नवी दिल्ली- इंस्टाग्राम रील्सवर आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे नाराज झालेल्या एका अल्पवयीन मुलीने आपल्या २ मित्रांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मुलीने या दोघांनाही हिंमत असेल तर गल्लीत येऊन बोला, असे चॅलेंज दिले होते. ते तिथे पोहोचल्यानंतर मुलीने भाऊ व मित्रांच्या मदतीने चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेतील सर्वच आरोपी अल्पवयीन आहेत.
ही घटना बुधवारी रात्री दिल्लीच्या बाहेरील भागात घडली. निखील (२८) व साहिल पांडे (१८) अशी मृत मुलांची नावे आहेत. डीसीपी देवेश महला यांनी मुलीसह तिचे भाऊ व इतर दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याची पुष्टी केली आहे.
निखील व साहिल घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीचे भाऊ व मित्रांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. साहिलने आपल्या काही मित्रांना दूर उभे केले होते. साहिलवर चाकूने वार होताच या मित्रांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत आरोपींनी हल्ला करून पलायन केले होते. निखील व साहिलला त्यांच्या मित्रांनी रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.