Photo Credit- Social Media दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडला महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली
Maharashtra Tableau: विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान करणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रजासत्ताक दिनाच्या दिवसी दिल्लीत होणाऱ्या संचलनात परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 26 जानेवारी 2025 रोजी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या प्रतिष्ठेचआ संचलनासाठी यंदा 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील चित्ररथांना पथसंचलनाची परवानगी देण्यात आली आहे. पण या यादीत सद्या तरी महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही.
नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर तीनही सैन्यदलांसाठी वेगवेगळ्या राज्यातील चित्ररथांच्या कार्यक्रमाचा सहभाग असतो. गेल्या वर्षी राज्य सरकारने 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ तयार केला होता. पम 2025 मध्ये मात्र महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
दरम्यान गेल्या वर्षी ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ तयार करण्यात आला होता. 2024 मध्ये मराठी रंगभूमीच्या १७५ व्या सुवर्णमयी इतिहास उलगडणारा चित्ररथ सादर करावा असा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे मांडण्यात आला. ऐनवेळी या प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली. 2023 मध्ये महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ आणि नारीशक्तीवर आधारित आधारलेल्या चित्ररथाचे संचालन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावर होणारा चित्ररथाचा कार्यक्रम हा प्रत्येक राज्यासाठी आणि केंद्रसाशित प्रदेशासाठी महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा असतो. यावरून अनेकदा वादही होतात, या तक्रारीनंतर, प्रत्येक राज्याला तीन वर्षांतून एकदा तरी चित्ररथ सादर करण्याची संधी मिळेल, असा निर्णय संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. पण संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या समितीला हा चित्ररथ पंसत पडला पाहिजे, अशी अटही ठेवण्यात आली आहे.
अरे देवा! गुगल मॅपची चुक की विद्यार्थ्यांचा निष्काळजीपणा? काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणू
दरम्यान, 2025 च्या चित्ररथ संचालनाच्या यादीत महाराष्ट्राला सध्यातरी स्थान मिळाले नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल, बिहार, गोवा, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड हरियाणा, आंध्र प्रदेश, ही राज्ये आहेत. याशिवाय दीव-दमण, दादरा आणि नगरहवेली, आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांना परवागनी देण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे, तब्बल 10 वर्षांनंतर चंदीगडच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने आतापासूनच देखाव्याची तयारी सुरू केली आहे. या वेळी प्रशासन खासगी कंपनीची मदत घेत आहे. त्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. झांकीची थीम यूटी प्रशासनाने निश्चित केली आहे. यावेळी प्रशासनाने सुवर्ण भारत, वारसा आणि विकास ही चित्ररथांची थीम निश्चित केली आहे. या विषयावरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. आता चित्ररथ तयार करण्याचे काम कंपनीला दिले जाणार आहे. वास्तविक चंदीगडच्या हेरिटेजवर थीम ठरवण्यात आली आहे.
2014 मध्ये चंदीगडच्या चित्ररथाला परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी स्व.नेक चंद यांनी तयार केलेल्या रॉक गार्डनची झलक प्रशासनाने पाठवली होती. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाने विविध थीमवर चंदीगडचे मॉडेल केंद्राकडे पाठवले होते, परंतु आता 11व्या वर्षी चंदीगडची झलक पुन्हा दिल्लीच्या राजपथावर पाहण्याची तयारी सुरू आहे.






