पीएम नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देऊन ख्रिसमस सेलिब्रेशन केले (फोटो सौजन्य - एक्स)
दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट देत पंतप्रधान मोदींनी ख्रिसमस साजरा केला आहे. यावेळी चर्चेमधील काही फोटो पंतप्रधान मोदींनी शेअर केले आहेत. दिल्लीतील कॅथेड्रल चर्च हे सर्वात जुन्या चर्चपैकी एक असून दिल्लीतील सर्वात मोठे चर्च देखील आहे. कॅथेड्रल चर्च त्याच्या सुंदर वास्तुकलेसाठी ओळखले जाते. दरवर्षी नाताळासाठी विशेष सजावट केली जाते. संपूर्ण दिल्लीतील ख्रिश्चन बांधव या चर्चेमध्ये सण साजरा करण्यात येत असतात. कॅथेड्रल चर्च उत्कृष्ट वास्तूकलेपैकी एक मानले जाते. यंदाच्या वर्षी पंतप्रधान मोदी हे देखील चर्चमध्ये सामील झालेले दिसून आले. यावेळी पंतप्रधान मोदी हे खास पोषाखामध्ये चर्चमध्ये गेलेले दिसून आले.यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्याचबरोबर मोदींनी चर्चमध्ये प्रार्थना देखील केली.
हे देखील वाचा : 101व्या जयंतीनिमित्त जयंतीनिमित्त लखनौ ‘अटलमय’; PM मोदींच्या हस्ते 230 कोटींच्या ‘राष्ट्र प्रेरणा स्थळा’चे लोकार्पण
चर्चमध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रार्थना देखील केली. त्याचबरोबर सोशल मीडियावर या भेटीचे फोटो देखील शेअर केले आहे. खास क्षण शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, दिल्लीतील ‘कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्प्शन’ येथे ख्रिसमसच्या सकाळच्या प्रार्थनेत सहभागी झालो. या प्रार्थनेत प्रेम, शांती आणि करुणेचा कालातीत संदेश प्रतिबिंबित झाला. ख्रिसमसची भावना आपल्या समाजात सलोखा आणि सदिच्छांना प्रेरणा देवो, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
Attended the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption in Delhi. The service reflected the timeless message of love, peace and compassion. May the spirit of Christmas inspire harmony and goodwill in our society. pic.twitter.com/humdgbxR9o — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025
याचबरोबर देशातील सर्व ख्रिश्चन बांधवांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना शांती, करुणा आणि आशेने भरलेल्या आनंददायी नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. येशू ख्रिस्तांची शिकवण आपल्या समाजात सलोखा दृढ करो, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळ सणाच्या दिल्या आहेत.
हे देखील वाचा : केवळ फॅशन नाही तर बिझनेस मास्टरस्ट्रोक; सांताक्लॉजला खरं तर ‘Coca-Cola’ मुळे मिळाला लाल रंगाचा ड्रेस
Here are some more glimpses from the Christmas morning service at The Cathedral Church of the Redemption. pic.twitter.com/ta5vTyYEJU — Narendra Modi (@narendramodi) December 25, 2025






