जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला यश (फोटो- सोशल मिडिया)
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा डाव उधळला
भारतीय लष्कराने IED ला केले नष्ट
ऐन दिवाळीत भारतीय लष्कराला मोठे यश
सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. त्यातच देशवासीयांच्या आनंदात दहशतवाद्यांनी विरजण पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने हा कट उधळून लावला आहे. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये आयईडी नष्ट केले आहे. सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.
ऐन दिवाळीत दहशतवाद्यांनी भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा दलांच्या सतर्कतेने मोठा धोका टळला आहे. दिवाळीत सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवण्यास सुरुवात केली आहे. लष्कराला शोपिया जिल्ह्यात एक आयईडी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय लष्कराने हे आयईडी यशस्वीपणे नष्ट केले.
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे आयईडी कोणत्या दहशतवादी संघटनेने लावले होते, याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे सुरक्षा दले अलर्ट मोडवर आले आहेत. मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. दिवाळीचा सण सुरू असताना दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दले सावध झाली आहेत.
काश्मीरचे सिंह…दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी भारतीय लष्कराची ‘ही’ खास युनिट
ऑपरेशन सिंदूरमध्ये Indian Army ला ‘संभव’ची मदत
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. दरम्यान हे ऑपरेशन राबवत असताना भारतीय लष्कराने स्वदेशी संभव नावाचे उपकरण वापरले होते. तर ते उपकरण नक्की काय ते आपण जाणून घेऊयात.
जानेवारी 2025 महिन्याच्या आधी भारतीय लष्कराने आपल्या जवानांसाठी एक उपकरण तयार केले आहे. जे उपकरण ऑपरेशन सिंदूरमध्ये उपयोगी आले होते. भारतीय लष्कराचे प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना जवनांशी कशा प्रकारे संपर्क साधला जात होता, याबाबत सांगितले.
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये Indian Army ला ‘संभव’ची मदत; नेमके काय आहे उपकरण?
दहशतवाद्यांचा थरकाप उडवणारी भारतीय लष्कराची ‘ही’ खास युनिट
1990 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा राष्ट्रीय रायफल्सची स्थापना झाली तेव्हा त्यांचे ब्रीदवाक्य ‘शक्ती आणि शौर्य’ हे होते. ही शक्ती देखील त्याच तत्त्वावर आपले कार्य करते. 1990 पासून या दलाने खोऱ्यातून अनेक मोठे दहशतवादी आणि त्यांच्या गटांचा खात्मा केला आहे. या दलाबद्दल असे म्हटले जाते की ज्या दहशतवादी गटाच्या मागे लागतात त्याचे नाव घेण्यास कोणीही जिवंत उरले नाही.