अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा (फोटो ani)
अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
पर्वतीय राज्यांमध्ये पावसाचा कहर
पंजाबमध्ये नागरिकांना पुराचा फटका
Heavy Rain Update: गेल्या काही दिवसांपासून देसभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे व सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारतात, पूर्व भारतात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिल गेला आहे. पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्लीत पावसाचा जोर वाढू शकतो.
उत्तर प्रदेशमध्ये कसे असणार वातावरण?
भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर बिहार जिल्ह्यात देखील येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
India Rain Alert: दिल्लीसह ‘या’ राज्यांना पाऊस झोडपून काढणार; कुठे कुठे करणार कहर? पहा IMD चा अलर्ट
उत्तराखंड व हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या दोन पर्वतीय राज्यांमध्ये अति ते अति मुसळधार पाऊस कोसळत आहे. देहराडुन, चमोली, रुद्रप्रयाग या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तराखंड राज्यात भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सुरक्षिततेतच्या कारणामुळे चमोली जिल्ह्यात सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
पंजाबमध्ये महापूर
पंजाब राज्यात मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राज्य सरकार, प्रशासन, एनडीआरएफ सतर्क झाले आहे.
कोणत्या राज्यांना अलर्ट
छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि पर्वतीय राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आता आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात देखील पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.