unemployment

देशभरात हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या मनुष्यबळ सर्वेक्षणातून समोर आले आहे. या काळात हिमाचल प्रदेशात बेरोजगारीचा दर 33.9 टक्के होता, तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये 30.2 टक्के दर सर्वेक्षणाने नोंदवला होता.

    नवी दिल्ली : देशभरात हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी (Unemployment) असल्याचे जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या मनुष्यबळ सर्वेक्षणातून समोर आले आहे. या काळात हिमाचल प्रदेशात बेरोजगारीचा दर 33.9 टक्के होता, तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये 30.2 टक्के दर सर्वेक्षणाने नोंदवला होता. हा बेरोजगारीचा दर 15 ते 29 वयोगटातील तरुण-तरुणींमधील आहे.

    राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, हिमाचलमध्ये चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 15 ते 29 वयोगटातील बेरोजगारीचा दर शहरी भागात महिलांमध्ये तब्बल 49.2 टक्के नोंदविण्यात आला असून, पुरुषांचा बेरोजगारीचा दर 25.3 टक्के आहे. राजस्थानमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर महिलांमध्ये 39.4 टक्के आणि पुरुषांमध्ये 27.2 टक्के आहे. बेरोजगारीचे प्रमाण 17.3 टक्के नोंदविण्यात आले आहे.

    शहरी भागात ते 22.9 टक्के आहे. महिलांमध्ये तो 15.5 टक्के आहे. बेरोजगारीचा दर एकूण कामकरी वयातील लोकसंख्येपैकी बेरोजगार व्यक्तींच्या प्रमाणात ठरतो. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने एप्रिल 2017 पासून तिमाही मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यास सुरुवात केली. आता जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील हा 20 वा अहवाल आहे.