भारतीय सैन्यातील जवानांना इंस्टाग्राम वापरताना कोणतीही पोस्ट, लाईक किंवा कमेंट करण्याची परवानगी नाही (फोटो - सोशल मीडिया)
Indian soldiers Rules for Instagram : नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सोशल मीडियाच्या वापराबाबतच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता, लष्करी सैनिक आणि अधिकारी इन्स्टाग्रामचा वापर अगदी मर्यादित करु शकणार आहे. यापुढे सैन अधिकारी इंस्टाग्रामचा वापर फक्त पाहण्यासाठी आणि देखरेखीसाठी करू शकतील. सैन्य अधिकारी यावर कोणत्याही प्रकारची पोस्ट करू शकणार नाहीत. तसेच लाईक किंव कमेंट करू शकणार नाहीत.यामुळे सैन्यातील जवानांना इंस्टाग्राम वापरावर बंधने घालण्यात आली आहेत. सोशल मीडियाच्या वापराच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, डिजिटल वापराविषयी सैन्याला आधीच लागू असलेले इतर सर्व नियम तसेच राहतील.या सूचना सैन्याच्या सर्व युनिट्स आणि विभागांना जारी करण्यात आल्या आहेत. याचा उद्देश सैनिकांना सोशल मीडियावर असलेल्या कंटेंटवरून पाहण्याची, माहिती ठेवण्याची आणि माहिती गोळा करण्याची मर्यादित परवानगी देणे आहे, जेणेकरून ते बनावट किंवा दिशाभूल करणारी कंटेंट ओळखू शकतील.
हे देखील वाचा : PM नरेंद्र मोदींचे खास Christmas सेलिब्रेशन; दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला दिली भेट, पहा खास फोटो
नवीन नियमांनुसार, सैनिक सोशल मीडियावरील कोणत्याही बनावट, दिशाभूल करणाऱ्या किंवा संशयास्पद पोस्टची तक्रार त्यांच्या वरिष्ठांना करू शकतील. यामुळे माहिती युद्ध आणि चुकीच्या माहितीविरुद्ध लष्कराची अंतर्गत दक्षता मजबूत होण्यास मदत होईल. भारतीय लष्कराने फेसबुक, एक्स (पूर्वी ट्विटर) आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव या प्लॅटफॉर्मवर पूर्वी कडक निर्बंध होते. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. मात्र तरीही जवानांना याचा वापर करताना कोणत्याही पोस्टला लाईक किंवा कमेंट्स करता येणार नाही.
हनी ट्रॅप च्या प्रकरणामुळे झाले नियम कडक
परदेशी एजन्सींनी लावलेल्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या काही सैनिकांनी अनवधानाने संवेदनशील माहिती लीक केल्याचे समोर आले आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर हे कठोर नियम लागू करण्यात आले. यामुळे सोशल मीडिया नियंत्रणाची गरज निर्माण झाली.
हे देखील वाचा : पक्षाचा बापच अनौरस, तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात
अलीकडेच, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी चाणक्य संरक्षण संवादादरम्यान लष्करी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबद्दल आपले मत मांडले. कार्यक्रमादरम्यान, त्यांना विचारण्यात आले की जनरेशन झेड तरुण सैन्यात सामील होण्याची इच्छा का बाळगतात, परंतु लष्कर आणि सोशल मीडियामध्ये संघर्ष असल्याचे दिसून येते. जनरल द्विवेदी यांनी उत्तर दिले, “हे खरोखर एक आव्हान आहे. जेव्हा तरुण कॅडेट्स एनडीएमध्ये येतात तेव्हा ते सर्वात आधी त्यांच्या खोल्यांमध्ये लपवलेले फोन शोधतात. फोनशिवाय जीवन आहे हे त्यांना पटवून देण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात.” तथापि, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की आजच्या काळात स्मार्टफोन ही एक गरज बनली आहे.






