13 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,859 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,621 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,145 रुपये आहे. भारतात 13 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,36,210 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,590 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,450 रुपये आहे. भारतात 13 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 260.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,60,100 रुपये आहे.
13 Jun 2026 09:40 AM (IST)
पुणे: मध्य-पूर्वेतील (Middle East) वाढत्या लष्करी संघर्षामुळे आणि युद्धाच्या भडक्यामुळे जागतिक इंधन बाजारासह देशांतर्गत समीकरणातही मोठे बदल होऊ लागले आहेत. नव्या नियमानुसार, पेट्रोल पंपांवरून आता ग्राहकांना २०० लीटरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येणार आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकारने एक मोठी अट घातली आहे. हे इंधन उघड्या किंवा सामान्य कॅन आणि बॅरलमध्ये न देता, केवळ 'पेसो' (PESO - Petroleum and Explosives Safety Organization) कडून मान्यताप्राप्त (Certified) कंटेनर किंवा ड्रममध्येच दिले जावे, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव आणि इंधनाचा अपव्यय टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
13 Jun 2026 09:36 AM (IST)
Maharashtra Monsoon El Nino Delay मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत हजेरी लावल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास आता अचानक मंदावला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस (Monsoon) कोकणातील हरणे-दापोली परिसरापर्यंत पोहोचला आहे, मात्र पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल हवामान नसल्यामुळे मान्सूनची प्रगती थांबली आहे. परिणामी, मुंबई आणि परिसरात तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला असून नागरिक कमालीच्या उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
वाढत्या 'एल निनो'चे नवे संकट भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा कणा मानल्या जाणाऱ्या मान्सूनच्या वाटेत आता 'एल निनो'चे (El Nino) नवे संकट उभे ठाकले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरात 'एल निनो'ची ताकद पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे.
13 Jun 2026 09:32 AM (IST)
देहूगांव : मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच ग्रामीण भागात दिसणारा लाल रंगाचा मखमली मृग किडा अर्थात ‘इंद्रगोप’ हा शेतकऱ्यांचा नैसर्गिक मित्र मानला जातो. मात्र रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढता व अतिरेकी वापर यामुळे हा उपयुक्त किडा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही मृग किडा दिसेनासा झाला आहे. वाचा सविस्तर-






