अमेरिकेतील आर्थिक मंदीचा भारतीय आयटी क्षेत्राला बसणार फटका

टीसीएसच्या दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचा अंदाज चुकला आहे. ज्यामुळे आर्थिक मंदीची (Financial Recession) चिंता तंत्रज्ञान क्षेत्राला सतावत असून, कंपन्यांनी खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे.

    नवी दिल्ली : टीसीएसच्या दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचा अंदाज चुकला आहे. ज्यामुळे आर्थिक मंदीची (Financial Recession) चिंता तंत्रज्ञान क्षेत्राला सतावत असून, कंपन्यांनी खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच अमेरिकेतील आर्थिक मंदीचा भारतीय आयटी क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.

    सप्टेंबरच्या तिमाहीत टीसीएसचे निव्वळ उत्पन्न 8.7 टक्क्यांनी वाढून 113.4 अब्ज रुपये (1.4 अब्ज डॉलर) झाले. विश्लेषकांनी सरासरी 114.09 अब्ज रुपयांच्या नफ्याचा अंदाज व्यक्त केला होता. विक्री 7.9 टक्क्यांनी वाढून 596.9 अब्ज रुपयांवर पोहोचली. टीसीएसचे शेअर्स मुंबईच्या सुरुवातीच्या व्यवहारात 1.7 टक्क्यांनी घसरले. टीसीएसने भारताच्या 245 अब्ज डॉलरहून अधिक आयटी सेवा उद्योगाचे नेतृत्व केले आहे, जे अमेरिकेमधील उद्योग, उच्च व्याजदर आणि महागाईचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात कपातीच्या माध्यमातून मंदीचा सामना करत आहेत.

    युक्रेनवरील रशियाच्या सतत हल्ल्यामुळे व्यवसायांसाठी आर्थिक अनिश्चिततादेखील निर्माण झाली आहे. देशी प्रतिस्पर्धी इन्फोसिसप्रमाणे टीसीएसदेखील उच्च मार्जिन डिजिटल सेवांद्वारे वाढीस चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. यूएस मार्केटमध्ये मागणीचे वातावरण दबावाखाली आहे, असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम यांनी ब्लूमबर्गवरील मुलाखतीत सांगितले.