
सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरभरती करताना सत्ताधारी आमदारांनी केलेल्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकणे मंत्री निलेश काब्राल (Nilesh Kabral) यांना भोवले आहे. कालपर्यंत पक्षश्रेष्ठींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला राजीनामा दिल्याची सूचना केली नाही.
पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरभरती करताना सत्ताधारी आमदारांनी केलेल्या शिफारशी केराच्या टोपलीत टाकणे मंत्री निलेश काब्राल (Nilesh Cabral) यांना भोवले आहे. कालपर्यंत पक्षश्रेष्ठींनी किंवा मुख्यमंत्र्यांनी आपल्याला राजीनामा दिल्याची सूचना केली नाही, असे म्हणत मंत्रिपद वाचवण्याची धडपड करणाऱ्या कानाल यांना अखेर रविवारी बिनशर्त आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करावा लागला आहे.
याबाबत निलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. काब्राल यांचा राजीनामा मी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींनी दिला होता, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. दरम्यान, काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर आता राजभवनाच्या जुन्या दरबार सभागृहात एका साध्या समारंभात नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
दबाव आणल्याचा आरोप
आरोप कायमस्वरूपी नसतात. ज्यांनी आरोप केलेत त्यांनी ते ते सिद्ध करावेत. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचाही राजीनामा देईन. विधानसभेत आताही कुणी टीका केली तर मी बोलेनच. एनडीजीआरएस मी सर्वात आधी सुरू केले. अनेक गोष्टी मी सुरू केल्या आहेत.