भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढला (फोटो- व्हिडिओ/ani)
श्रीनगर: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारत कारवाई करत आहे. दरम्यान पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार करत आहेत. आता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानने भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.
पाकिस्तान ज्या दहशतवादी बेस कॅम्पवरून भारतावर हल्ले करत होता. तेच बेस कॅम्प भारताने उडवून लावले आहेत. भारताने ही कारवाई कशाप्रकारे केली आहे त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
#WATCH | Pakistani Posts and Terrorist Launch Pads from where Tube Launched Drones were also being launched, have been destroyed by the Indian Army positioned near Jammu: Defence Sources
(Source – Defence Sources) pic.twitter.com/7j9YVgmxWw
— ANI (@ANI) May 10, 2025
पाकिस्तानने भारतावर फतेह 1 या मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला भारताने परतवून लावला. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला केला आहे.
भारताच्या Fighter जेट्सचा पाकिस्तानच्या ‘या’ एअरबेसवर घातक हल्ला
भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसली आहेत. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. भारताने रावळपिंडीजवळ असलेल्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे, असे म्हटले जात आहे. मुरीद आणि सुकुर या हवाई तळांवर देखील भारताने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानचे तीन एअरबेस उडवले आहेत. त्यामुळए पाकिस्तानी एअरफोर्स या ठिकाणावरून उड्डाण करून शकणार नाही. पाकिस्तानचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून भारताचे हवाई तळ लक्ष्य करण्यात आले होते. मात्र भारताने हा हल्ला परतवून लावला.
उधमपुर आणि पठाणकोट एअरबेसवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान लढाऊ विमाने भारताच्या हद्दीत शिरली होती. मात्र भारताने हे हल्ले उधळून लावले आहेत. मात्र पाकिस्तानची मिसाईल्स भारताने हवेतल्या हवेतच नष्ट केली आहेत. सिरसा हवाई बेसला देखील पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता.
26 ठिकाणी भारताकडून पाकचे हल्ले निष्प्रभ
पाकिस्तानकडून भारतातील 26 ठिकाणी हवाई हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय लष्कराची महत्वाची ठिकाणी आणि नागरिक वस्ती यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात राज्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हल्ला परतवून लावला.