नवी दिल्ली : भारतीय सैन्याला (Indian Army) आता आधुनिक सुरक्षित गाड्या (Modern Safe Cars) मिळाल्या आहेत. या गाड्या फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगपेक्षाही (Five Star Safety Rating) सेफ आहेत. पुलवामासारखे हल्ल्ल्यांना (Pulwama Attack) या आधुनिक चिलखती गाड्यांमुळे (Armored Vehicles) चाप बसणार आहे. विशेष म्हणजे या गाड्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या (Indigenous Fabrication) असून याची निर्मिती टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडने (Tata Advance System Limited) केली आहे.
सैन्याला देण्यात आलेल्या गाडीचे नाव ‘क्विक रिएक्शन फाइटिंग व्हेईकल मीडियम’ (Quick Reaction Fighting Vehicle Medium) असे ठेवण्यात आले आहे. या वाहनांमुळे भारतीय सैन्य आता कोणत्याही परिसरात वेगाने कारवाई करू शकणार आहे. या गाड्या अन्य चिलखती वाहनांपेक्षा जास्त वेगाने जातात. या चिलखती वाहनाला बॉम्ब आणि भूसुरुंगही भेदू शकणार नाहीत. या वाहनाच्या खाली भूसुरुंग जरी फुटला तरी त्याला काही होणार नाही, एवढे हे मजबूत वाहन आहे.
काही दिवसांपूर्वी दक्षिण सुदानमध्ये सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये या चिलखती वाहनाचा पहिल्यांदाच वापर झाला होता. या वाहनांमुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढली असून सैनिक या वाहनांमध्ये सुरक्षित असणार आहेत.