Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम

Marathi Breaking Live Updates : इस्त्रायल-लेबनॉन युद्ध, इराण-अमेरिका युद्धासह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 06:40 PM
Top Marathi News Today Live : सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Top Marathi News Today Live : सोनम वांगचुक यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : गेल्या अनेक दिवसांपासून जागतिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून इराणवर हल्ला केला जात आहे. तर दुसरीकडे इस्त्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांतही युद्ध सुरु होते. असे असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. इस्त्रायल-लेबनॉन यांच्यातही अखेर युद्धविराम झाला असून, दोन्ही देशांत 10 दिवसांच्या शस्त्रसंधीवर सहमती झाला असल्याची माहिती दिली जात आहे.

इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे, ज्याचे शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून स्वागत केले जात आहे. मात्र, या करारामध्ये संपूर्ण लेबनॉनचा समावेश असावा, असा हिजबुल्लाहने आग्रह धरला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांनी लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या शस्त्रसंधीला सहमती दर्शवली आहे. लेबनॉनसोबत शांततेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आठवड्यात, शांतता कराराचा मसुदा तयार करण्याच्या उद्देशाने इस्रायल आणि लेबनॉनने वॉशिंग्टनमध्ये थेट चर्चा केली.

The liveblog has ended.
  • 17 Apr 2026 06:39 PM (IST)

    17 Apr 2026 06:39 PM (IST)

    मुंबईत होणार देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; ‘या’ प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर

    मुंबई: म्हाडा मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे (Master Plan) अनावरण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी १४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प C & D A म्हणजेच बांधकाम व विकास संस्थेतर्फे अदाणी समूहामार्फत साकारण्यात येत असून, देशातील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरतो. सदर प्रकल्प मुंबईच्या नियोजनबद्ध, आधुनिक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

  • 17 Apr 2026 06:34 PM (IST)

    17 Apr 2026 06:34 PM (IST)

    टॅक्स वाढवून देखील Suzuki च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! ठरली नंबर 1 बाईक

    भारतात नेहमीच प्रीमियम बाईक्सना दमदार मागणी मिळत आली आहे. या बाईक किमतीच्या बाबतीत महाग जरी असल्या तरी अनेक जण त्या खरेदी करत असतात. अशीच एक लोकप्रिय प्रीमियम बाईक म्हणजे Suzuki Hayabusa.

  • 17 Apr 2026 06:17 PM (IST)

    17 Apr 2026 06:17 PM (IST)

    मुंबईत होणार देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; ‘या’ प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर

    मुंबई: म्हाडा मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे (Master Plan) अनावरण ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी १४३ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प C & D A म्हणजेच बांधकाम व विकास संस्थेतर्फे अदाणी समूहामार्फत साकारण्यात येत असून, देशातील हा सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरतो. सदर प्रकल्प मुंबईच्या नियोजनबद्ध, आधुनिक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

  • 17 Apr 2026 06:04 PM (IST)

    17 Apr 2026 06:04 PM (IST)

    “जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूने अनेक गुपिते दफन होणार?”; अशोक खरातच्या निकटवर्तीय मृत्यू प्रकरणावर सुषमा अंधारेंचा संशय

    Jitendra Shelke Accident News: भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित, अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त लैंगिक घोटाळ्याने आता एक नाट्यमय वळण घेतले आहे ज्यामुळे पोलीस तपास यंत्रणा आणि राजकीय वर्तुळ या दोन्ही ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आणि अशोक खरात याच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चा उपाध्यक्ष असलेला जितेंद्र शेळके याचा, शुक्रवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला.

  • 17 Apr 2026 05:45 PM (IST)

    17 Apr 2026 05:45 PM (IST)

    अशोक खरातच्या निकटवर्तीय मृत्यू प्रकरणावर सुषमा अंधारेंचा संशय

    भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित, अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त लैंगिक घोटाळ्याने आता एक नाट्यमय वळण घेतले आहे ज्यामुळे पोलीस तपास यंत्रणा आणि राजकीय वर्तुळ या दोन्ही ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घोटाळ्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आणि अशोक खरात याच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चा उपाध्यक्ष असलेला जितेंद्र शेळके याचा, शुक्रवारी समृद्धी महामार्गावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 17 Apr 2026 05:22 PM (IST)

    17 Apr 2026 05:22 PM (IST)

    पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती, विकासकामांना स्थायीची मंजुरी

    पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ही बैठक झाली. सभेला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, नगरसचिव मुकेश कोळप आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासनाशी संबंधित अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत.

  • 17 Apr 2026 05:07 PM (IST)

    17 Apr 2026 05:07 PM (IST)

    लातुरातील महिलांचा ऐतिहासिक पदयात्रेने हुंकार

    धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिसेविका वर्ग 2 च्या कर्मचारी अरुणा बराडे (पावरा) यांनी ऑर्थो ओटीच्या परिचारिका व्हिक्टोरिया सुनील पथारे यांच्याशी शिवीगाळ करत दोघ हात पिळून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका यांनी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे,अधिसेविका अरुणा भराडे यांच्यावरत्वरित कारवाई करून गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर हजर होणार नाही असे असा पवित्रा शासकीय हिरे महाविद्यालयातील परिचारिका संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

     

  • 17 Apr 2026 04:50 PM (IST)

    17 Apr 2026 04:50 PM (IST)

    पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता पूर्ण करा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेश

    शहरातील 27मोठया नाल्यांची स्वच्छता 15 मे पर्यंत व्यवस्थिरित्या पूर्ण करावी तसेच रस्त्यांच्या बाजूच्या सांडपाणी वाहिन्या आणि गावठाण झोपडपट्टी व भागातील गटारे यांचीही स्वच्छता 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावी त्याच प्रमाणे शहरात सुरू असणारे पदपथ, गटारे, रस्त्याची कामे देखील 15 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्याविषयी माहिती देताना आयुक्त म्हणाले की, पारसिक हिल-बेलापूर ते दिघा विभागातील 28 मोठे मुख्य खाडीला जोडणारे नाले आणि शहरातील 11 होल्डिंग याचे पावसाळ्याच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. मोठ्या नाल्या मधील गाळ 15 मे पर्यंत काढून झाला स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • 17 Apr 2026 04:45 PM (IST)

    17 Apr 2026 04:45 PM (IST)

    मुंदडा इंडस्ट्रीजला भीषण आग; एकजण जखमी!

    लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील मुंदडा इंडस्ट्रीजला आज दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडलीय.या घटनेत एकजण जखमी झाला असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही... दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.दरम्यान, मुंदडा इंडस्ट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा साठा बाहेर काढण्यात आला. लातूर शहरात एकीकडे गॅस सिलेंडर साठी नागरिकांच्या मोठ्यात मोठ्या रांगा लावून लावून गॅस सिलेंडरची मिळेल का नाही ही परिस्थिती असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत लातूर शहरातील अनेक व्यवसाय गॅस सिलेंडर मुळे बंद पडली असून हे सगळं बघितलं तर या सर्व प्रकरणांमध्ये लातूरचा महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा नेमकं करते तरी काय एवढा मोठा गॅस सिलेंडरचा साठा यांच्यापाशी कुठून आला याची देखील चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीचा सूर लातूरच्या नागरिकाकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

  • 17 Apr 2026 04:40 PM (IST)

    17 Apr 2026 04:40 PM (IST)

    स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांची फरफट

    तारकपूर बस स्थानकात NCMC स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. एकाच खिडकीमुळे कामाचा वेग मंदावला असून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. उन्हात उभ्या असलेल्या वृद्धांसाठी ना बसण्याची सोय, ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. प्रशासनाने तातडीने अतिरिक्त खिडकी सुरू करून मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. नागरिकांची व्यथा जाणून घेतली आहे

  • 17 Apr 2026 04:35 PM (IST)

    17 Apr 2026 04:35 PM (IST)

     अमरावती प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या परस्परविरोधी विधानांनी वाद चिघळला 

     

    अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणामुळे केवळ सामाजिक संतापच नाही, तर राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी दिलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे हा वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. .

  • 17 Apr 2026 04:30 PM (IST)

    17 Apr 2026 04:30 PM (IST)

    ४५० रुपयांसाठी महिलेचे हत्या

    नवी मुंबईतील तुर्भे येथे ५० वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपी मोहम्मद अख्तर याला एपीएमसी पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे. साडेचारशे रुपयांच्या वादातून संतापाच्या भरात आरोपीने चाकूने हल्ला करून महिलेची हत्या केल्याचे चौकशीत उघड झाले. गुन्ह्यानंतर मोबाईल बंद करून तो नेपाळमध्ये फरार झाला होता. पोलिसांनी सापळा रचत झापा जिल्ह्यातून त्याला अटक करून नवी मुंबईत आणले आहे.

  • 17 Apr 2026 04:25 PM (IST)

    17 Apr 2026 04:25 PM (IST)

    काम करा नाहीतर पदे जाणार! सांगलीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना जानकरांचा सज्जड दम

    शिवसैनिकाच्या केसाला यापुढे धक्का जरी लागला तरी याद राखा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असा इशारा शिवसेनेचे सांगली जिल्हा संपर्कप्रमुख योगेश जानकर यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेत यापुढे गटबाजी चालू दिली जाणार नाही, शिवाय जे शिवसैनिक पक्ष संघटनेचे योग्य प्रकारे काम करतील त्यांना यापुढे पदं मिळतील, जे काम जे कार्यकर्ते पक्षाचे काम व्यवस्थितपणे करणार नाही त्यांची फरक काढून घेणार असल्याचा इशाराही योगेश जानकर यांनी दिला . मिरज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना मिरज विधानसभा बूथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मध्ये योगेश जानकर हे बोलत होते.भाजप, राष्ट्रवादी हे आपले मित्र पक्ष आपल्याला विचारत नाहीत. त्यामुळे त्यांना आपली ताकद दाखवा. ज्यांना भारतीय जनता पक्षात जायची इच्छा नाही, त्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत घ्या, असे आवाहन ही योगेश जानकर यांनी यावेळी केले.

  • 17 Apr 2026 04:20 PM (IST)

    17 Apr 2026 04:20 PM (IST)

    पाईपलाईन फुटल्याने पाटणमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर

    पाटण शहरात रस्त्याच्या कामादरम्यान मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून काम कासवगतीने सुरू असून प्रशासनातील असमन्वयामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोयना धरण जवळ असूनही पाटणकरांना टँकरमागे धावावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • 17 Apr 2026 04:15 PM (IST)

    17 Apr 2026 04:15 PM (IST)

    Jalgaon : परीसिमना नंतर जळगाव जिल्ह्यात होणार इतके आमदार ?

    2019 मध्ये परीसिमन (मतदार संघ पुनर्रचना) होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांची संख्या वाढणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यातील सध्या असलेली अकरा आमदारांची संख्या 16 पर्यंत वाढेल. तसेच आणखी एक खासदार वाढणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी वाढत्या तापमानाबाबत देखील त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

  • 17 Apr 2026 04:10 PM (IST)

    17 Apr 2026 04:10 PM (IST)

    Hindustan Unilever Limited कंपनीच्या उत्पादनाच्या किमतीत वाढ

    घरगुती खर्च आधीच वाढलेला असताना आता मध्यमवर्गीयांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमती वाढल्यानंतर आता बाथरूममधील वस्तूही महागल्या आहेत. देशातील आघाडीची एफएमसीजी कंपनी Hindustan Unilever Limited ने साबण आणि शॅम्पूच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने साबणाच्या किमतीत ३ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे, तर शॅम्पूच्या दरात ४ ते ६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आधीच डाळी, मसाले, तेल, मीठ आणि पीठ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आता रोजच्या वापरातील साबण आणि शॅम्पू महाग झाल्याने सामान्य नागरिकांच्या बजेटवर ताण वाढणार आहे. महागाईचा आता केवळ किचनपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर बाथरूमपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना आता घरगुती खर्चाचा ताळमेळ बसवताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात इतर एफएमसीजी कंपन्याही किमती वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महागाईचा हा ताण आणखी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 17 Apr 2026 04:05 PM (IST)

    17 Apr 2026 04:05 PM (IST)

    भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य

    मिरा-भाईंदर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपच्या 50 हून अधिक नगरसेवकांनी भाईंदरमधील नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत आंदोलन केले.मागील काही दिवसांपासून आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद चिघळला असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर हा वाद आता समाजमाध्यमांवरही पोहोचला असून समर्थकांमध्ये तीव्र शब्दयुद्ध रंगले आहे.

  • 17 Apr 2026 03:57 PM (IST)

    17 Apr 2026 03:57 PM (IST)

    बुलढाण्यात शॉर्ट सर्किटमुळे बोरजवळा येथे शेतात आग

    खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे शेतकरी बाळू झेलबा तोमर यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मका पीक, स्प्रिंकलर पाईप व ठिबक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून महावितरणकडून तात्काळ मदतीची मागणी करण्यात आलीये.

  • 17 Apr 2026 03:46 PM (IST)

    17 Apr 2026 03:46 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या गॅस पंपावर रांगा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या रांगा गॅस पंपावर दिसू लागल्या आहेत. रिक्षा चालकांना गॅससाठी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत. 61 रुपये किलो असलेला गॅस आता थेट 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गॅस मिळवण्यासाठी एक दिवस आधीपासून रांगेत उभं राहावं लागत असल्याने रिक्षाचालकांचा रोजगार ठप्प झालाय.

  • 17 Apr 2026 03:35 PM (IST)

    17 Apr 2026 03:35 PM (IST)

    यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

    यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तेंडोळी परिसरात शेतातील सिंचनासाठी बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरखालील डिस्ट्रिब्युशन बॉक्सला लागलेली आग ही कडक उन्हामुळे बॉक्समधील वायरिंग आणि उपकरणे अतिउष्ण झाल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात तापमान 43.8 अंशांपर्यंत पोहोचल्याने वीज यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर ट्रान्सफॉर्मरखालील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आणि बॉक्स पूर्णतः जळून खाक झाला.

  • 17 Apr 2026 03:23 PM (IST)

    17 Apr 2026 03:23 PM (IST)

    अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

    भोंदू अशोक खरात ज्या ठिकाणी गैरप्रकार करत होता, त्या ठिकाणी आता ईडीकडून कागदपत्रांची छाननी सुरू आहे. ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स’ या नावाने त्याचे कार्यालय चालत होते. या कार्यालयातून काही जमिनी व मालमत्तांच्या व्यवहार झाल्याची माहिती समोर आली असून, या कार्यालयात ईडीकडून तपास सुरू आहे.

  • 17 Apr 2026 03:15 PM (IST)

    17 Apr 2026 03:15 PM (IST)

    बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

    लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम येथील पथकाने मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात धडक कारवाई करून सहाय्यक महसूल अधिकारी केलास भगवान मुर्खुटे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. तक्रारदाराच्या जमिनीच्या फेरफार प्रकरणातील आदेशाची प्रत देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने लाच मागितल्याचे समोर आले आहे.

  • 17 Apr 2026 02:57 PM (IST)

    17 Apr 2026 02:57 PM (IST)

    धाराशिवमध्ये तापमान 40 पार; उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासन सतर्क

    धाराशिव जिल्ह्यात तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून 18 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

  • 17 Apr 2026 02:48 PM (IST)

    17 Apr 2026 02:48 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या गॅस पंपावर रांगा

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने रिक्षाच्या रांगा गॅस पंपावर दिसू लागल्या आहेत. रिक्षा चालकांना गॅससाठी तब्बल पाच किलोमीटरपर्यंत रांगा लावाव्या लागत आहेत. 61 रुपये किलो असलेला गॅस आता थेट 120 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

  • 17 Apr 2026 02:39 PM (IST)

    17 Apr 2026 02:39 PM (IST)

    यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

    यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तेंडोळी परिसरात शेतातील सिंचनासाठी बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरखालील डिस्ट्रिब्युशन बॉक्सला लागलेली आग ही कडक उन्हामुळे बॉक्समधील वायरिंग आणि उपकरणे अतिउष्ण झाल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात तापमान 43.8 अंशांपर्यंत पोहोचल्याने वीज यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर ट्रान्सफॉर्मरखालील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आणि बॉक्स पूर्णतः जळून खाक झाला.

  • 17 Apr 2026 02:32 PM (IST)

    17 Apr 2026 02:32 PM (IST)

    वाल्मिक कराड तुरुंगातून बाहेर, रुग्णालयात दाखल

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराडची तब्येत खराब झाल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • 17 Apr 2026 02:20 PM (IST)

    17 Apr 2026 02:20 PM (IST)

    नवी मुंबईतील ऐरोलीमधील नवीन नाट्यगृहाला अचानक आग

    नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 इथल्या नवीन नाट्यगृहाला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र नाट्यगृहाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू आहे.

  • 17 Apr 2026 02:17 PM (IST)

    17 Apr 2026 02:17 PM (IST)

    महिला व बाल विकास योजनांत अहिल्यानगर आघाडीवर, बाल संगोपन योजनेत राज्यात सर्वाधिक लाभार्थी

    महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत' सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. सन 2024-24 मध्ये 7 हजार 123 लाभार्थ्यांना 19 कोटी 23 लाख 21 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले, तर सन 2025-26 मध्ये 10 हजार 111 लाभार्थ्यांना आतापर्यंत 4 कोटी 54 लाख 99 हजार 500 रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली.

  • 17 Apr 2026 01:40 PM (IST)

    17 Apr 2026 01:40 PM (IST)

    सुषमा अंधारेंनी अभिनेत्री प्राजक्ता माळीला धरले धारेवर; “महिला अत्याचारावर ब्र शब्द नाही अन्…

    मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री आणि लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा राजकीय नेत्यांची टीका आणि कार्यक्रमांमुळे चर्चेत असलेली प्राजक्ता माळी ही एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांचा आदर्श करण्यामध्ये अग्रस्थानी असल्याचे म्हणत स्तुतीसुमने उधळली. मात्र यावरुन ती विरोधकांच्या निशाण्यावर आली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) निशाणा साधला आहे.

  • 17 Apr 2026 01:35 PM (IST)

    17 Apr 2026 01:35 PM (IST)

    नाशिक टीसीएस प्रकरणात मोठा कट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    "नाशिकमधील हे प्रकरण खूप गंभीर आहे. याच्यावर आम्ही कठोर कारवाई करतोय. टीसीएसमधील प्रकरण हा एका कटाचा भाग आहे. कंपनीने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची टीसीएसची भूमिका आहे. या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत गेलेत याचा आम्ही तपास करु. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली असून आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदत घेतली जाईल," असं मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 17 Apr 2026 01:35 PM (IST)

    17 Apr 2026 01:35 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा

    मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे.

  • 17 Apr 2026 01:25 PM (IST)

    17 Apr 2026 01:25 PM (IST)

    TCS नाशिक प्रकरणात मोठा खुलासा; मास्टरमाइंड निदा खान गर्भवती, अटकेपासून बचावासाठी नवा डाव

    नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. टीसीएस नाशिक प्रकरणाची सूत्रधार मानल्या जाणाऱ्या निदा खानने तुरुंगवास टाळण्यासाठी एका नवीन डावपेचाचा अवलंब केला आहे.निदा खान कंपनीची एचआर मॅनेजर होती, परंतु तिच्या कुटुंबीयांचा दावा आहे की ती एचआर प्रमुख नव्हती; ती कंपनीत एक टेलिमार्केटर होती. तथापि, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) च्या नाशिक युनिटमध्ये तिच्यावर सक्तीचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे. तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की निदा खान गरोदर असून मुंबईत आहे.

  • 17 Apr 2026 01:20 PM (IST)

    17 Apr 2026 01:20 PM (IST)

    “Akshay Kumarच्या ‘Bhoot Bangla’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, पेड प्रिव्ह्यूमुळे कोट्यवधींची कमाई

    बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या लयीत परतला आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट, ‘भूत बंगला’, ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. चित्रपटाने त्याच्या पेड प्रिव्ह्यूजमधील अपेक्षांना मागे टाकले आहे. अक्षय आणि प्रियदर्शनच्या जोडीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा पडद्यावर जादू घडते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट दीर्घकाळ यशस्वी ठरेल असे दिसते.

  • 17 Apr 2026 01:15 PM (IST)

    17 Apr 2026 01:15 PM (IST)

    तारकपूर स्थानकात सवलतीचा ‘स्मार्ट’ छळ; ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट, १५ दिवसांची प्रतीक्षा

    राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळवून देणारे ‘NCMC स्मार्ट कार्ड‘ सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मनस्तापाचे कार्ड ठरत आहे. अहिल्यानगरमधील तारकपूर बस स्थानकात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ७०-८० वयोगटातील वृद्धांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. ना पिण्यासाठी पाणी, ना बसण्यासाठी जागा; अशा भीषण अवस्थेत आपल्या हक्काच्या सवलतीसाठी या ज्येष्ठांना ‘भीक’ मागितल्यासारखी वागणूक मिळत असल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.

  • 17 Apr 2026 01:10 PM (IST)

    17 Apr 2026 01:10 PM (IST)

    “BJP ने काही भुंकणारी कुत्री पाळली आहेत…: MP संजय राऊतांचे निशिकांत दुबेंवर टीकास्त्र

    संसदेमध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यासंबंधित विधेयक सादर करण्यात आले आहे. यावर चर्चा करण्यासाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. मात्र यावरुन जोरदार राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांनी महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांवर निशाणा साधला. त्यांनी संसदेमध्ये आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ब्रिजभूषण सिंह आणि कुलदीप सेंगर यांचा उल्लेख केला. यामुळे दुबेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. यावर भाजपने काही भुंकणारी कुत्री पाळली असल्याचे म्हणत खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) निशाणा साधला आहे.

  • 17 Apr 2026 01:05 PM (IST)

    17 Apr 2026 01:05 PM (IST)

    शहा महिला महाविद्यालयात ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’; विद्यार्थिनींना शिक्षणासोबत करिअरची नवी संधी

    सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित मणिबेन एम.पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयात तृतीय वर्षांतील विद्यार्थिनीना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षण (ऑन द जॉब ट्रेनिंग) या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा मिळत आहे. अनेक विद्यार्थिनींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना उत्कृष्ट नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. शैक्षणिक ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. या व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे महाविद्यालयाने विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच जगण्याला मोठा आधार मिळवून दिल्याने विद्यार्थिनों बरोबरच पालकांनीदेखील आनंद व्यक्त केला आहे.

  • 17 Apr 2026 01:03 PM (IST)

    17 Apr 2026 01:03 PM (IST)

    नसीम खान यांचा इशारा

    मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदवली मतदारसंघात EVM मध्ये घोटळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. सुनावणीत उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिले आहेत. दिनांक १६ व १७ एप्रिलला यातील काही मशीनची तपासणी बोरीवली येथे सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नसीम खान प्रसार माध्यमांशी बोलत होते. नसीम खान पुढे म्हणाले की, न्यायालयाने डेटा सहित तपासणी करण्याचा आदेश दिला होता, तो पाळण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहे. निवडणूक आयोगाची SOP सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांना हरताळ फासणारी आहे. CU, BU, VVPAT फक्त जोडणी करून दाखवली. त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे.

  • 17 Apr 2026 12:50 PM (IST)

    17 Apr 2026 12:50 PM (IST)

    एका बुक्कीत पत्नीचे नाक केले फ्रॅक्चर

    दोघांच्या नावावर असलेल्या फ्लॅटची विक्री करण्याबाबत कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यास पत्नीने नकार दिल्यानंतर त्याचा राग आल्याने पतीने जोरात ठोसा मारून पत्नीच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ४७ वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी १५ एप्रिल रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

  • 17 Apr 2026 12:38 PM (IST)

    17 Apr 2026 12:38 PM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे वाटप

    पुणे जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप करण्यात आले असून, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदी मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांची तर कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी गुरुवारी विशेष सर्वसाधारण सभेत सहा विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप जाहीर केले. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन तसेच शिक्षण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही सभापतींना प्रत्येकी दोन समित्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे, तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी हवेली तालुक्यातील जितेंद्र बडेकर यांची निवड झाली होती. तसेच अध्यक्षपदी दौंड तालुक्यातील वीरधवल जगदाळे आणि उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे-पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवारपर्यंत बिनखात्याचे असलेल्या पदाधिकाऱ्यांना आता अधिकृतपणे विषय समित्यांचे वाटप करण्यात आले.

  • 17 Apr 2026 12:25 PM (IST)

    17 Apr 2026 12:25 PM (IST)

    पैशांसाठी सासरच्यांकडून छळ

    माहेरहून पैसे आणण्याचा तगादा तसेच सतत टोचून बोलणे ऐकून आणि शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नबिला शहबाज खान (वय २२, रा. उंड्री) अशी आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती शहबाज जफर खान (वय २५, रा. गगन त्रिशा सोसायटी, उंड्री) याला अटक केली आहे. याबाबत नबिला यांच्या भावाने काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  • 17 Apr 2026 12:12 PM (IST)

    17 Apr 2026 12:12 PM (IST)

    राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट

    कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून, त्यांना काहीही मदत केली नाही. ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा फटका कोकणातील शेतकऱ्यांना बसल्याने ते हवालदिल झाले आहेत, त्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. शेतकरी जगला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका असून कोकणच्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन कोकणातील शेतकऱ्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

  • 17 Apr 2026 12:01 PM (IST)

    17 Apr 2026 12:01 PM (IST)

    तानाजी सावंतांना पुतण्याचे आव्हान, मतदारसंघात लागले बॅनर

    माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे ‘भावी आमदार’ असे बॅनर झळकले आहेत. धनंजय सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धनंजय यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी आमदार म्हणून बॅनरबाजी केली. नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुकीत काकांपासून फारकत घेत धनंजय सावंत अपक्ष सदस्य म्हणून निवडून आले होते.

  • 17 Apr 2026 11:53 AM (IST)

    17 Apr 2026 11:53 AM (IST)

    भाजप नेत्यांसह सात जणांवर गुन्हा

    शेतात घुसून जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजप नेते, माजी नगरसेवक शिवाजी चुंबळे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 17 Apr 2026 11:48 AM (IST)

    17 Apr 2026 11:48 AM (IST)

    सुनेत्रावहिनीं घेतले सिद्धेश्वरांचे दर्शन

    बारामतीची पोट निवडणूक सुरू आहे उपमुख्यमंत्री सुनीता पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी बारामतीचे ग्रामदेवता सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

  • 17 Apr 2026 11:39 AM (IST)

    17 Apr 2026 11:39 AM (IST)

    अमली पदार्थाविरोधात धुळ्यात मोठी कारवाई

    अमली पदार्थाविरोधात धुळ्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलिस दलाने विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले 7 कोटी 47 लाख रुपयांचे अमली पदार्थ शिरपूर पोलिस ठाण्यामागे पुरून नष्ट केले

  • 17 Apr 2026 10:55 AM (IST)

    17 Apr 2026 10:55 AM (IST)

    वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले

    वानखेडे स्टेडियमवर एक असा IPL सामना खेळला गेला, ज्याने उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीमारेषेवर एक अशक्यप्राय झेल घेऊन हार्दिक पांड्याला बाद केले, तेव्हा सामन्यात एक वेगळीच ऊर्जा संचारली. अनुभवी खेळाडूंची चमक आणि नवोदित खेळाडूंचा उदय यांच्यामुळे हा सामना विक्रम आणि अतुलनीय खेळीचा संगम ठरला. प्रथम फलंदाजी करताना, क्विंटन डी कॉकच्या नाबाद ११२ धावा आणि नमन धीरच्या ५० धावांच्या जोरावर मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून १९५ धावा केल्या.

  • 17 Apr 2026 10:45 AM (IST)

    17 Apr 2026 10:45 AM (IST)

    डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! 50MP कॅमेऱ्यासह Oppo चा तगडा स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या

    Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने भारतात त्यांच्या F सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये एक मोठा धमाका करत नवीन Oppo F33 Pro 5G लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन हँडसेट स्टँडर्ड Oppo F33 5G सह लाँच केला आहे. देशातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या ऑनलाईन स्टोअरवरून ग्राहक हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. तीन कलर ऑप्शन आणि दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये पावरफुल प्रोसेसर आणि तगडी बॅटरी दिली आहे.

  • 17 Apr 2026 10:35 AM (IST)

    17 Apr 2026 10:35 AM (IST)

    चक्र फिरवा आणि जिंका बंपर डिस्काउंट! नव्या Mystery Shop मध्ये काय खास? जाणून घ्या

    फ्री फायर मॅक्समध्ये मिस्ट्री शॉप नावाचा एक नवीन इव्हेंट लाईव्ह झाला आहे. या नव्या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना अनेक रिवॉर्ड्स मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या प्लेयर्सना गेममध्ये नवीन गेमिंग रिवॉर्ड्स जिंकण्याची इच्छा आहे असे प्लेअर्स या इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकतात. या इव्हेंटमध्ये तुम्हाला मोनो चार्म बंडल आणि पारांग मोनो एनिग्मा सारखे गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे.

  • 17 Apr 2026 10:25 AM (IST)

    17 Apr 2026 10:25 AM (IST)

    मोदी माझे बेस्ट फ्रेंड! ट्रम्पच्या एका कॉलने क्षणात बदलले चित्र; संवादानंतर ‘या’ मोठ्या

    जागतिक तणावाच्या वातावरणात एक मोठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यात मंगळवारी सुमारे ४० मिनिटे प्रदीर्घ दूरध्वनी संवाद झाला. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धानंतरचा हा या दोन महाशक्तींच्या नेत्यांमधील दुसरा संवाद आहे. या संवादाने केवळ भारत आणि अमेरिकेचे संबंध अधोरेखित केले नाहीत, तर पश्चिम आशियातील युद्धाला पूर्णविराम मिळण्याचे संकेतही दिले आहेत.

  • 17 Apr 2026 10:15 AM (IST)

    17 Apr 2026 10:15 AM (IST)

    AI चॅटबोट अचानक झाले डाऊन, यूजर्सच्या समस्या वाढल्या! कामं झाली ठप्प

    टेक कंपनी ओपनएआयच्या मालकीचे एआय चॅटबोट ChatGPT अचानक डाऊन झाले आहे. 17 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास यूजर्सना चॅटजीपीटीचा वापर करण्यात समस्या येऊ लागल्या आहेत. मेसेज पाठवण्यात, प्रॉम्प्ट किंवा ईमेज क्रिएट करण्यात आणि रिफ्रेश करताना यूजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांची कामं देखील ठप्प झाली आहेत. कारण सध्याच्या काळात अशी अनेक लोकं आहेत ज्यांची बरीच कामं चॅटजीपीटीवर अवलंबून आहेत. मात्र चॅटजीपीटी अचानक डाऊन झाल्याने यूजर्स वैतागले आहेत.

Web Title: Marathi breaking live updates marathi top news international news national news crime news live updates 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • navarashtra breaking news
  • Navarashtra Live Updates

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.