Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Marathi Breaking Live Marathi : देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2025 | 06:53 PM
Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Top Marathi News Today Live : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; 121 जागांसाठी 1314 उमेदवार मैदानात

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Updates : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. 18 जिल्ह्यांमधील 121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 102 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 19 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत.

पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५१३ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १९.८३५ दशलक्ष, ३२५ पुरुष, १७.६७ दशलक्ष, २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. ३२२०७७ अपंग मतदार आणि ५३१४२३ ज्येष्ठ नागरिक मतदार (८० वर्षांवरील ५२४6८७ मतदार आणि १०० वर्षांवरील ६७३६ मतदारांसह) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

The liveblog has ended.
  • 06 Nov 2025 06:52 PM (IST)

    06 Nov 2025 06:52 PM (IST)

    ”४० – ४४ डिग्री तापमानात…” तेजश्रीने सांगितला ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेतील ‘त्या’ बहुचर्चित सिक्वेन्सचा अनुभव!

    आज मराठी टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांना सिनेमॅटिक अनुभव देण्यात आघाडीवर आहे. छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्याचा भव्य अनुभव देणाऱ्या चॅनेल्सपैकी झी मराठी नेहमीच पुढे राहिली आहे. आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ने या दर्जाला आणखी उंची दिली आहे कारण या मालिकेत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर दोन जोडप्यांच्या भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिलाच प्रयत्न असून, या नव्या उपक्रमाने मालिकेला एक वेगळं स्थान दिलं आहे.

  • 06 Nov 2025 06:38 PM (IST)

    06 Nov 2025 06:38 PM (IST)

    Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

    मुंबई: बेस्ट (BEST) उपक्रमातील कायम कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आणि खासगी कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप बेस्ट वर्कर्स युनियन आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांनी १० नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • 06 Nov 2025 06:20 PM (IST)

    06 Nov 2025 06:20 PM (IST)

    Pune News: पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! राज्य शासनाने ‘या’ 2 Metro मार्गांना दिली मंजूरी

    पुणे: पुणे मेट्रोच्या टप्पा–२ अंतर्गत हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो–सासवड रस्ता या दोन महत्त्वाच्या मेट्रो उपमार्गिकांना अखेर राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाची माहिती दिली.दोन्ही उपमार्गिकांची एकत्रित लांबी सुमारे १६ किलोमीटर असून, एकूण १४ उन्नत मेट्रो स्थानकांचा यात समावेश असेल. या संपूर्ण उन्नत मेट्रो प्रकल्पांसाठी ५ हजार ७०४ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या दोन्ही मार्गांची अंमलबजावणी महा मेट्रो मार्फत करण्यात येणार आहे.

  • 06 Nov 2025 06:07 PM (IST)

    06 Nov 2025 06:07 PM (IST)

    मोठी बातमी! बिहारचे DCM विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला; नक्की घडले काय?

    बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज 121 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना लखीसराय यांना विरोध करण्यात आला आला. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला झाल्यावर सिन्हा यांनी राजदवर आरोप केला आहे.

  • 06 Nov 2025 05:42 PM (IST)

    06 Nov 2025 05:42 PM (IST)

    उत्तन-डोंगरी डिपो योजना रद्द; नागरिकांचा ऐतिहासिक संघर्ष यशस्वी

    4 वर्षांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला यश मिळाले आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अखेर उत्तन-डोंगरी येथील मेट्रो-9 च्या डिपो योजनेला रद्दबातत ठरवले असून, तब्बल 733कोटींचा ठेका रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांच्या दीर्घ संघर्षाला यश मिळाले असून, हा उत्तनवासीयांचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची औपचारिक घोषणा करत नागरिकांना दिलासा दिला.

  • 06 Nov 2025 05:30 PM (IST)

    06 Nov 2025 05:30 PM (IST)

    सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

    २००२ च्या मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या ११.१४ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, जप्तीमध्ये सुरेश रैनाच्या नावावर ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.

  • 06 Nov 2025 05:10 PM (IST)

    06 Nov 2025 05:10 PM (IST)

    Maruti Nexa देतेय भरभरून डिस्काउंट

    भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कंपन्या दमदार कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहकांना कार खरेदी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी दमदार डिस्काउंट सुद्धा देणे गरजेचे आहे. सध्या देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki त्यांच्या काही कार्सवर दमदार डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनी Nexa डिलरशिपच्या अंतर्गत अनेक कार्सची विक्री करत असते. रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या महिन्यात नेक्सा डीलरशिपवर ऑफर केलेल्या सर्व कारवर लाखो रुपयांचे डिस्काउंट देत आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 06 Nov 2025 04:50 PM (IST)

    06 Nov 2025 04:50 PM (IST)

    खोपोलीत मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत पक्षप्रवेश.

    खोपोली शहरात शिंदेच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग पहायला मिळाली. शहरातील क्रांतीनगर मधील शेकडो मुस्लिम बांधवानी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला. शिवसेनेचे जेष्ठ नेते बेबीशेठ स्याम्युअल व त्यांचे पुत्र रॉबिन स्यामुअल यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी कर्जत खालपूरचे आमदार महेंद्र थोरवे, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,कुलदीपक शेंडे,माजी नगरसेविका जीनी स्यामुअल, प्रचारप्रमुख शेखर जाभंळे आदी मान्यवर उपस्थिय होते.क्रांतीनगर येथील अयुब खान, श्रीकांत कांबळे, मन्नूदिन शेख, मंगेश सकापाळ, शिबू शेख, नईम शेख आदी मान्यवरांसह शेकडो मुस्लिम बांधव व मोठ्या संख्येने महिलानी यावेळी प्रवेश केला.

  • 06 Nov 2025 04:40 PM (IST)

    06 Nov 2025 04:40 PM (IST)

    अंबरनाथ मध्ये नगराध्यक्षपदावर भाजपचा दावा

    राज्यात महायुती म्हणून सत्तेत असलेल्या शिवसेना- भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मात्र नगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच रंगण्याची शक्यता निर्माण आहे. महायुतीत महत्वाचा पक्ष असलेल्या भाजपने नगराध्यक्ष पदावर दावा केला असून अधिकृत उमेदवारी देखील कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सुनबाई तेजश्री विश्वाज करंजुले यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समोर आले आहे. अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीकडुन अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही, मात्र भाजपने नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केली असून यंदा नगराध्यक्ष भाजपचाच होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. शहरात शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद असून अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा शिवसेनेकडून देखील झालेली नाही, अशातच बुधवारी अंबरनाथ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुक नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची बैठक पार पडली. यामध्ये भाजपमधून नगराध्यक्ष पदासाठी चार नावे इच्छुक असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यातील भाजप प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सुनबाई तेजश्री विश्वाज करंजुले यांचे नाव समोर आले आहे तर इतर नावे मात्र पक्षाने गुलदस्त्यात ठेवली आहेत, कमिटी कडुन जे नाव निश्चित होईल तो भाजपचा उमेदवार असेल अशी प्रतिक्रिया भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी दिली आहे.

  • 06 Nov 2025 04:30 PM (IST)

    06 Nov 2025 04:30 PM (IST)

    रायगडच्या मातीत फुलला हंगामाआधीच कलिंगडाचा मळा

    रायगड जिल्ह्यात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परंतु या संकटातून मार्ग काढत माणगाव तालुक्यातील काही तरुण शेतकऱ्यांनी हंगामाआधीच कलिंगडाचा मळा फुलवून एक वेगळी वाट दाखवली आहे.शेतीकडे दुर्लक्ष करून नोकरीच्या शोधात असलेले अनेक तरुण शहरांकडे धाव घेत असताना, या गावातील सुशिक्षित तरुणांनी मात्र उलट वाट धरली — त्यांनी नोकरीऐवजी शेतीचा पर्याय निवडला आणि तो यशस्वीपणे करून दाखवला.माणगाव परिसरातील तब्बल ९ एकर माळरानावर फुललेला हा कलिंगडाचा मळा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तरुण शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती, ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून कमी खर्चात चांगला उत्पन्न मिळवण्याचा प्रयोग केला आहे.“शेतीला आधुनिकतेचा आणि मेहनतीचा हात दिला, तर नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकतं”, असं मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

  • 06 Nov 2025 04:20 PM (IST)

    06 Nov 2025 04:20 PM (IST)

    जिल्ह्यातील दुकानदारांना आश्वासनाप्रमाणे ४ महिन्याचे थकित कमिशन न दिल्याने नाराजी

    जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन अद्यापही न मिळाल्याने त्यांची दिवाळी कडू झाली. आहे. यामुळे दुकानदार नाराज असून लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांसह - पुरवठा विभागाला निवेदन देण्यात येणार - असल्याची माहिती जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.

  • 06 Nov 2025 04:15 PM (IST)

    06 Nov 2025 04:15 PM (IST)

    राजद उमेदवार खेसारीलाल यादव यांच्या घरावर पालिकेची नोटीस

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता आणि राजद उमेदवार खेसारीलाल यादव यांच्या मिरा रोड येथील घरावर मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावण्यात आल्याने नवे राजकीय वादळ उठले आहे.या कारवाईमागे भाजपकडून दबाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं की, “बिहार निवडणुकीत राजद उमेदवार म्हणून उतरलेल्या खेसारीलाल यादव यांना दबावाखाली ठेवण्यासाठी भाजपने ही नोटीस काढण्यास भाग पाडले आहे.”

  • 06 Nov 2025 04:09 PM (IST)

    06 Nov 2025 04:09 PM (IST)

    उत्तनवासीयांचा दिलासा: मेट्रो डिपो रद्द, डम्पिंग ग्राउंडवरही तोडगा

    चार वर्षांपासून सुरू असलेल्या नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला यश मिळाले आहे. मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अखेर उत्तन-डोंगरी येथील मेट्रो-९ च्या डिपो योजनेला रद्दबातल ठरवले असून, तब्बल ७३३ कोटींचा ठेका रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक रहिवाशांच्या दीर्घ संघर्षाला यश मिळाले असून, हा उत्तनवासीयांचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची औपचारिक घोषणा करत नागरिकांना दिलासा दिला. त्यांनी सांगितले की, “उत्तनमध्ये आता मेट्रो कारशेड होणार नाही. स्थानिकांच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या भावना आणि पर्यावरणाच्या जपणुकीचा विचार करून सरकारने जनहिताचा निर्णय घेतला आहे.”

  • 06 Nov 2025 03:58 PM (IST)

    06 Nov 2025 03:58 PM (IST)

    मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral

    बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी (6 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. १२१ जागांसाठी मतदान सुरू आहे. बिहारमध्ये  121 विधानसभा जागांसाठी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात झाली. यामध्ये एकूण 1314 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ज्यात 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

  • 06 Nov 2025 03:51 PM (IST)

    06 Nov 2025 03:51 PM (IST)

    भारताचे ऑस्ट्रेलियासमोर168 धावांचे लक्ष्य!

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज खेळला जात आहे. गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात नाणेफेक गमाणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे लक्ष्य दिले आहे.

  • 06 Nov 2025 03:37 PM (IST)

    06 Nov 2025 03:37 PM (IST)

    मांसाहार आणि दारू सोडणार Vicky Kaushal

    ‘छवा’च्या प्रचंड यशानंतर अभिनेता विकी कौशल पुन्हा एका ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘स्त्री २’चे दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यासोबत भगवान परशुराम यांच्या जीवनावर आधारित ‘महावतार’ या भव्य चित्रपटात काम करणार आहे.

  • 06 Nov 2025 03:20 PM (IST)

    06 Nov 2025 03:20 PM (IST)

    महाराष्ट्रावर मोठे संकट येणार! पुढील 3 दिवस…; शेतकरी चिंतेत

    राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेत बदल दिसून येत होता. वातावरणातील बदलामुळे हवेत गारवा जाणवत होता. 10 तारखेनंतर राज्यात गारठा वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा थंडी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाज. राज्यात येत्या काही दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • 06 Nov 2025 03:08 PM (IST)

    06 Nov 2025 03:08 PM (IST)

    इस्तंबूल बैठकीपूर्वी पाक संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला उघड धमकी

    पाकिस्तान (Pakistan)  आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) गेल्या महिन्यात तीव्र संघर्ष झाला होता. दोन्ही देशांनी त्यांच्या सीमांवर हल्ला केल्याचा आरोप एकमेकांवर आरोप केला होता.

  • 06 Nov 2025 02:50 PM (IST)

    06 Nov 2025 02:50 PM (IST)

    धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले

    छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर अत्याचाराची घटना समोर आली. इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले, पण त्यानंतरच तीच ओळख एका महिला डॉक्टरसाठी महागात पडल्याचे समोर आले.

  • 06 Nov 2025 02:45 PM (IST)

    06 Nov 2025 02:45 PM (IST)

    यश राठोडचा रणजी ट्रॉफीमध्ये धुमाकूळ! रचला एक अनोखा विक्रम

    Yash Rathore’s performance in Ranji Trophy : २०२५-२६ रणजी करंडक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक झालकवले असून भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे. राठोडने तामिळनाडूविरुद्ध १३३ धावांची शानदार खेळी साकारली, या खेळीने केवळ संघालाच तारळे नाही तर त्याच्या कारकिर्दीची आकडेवारी देखील  वाढवली आहे.

  • 06 Nov 2025 02:40 PM (IST)

    06 Nov 2025 02:40 PM (IST)

    कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर!

    सचिन मोहिते/देवरुख: निवडणुकीचे वारे आता घोंगाऊ लागले असून राजकिय पक्षांकडुन मोर्चे बांधणी वेगाने सुरु आहे. देवरुख नगरपंचायतीवर तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदी देखील महिलाच राखीव असल्याने संगमेश्वर तालुक्यावर महिलाराज येणार आहे. मात्र गेल्या अडीच वर्षातील राजकिय उलथा पालथी पाहता यावेळी देवरुख नगरपंचायतीवर भाजपला सत्ता टिकविण्यात यश येणार कि महायुती की महाविकास आघाडीची सत्ता काबीज करणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. सत्ता परिवर्तन व्हावे अशी अनेकांची भुमिका दिसुन येत आहे.

  • 06 Nov 2025 02:36 PM (IST)

    06 Nov 2025 02:36 PM (IST)

    मज्जा म्हणून केली DNA टेस्ट अन् समोर आलं भयानक सत्य

    सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे तंत्रज्ञानाच्या काळात तर अशा अश गोष्टी समोर येतात की जाणून अनेकजण आश्चर्यात पडतात. सध्या ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्समधून अशीच एक आश्चर्यकारक घटना समोर येत आहे. एका. एका विवाहित जोडप्याच्या नात्याला धक्का बसला आहे. एका विवाहित महिलेने गंमत म्हणून DNA टेस्ट केली होती, परंतु यावंतर एक भयानक सत्य समोर आले आहे.

  • 06 Nov 2025 02:28 PM (IST)

    06 Nov 2025 02:28 PM (IST)

    ट्रीप एक कलाकार अनेक! गायक अभिजीत सावंतने शेअर केले दुबई ट्रीपचे PHOTOS

    मराठी गायक अभिजीत सावंत सध्या प्रसिद्धीच्या झोतातत आहे. तसेच नुकतेच गायकाची अनेक मराठी गाणी रिलीज झाली ज्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला अशातच अभिजीतने नुकतीच त्याची दुबई ट्रिप फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्यासोबत काही बॉलीवूड कलाकार देखील दिसत आहेत. ज्यांना पाहून चकीत झाले आहेत.

  • 06 Nov 2025 02:03 PM (IST)

    06 Nov 2025 02:03 PM (IST)

    ट्रॉली बॅगमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, पतीला सोडून गेली होती प्रियकराकडे

    गुजरात: गुजरातच्या सुरतमधून एक धक्कादायतक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका खड्ड्यात पडलेल्या ट्रॉली बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव २२ वर्षीय काजल असे आहे. ती बिहारमधील रहिवासी असल्याचे समोर आली आहे. हा प्रकरण गुजरातच्या सुरत येथील असल्याची समोर आले आहे. काजलच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. रवी शर्मा असे त्याचे नाव आहे.

  • 06 Nov 2025 01:55 PM (IST)

    06 Nov 2025 01:55 PM (IST)

    अखेर मुहुर्त लागलाच; माथेरान नेरळ मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू

    निसर्गसौंदर्याबरोबरच माथेरानची ओळख असलेली मिनीट्रेन सुरु होण्याला मुहुर्त लागला आहे. पर्यटकांची लाडकी मिनी ट्रेन आज 6 नोव्हेंबरपासून पर्यटक प्रवासी यांच्या दिमतीस आली.नेरळ माथेरान नेरळ या पहिल्या गाडीला पर्यटकांनी हाऊसफुल प्रतिसाद दिला मात्र वातानुकूलित गारेगार प्रवास करण्यासाठी जोडण्यात आलेला विस्टाडोम डब्बा मात्र पूर्णपणे रिकामा राहिला.दरम्यान,या पहिल्या प्रवासी गाडीला स्थानक प्रबंधक यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि प्रवासी वाहतूक सुरू झाली, त्याआधी रेल्वे अधिकारी कर्मचारी यांनी गाडीची भंडारा उधळून पूजाअर्चा केली.

  • 06 Nov 2025 01:45 PM (IST)

    06 Nov 2025 01:45 PM (IST)

    मतदानानंतर बोटावरची शाई पुसली का जात नाही? काय आहे यामागचं वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि कायदेशीर कारण?

    बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्याचे मतदानाला आज (6 नोव्हेंबर) सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 18 जिल्ह्यांतील 121 मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. याचदरम्यान अनेकांना प्रश्न पडतो, मतदानाच्या वेळी बोटावरची शाई पुसली का जात नाही? अशी कोणती शाई आहे ? किंवा ही शाई कुठे तयार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत…

  • 06 Nov 2025 01:25 PM (IST)

    06 Nov 2025 01:25 PM (IST)

    दिग्दर्शकाने सर्व मर्यादा ओलांडल्या, फराह खानने केला खुलासा, म्हणाली,….

    बॉलीवूड चित्रपट निर्माती फराह खानचे मजेदार व्यक्तिमत्व आणि विनोदाची अप्रतिम भावना यामुळे ती बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक बनली आहे. काजोल, ट्विंकल खन्ना आणि अनन्या पांडे यांच्याशी अलिकडेच झालेल्या संभाषणात, फराहने सेटवरील प्रेमसंबंध, पडद्यामागील क्षण आणि एका दिग्दर्शकाला बाहेर काढावे लागलेल्या वेळेसह गोड आठवणी आणि स्पष्ट किस्से सांगितले.

  • 06 Nov 2025 01:15 PM (IST)

    06 Nov 2025 01:15 PM (IST)

    अमोल मजुमदार यांनी सांगितली मजेशीर कहाणी, मोदींनाही हसू आवरले नाही; Video Viral

    महिला जागतिक क्रिकेटमध्ये देशाला अभिमानाने उंचावणाऱ्या भारताच्या स्टार महिलांनी बुधवारी (५ नोव्हेंबर २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक खास भेट घेतली. संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार देखील उपस्थित होते. संभाषणादरम्यान हरलीन देओलने एक मनोरंजक प्रश्न विचारला ज्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांना हसू आले. पंतप्रधान मोदींना तिचा प्रश्न होता, “सर, तुमची त्वचा इतकी कशी चमकते? मला तुमच्या त्वचेच्या दिनचर्येबद्दल जाणून घ्यायचे आहे.”

  • 06 Nov 2025 01:07 PM (IST)

    06 Nov 2025 01:07 PM (IST)

    तासगावमध्ये पुन्हा रंगणार राजकीय महासंग्राम; रोहित पाटील अन् संजय पाटील यांच्या गटात हाेणार घमासान

    सांगली जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या तासगावमध्ये पुन्हा एकदा सत्ता आणि प्रतिष्ठेची मोठी लढत पेटली आहे. तब्बल साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तासगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच तालुक्यातील राजकारण अक्षरशः पेटून उठले आहे. आता रणांगण सजले असून, या वेळी थेट आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्या गटांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे.

  • 06 Nov 2025 01:00 PM (IST)

    06 Nov 2025 01:00 PM (IST)

    बिहारमध्ये सकाळी ११:०० वाजेपर्यंत २७.६५% मतदान

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ११:०० वाजेपर्यंत २७.६५% मतदानाची नोंद झाली आहे. बेगुसरायमध्ये ३०.३७ टक्के, भोजपूरमध्ये २६.७६ टक्के, बक्सरमध्ये २८.०२ टक्के, दरभंगामध्ये २६.०७ टक्के, गोपाळगंजमध्ये ३०.०४ टक्के, खगरियामध्ये २८.९६ टक्के, लखीसरायमध्ये ३०.३२ टक्के, मधेपुरामध्ये २८.४६ टक्के, मुंगेरमध्ये २६.६८ टक्के, मुझफ्फरपूरमध्ये २९.६६ टक्के, नालंदामध्ये २६.८६ टक्के, पटनामध्ये २३.७१ टक्के, सहरसामध्ये २९.६८ टक्के, समस्तीपूरमध्ये २७.९२ टक्के, सारणमध्ये २८.५२ टक्के, शेखपुरामध्ये २६.०४ टक्के, सिवानमध्ये २७.०९ टक्के, वैशालीमध्ये २८.६७ टक्के मतदान झाले.

  • 06 Nov 2025 12:50 PM (IST)

    06 Nov 2025 12:50 PM (IST)

    ट्रेंड येऊ लागले आहेत... जेडीयू सदस्य भाजप आणि लोजपाला मतदान करत नाहीत असा आरजेडीचा दावा

    आरजेडीने एका ट्विटमध्ये एनडीएवर आरोप केला आहे की, "ट्रेंड उदयास येऊ लागले आहेत... अंतर्गत मतभेदांचा प्रवाह आता स्पष्ट होऊ लागला आहे. जेडीयू सदस्य भाजप आणि लोजपाला मतदान करत नाहीत. भाजप आणि लोजपा सदस्य जेडीयूला मतदान करत नाहीत. त्यांचे स्वतःचे षड्यंत्र आहेत, त्यांच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्यांचे स्वतःचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. तुम्ही या अंतर्गत कलहात आणि अंतर्गत संघर्षात तुमचे मत वाया घालवू नका."

  • 06 Nov 2025 12:40 PM (IST)

    06 Nov 2025 12:40 PM (IST)

    मतदानाचा वेग कमी करण्यासाठी मतदान केंद्रांवर वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप आरजेडीने केला आहे

    महाआघाडीशी संलग्न असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाच्या पहिल्या टप्प्यात अधूनमधून वीजपुरवठा खंडित केला जात आहे, ज्यामुळे जाणूनबुजून मतदानाचा वेग कमी होत आहे, असा आरोप आरजेडीने केला आहे. निवडणूक आयोगाने या गैरप्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • 06 Nov 2025 12:30 PM (IST)

    06 Nov 2025 12:30 PM (IST)

    बिहार विधानसभा निवडणुका... मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कसे सापडते

    निवडणूक आयोगाने मतदारांना त्यांचे नियुक्त केलेले मतदान केंद्र ऑनलाइन आणि ऑफलाइन शोधणे सोपे केले आहे. मतदार अधिकृत वेबसाइट www.nvsp.in ला भेट देऊ शकतात आणि "तुमचे जाणून घ्या" पर्यायावर क्लिक करू शकतात. EPIC क्रमांक (मतदार ओळखपत्रावर छापलेला मतदार ओळखपत्र क्रमांक) प्रविष्ट करा आणि "शोध" वर क्लिक करा. त्यानंतर वेबसाइट मतदान केंद्राचे नाव आणि स्थान, बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) चे नाव आणि संपर्क तपशील प्रदर्शित करेल.

  • 06 Nov 2025 12:20 PM (IST)

    06 Nov 2025 12:20 PM (IST)

    दिल्लीहून निवडणूक आयोगाचे निरीक्षण, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार नियंत्रण कक्षात पोहोचले

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह, निवडणूक आयोगाच्या देखरेख कक्षातून बिहार विधानसभा निवडणुकीचे निरीक्षण करत आहेत. पहिल्यांदाच, १०० टक्के मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे देखरेख करता येईल.

  • 06 Nov 2025 12:10 PM (IST)

    06 Nov 2025 12:10 PM (IST)

    १४ नोव्हेंबर रोजी कोण काय बनेल हे कळेल," तेज प्रताप यादव म्हणाले

    जनशक्ती जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महुआ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तेज प्रताप यादव म्हणाले, "जर एखाद्याला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर ते ती का जाऊ देतील? कोण काय बनेल हे १४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.

  • 06 Nov 2025 11:56 AM (IST)

    06 Nov 2025 11:56 AM (IST)

    बिहार निवडणुकीत मोठे चेहरे कोण आहेत?

    बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. ३.७५ कोटींहून अधिक मतदार तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, सम्राट चौधरी आणि मैथिली ठाकूर यांसारख्या प्रमुख नेत्यांसह १,३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
    राघोपूर ते मोकामा पर्यंत, बिहार निवडणूक लढाई अधिकृतपणे सुरू झाली आहे.

  • 06 Nov 2025 11:46 AM (IST)

    06 Nov 2025 11:46 AM (IST)

    कुशेश्वरस्थान जागा: सुघ्रैन पंचायतीत मतदानावर बहिष्कार

    दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान विधानसभा मतदारसंघातील सुघ्रैन पंचायतीत आज मतदान पूर्णपणे थांबविण्यात आले. सतत दुर्लक्ष आणि रस्त्याअभावी ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.

  • 06 Nov 2025 11:36 AM (IST)

    06 Nov 2025 11:36 AM (IST)

    सुरु झाली लगीनघाई ! अखेर सूरज चव्हाण अडकणार लग्नबंधनात

    अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केला होता. या पोस्टनंतर सूरजची बायको कोण असेल,हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले. त्यानंतर अंकिता वालावलकरसुद्धा सूरजच्या गावी गेली आणि तिने सूरजच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतलेली. अंकितानेही तिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. पण, तिचा चेहरा दाखवला नव्हता. अशातच आता अंकिताने सूरजच्या केळवणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि तिची झलक शेअर केली आहे.

  • 06 Nov 2025 11:26 AM (IST)

    06 Nov 2025 11:26 AM (IST)

    Team India A : तिलक वर्मा करणार भारतीय संघाचे नेतृत्व

    भारतीय महिला संघाचे अनेक मालिका खेळवल्या जात आहेत, पुरुषांचा टी20 संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे तर भारताचा अ संघ हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. आगामी दिवसांमध्ये भारताचे खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्मा यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऋतुराज गायकवाड यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 06 Nov 2025 11:16 AM (IST)

    06 Nov 2025 11:16 AM (IST)

    Mumbai: मुंबई विमानतळावर सीमाशुल्कची मोठी कारवाई! १३ कोटींचं ड्रग्स

    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ड्रग्स आणि परकीय चलनाचा मोठा साठा जप्त केला आहे. चार दिवसांच्या ड्युटीदरम्यान मुंबई सीमाशुल्क झोन ३ च्या अधिकाऱ्यांनी पाच मुख्य गुन्हे दाखल केले आहेत. ज्यामध्ये एकूण १३ किलोहून अधिक हायड्रोपोनिक वीड सापडले आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची एकूण किंमत साधारण १३ कोटींच्या जवळपास आहे. याशिवाय एका प्रवाशाकडून ८७ लाखांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं आहे. ही कारवाई सीमाशुक्ल विभागाने ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत कारवाई केली आहे.

  • 06 Nov 2025 11:06 AM (IST)

    06 Nov 2025 11:06 AM (IST)

    बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्याचे मतदान

    लालू यादवांचे कुटुंब मतदानासाठी पोहोचले, तेजस्वी यादव यांच्या राघोपूर मतदारसंघात आज मतदान, गायिका मैथिली ठाकूर हिच्या अलीनगर मतदारसंघातही आज होणार मतदान, 18 जिल्ह्यांतील 121 जागांसाठी आज मतदान, उर्वरित 122 जागांसाठी 11 नोव्हेंबरला मतदान, 14 नोव्हेंबरला होणार मतमोजणी

  • 06 Nov 2025 10:59 AM (IST)

    06 Nov 2025 10:59 AM (IST)

    WPL 2026 साठी खेळाडूंची रिटेन्शन यादी झाली जाहीर

    • दिल्ली कॅपिटल्स: ॲनाबेल सदरलँड, मारिझान कॅप, जेमिमाह रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, निकी प्रसाद.
    • मुंबई इंडियन्स: हरमनप्रीत कौर, नॅट सायव्हर-ब्रंट, अमनजोत कौर, जी. कमलिनी, हेली मॅथ्यूज.
    • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना, एलिस पेरी, रिचा घोष, श्रेयंका पाटील.
    • गुजरात जायंट्स: अ‍ॅशले गार्डनर, बेथ मुनी
    • यूपी वॉरियर्स: श्वेता सेहरावत
  • 06 Nov 2025 10:48 AM (IST)

    06 Nov 2025 10:48 AM (IST)

    कसे असेल क्वीन्सलँडमध्ये हवामान, वाचा सविस्तर

    दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी काहीसा दिलासा आहे: चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी पावसाचा धोका नाही. सामन्याच्या दिवशी क्वीन्सलँडमधील हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ प्रेक्षक ४० षटकांचा पूर्ण आणि रोमांचक सामना पाहण्याची अपेक्षा करू शकतात. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. मेलबर्नमध्ये हवामानामुळे काही अडथळे निर्माण झाले असले तरी, यावेळी क्वीन्सलँडमध्ये आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरेल.

  • 06 Nov 2025 10:46 AM (IST)

    06 Nov 2025 10:46 AM (IST)

    एक नवीन बिहार निर्माण करायचा प्रयत्न - तेजस्वी यादव

    मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "आपण सर्व मिळून बिहारला नंबर वन बनवायचे आहे, एक नवीन बिहार निर्माण करायचा आहे जिथे शिक्षण, औषध, उत्पन्न, सिंचन, सुनावणी आणि कृती देणारे सरकार असेल, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीपासून मुक्त सरकार असेल. आपण असे सरकार स्थापन करायला हवे जे तरुणांवर लाठीमार करणार नाही किंवा पेपर लीक करणार नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

  • 06 Nov 2025 10:39 AM (IST)

    06 Nov 2025 10:39 AM (IST)

    व्याजाच्या वादातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला

    लातूर शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. व्याजासह पैसे परत करून देखील अतिरिक्त व्याजाची मागणी पूर्ण न केल्याने एका तरुणावर तलवार, काठी आणि दगडांनी हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नाईक चौकात घडली आहे.

  • 06 Nov 2025 10:31 AM (IST)

    06 Nov 2025 10:31 AM (IST)

    ४८ तासाच्या आत फ्लाईट तिकिट रद्द केल्यास लागणार नाही चार्ज!

    जर तुम्ही वारंवार विमानाने प्रवास करत असाल आणि तुम्हाला तिकीट रद्द करावे लागले असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासा देणारी आहे. आता, विमान तिकीट रद्द करण्याचे मोठे शुल्क भरण्याचा त्रास दूर होऊ शकतो. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) एका नवीन नियमावर काम करत आहे ज्यामुळे प्रवाशांना बुकिंग केल्यानंतर ४८ तासांच्या आत कोणतेही शुल्क न घेता तिकीट रद्द करण्याची किंवा बदलण्याची परवानगी मिळेल.

  • 06 Nov 2025 10:23 AM (IST)

    06 Nov 2025 10:23 AM (IST)

    महाराष्ट्रीयन भाऊचा पुन्हा Bigg Boss 19 मध्ये कमबॅक

    सलमान खानच्या “बिग बॉस १९” या रिॲलिटी शोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. वीकेंड का वारमधून बाहेर पडल्यानंतर, एक बलाढ्य स्पर्धक पुन्हा घरात प्रवेश करणार आहे. यामुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. त्याच्या परतण्याने, या स्पर्धकाला पाहून सर्व घरातील सदस्यांना आनंद होणार आहे. त्याच्या बाहेर पडल्यापासून, प्रेक्षक त्याला खूप मिस करत आहेत. आता, तुम्ही विचार करत असाल की आपण कोणत्या स्पर्धकाबद्दल बोलत आहोत. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे शोमध्ये परतत आहे. महाराष्ट्रीयन भाऊच्या या बातमीमुळे चाहते खूप आनंदी झाले आहेत.

  • 06 Nov 2025 10:06 AM (IST)

    06 Nov 2025 10:06 AM (IST)

    टिम इंडिया अ संघाचे तिलक वर्मा करणार भारतीय संघाचे नेतृत्व

    भारतीय महिला संघाचे अनेक मालिका खेळवल्या जात आहेत, पुरुषांचा टी20 संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे तर भारताचा अ संघ हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. आगामी दिवसांमध्ये भारताचे खेळाडू हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळताना दिसणार आहेत. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्मा यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऋतुराज गायकवाड यांची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 06 Nov 2025 09:59 AM (IST)

    06 Nov 2025 09:59 AM (IST)

    बीड पोलिसांनी पुण्यात पकडला सोनार

    बीड पोलिसांनी पुण्यातून बनावट सोनाराला अटक केली आहे. बनावट सोने चांदी बँकेत गहाण ठेवून बँकेची फसवणूक केली होती. या आरोपीने अवघ्या दोन महिन्यात तब्बल अडीच कोटी रुपयांचे घबाड जमा केले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विलास उदावंत असे आहे. तो बीडमध्ये विलास ज्वेलर्स नावाने दुकान चालवत होता. झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने स्वतः १६ बनावट ग्राहक तयार केले. या ग्राहकांना बनावट सोने देऊन त्याने ते बँक ऑफ बडोदा बँकेत गहाण ठेवले.

  • 06 Nov 2025 09:51 AM (IST)

    06 Nov 2025 09:51 AM (IST)

    महायुती पालिका निवडणुका एकत्रच लढणार

    नगरपरिषद, नगरपंचायत यांसारख्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी तळागाळातील कार्यकर्ते तयार आहेत. ‘आम्ही महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याचा विचार करत आहोत’, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news crime news national news international news live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 07:58 AM

Topics:  

  • Marathi Breaking
  • Marathi News Live Updates
  • Navarashtra live Upadates

संबंधित बातम्या

Top Marathi News Today: बॅडमिंटन स्पर्धेत घालवली भारताची लाज…एकदा नाही तर दोनदा थांबवावा लागला सामना
1

Top Marathi News Today: बॅडमिंटन स्पर्धेत घालवली भारताची लाज…एकदा नाही तर दोनदा थांबवावा लागला सामना

Top Marathi News Today: विश्वचषकाचा भारतीय U19 संघाचा शुभारंभ, नाणेफेक जिंकले! आयुष म्हात्रेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
2

Top Marathi News Today: विश्वचषकाचा भारतीय U19 संघाचा शुभारंभ, नाणेफेक जिंकले! आयुष म्हात्रेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

Top Marathi News Today Live : प्रचारतोफा थंडावल्या तरीही उमेदवारांना घरोघरी जाऊन भेटी देता येणार
3

Top Marathi News Today Live : प्रचारतोफा थंडावल्या तरीही उमेदवारांना घरोघरी जाऊन भेटी देता येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.