देशभरात अनेक राज्यांना पावसाचा इशारा (फोटो- ani)
बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा
पर्वतीय राज्यांमध्ये जोर वाढणार
पंजाबमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत
IMD Indian Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पंजाब, राजधानी दिल्लीत महापुराचा फटका बसला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्राच्या देखील काही जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने कोणत्या राज्यांना कोणता अलर्ट दिला आहे, त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्या इशारा पातळीच्या वरून वाहत आहेत. तर काही राज्यांमध्ये महापूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश राज्यात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
राजधानी दिल्लीत काय स्थिती?
राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सूनचा ट्रफ दक्षिणेकडे सरकत आहे. त्यामुळे देशभरात पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. राजधानी दिल्लीत पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
बिहार, उत्तर प्रदेशमध्ये यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर
उत्तराखंड राज्यात पावसाचा जोर तसाच वाढलेला आहे. नैनीताल, चंपावत, बागेश्वर, पिठोरागड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३०० पेक्षा रस्तेमार्ग बंद झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
IMD Heavy Rain Alert: पावसाचा कहर थांबेना, हवामान विभागाकडून पुढील 7 दिवसांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी
प्रशासनाने पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्य वेगात सुरू केले आहे. हिमाचलमध्ये 1,311 रस्ते बंद असून शाळा-महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला हाय अलर्टवर ठेवले आहे. नागरिकांना आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.