मुंबईतील मीरा रोड येथील गीता आकाश इमारतीच्या जे विंगमधील फ्लॅट क्रमांक 704. रात्री 7 वाजता फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करुन सांगितले. पोलीस येतात, दार उघडले जाते. त्यानंतर आतील दृश्य मन हेलावून टाकणारे होते. एका महिलेची हत्या करून तिचे तुकडे करण्यात आले होते.
मनोज साहनी (वय 56) आणि सरस्वती वैद्य (वय 36) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मनोजनेच सरस्वतीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मनोजने हे कृत्य केल्याचा संशय आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी सरस्वतीची हत्या झाल्याचे समजते. आणि खून केल्यानंतर मनोज मृतदेहासोबत घरीच राहत होता. सध्या पोलिसांनी आरोपी मनोजला अटक केली आहे.
सरस्वतीच्या हत्येनंतर मनोजने ट्री कटर विकत घेतला. या कटरने त्याने मृतदेहाचे तुकडे केले. मात्र मनोजवर आणखी एक गंभीर आरोप लावण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, शरीराचे तुकडे केल्यानंतर मनोजने कुकरमध्ये काही भाग उकळले. पोलिसांनी फ्लॅटवर पोहोचून पॉलिथिनमध्ये भरलेल्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले.
पोलिसांनी काय माहिती दिली ?
हे जोडपे येथे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. साहनी यांनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केले जेणेकरून ते शोधणे सोपे होईल. आम्ही साहनीला अटक केली असून हत्येमागील हेतू आणि तो कसा केला याचा तपास करत आहोत. असे पोलिसांनी सांगिलतले.
दुसऱ्या एका पोलिसाने सांगितले की, सरस्वतीच्या शरीराचे काही तुकडे गायब आहेत. मनोजनेच कोठेतरी फेकून दिल्याचा संशय आहे. या रिपोर्टनुसार, मनोज आणि सरस्वती कोणाशीही फारसे मिसळत नसल्याचंही शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. मनोज साहनीविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.