फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला शुभ मानले जाते. याव्यतिरिक्त बुध ग्रहाला राजकुमार, बुद्धी, शिक्षा, व्यापार आणि तर्क वितर्क यांचा कारक ग्रह मानला जातो. बुध असा ग्रह आहे जो लवकर संक्रमण करतो आणि हा ग्रह एका राशीमध्ये १५ दिवस राहतो त्यानंतर राशी परिवर्तन करतो. बुधाच्या राशी परिवर्तनावेळी सर्व राशीन एक महिना त्याचे शुभ परिणाम मिळतात. आता बुध ग्रह चंद्राची रास कर्क राशीत बृहस्पति ग्रहासोबत उपस्थित आहे. तो ७ जुलैला बुध परिवर्तन करताना मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तो २२ जुलैपर्यंत याच राशीत राहील. पंचांगानुसार बुध मंगळवार, ७ जुलै रोजी सकाळी १०.३२ मिनिटांनी मिथुन राशीत संक्रमण करेल आणि ५ ऑगस्टपर्यंत याच राशीत राहील. त्यानंतर पुन्हा कर्क राशीत प्रवेश करेल. बुध संक्रमणाचा सर्वांत जास्त फायदा कोणत्या राशींना होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या कुंडलीत बुध ग्रह तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे. ७ जुलैला मिथुन राशीत संक्रमण केल्याने त्याचा तिसऱ्या स्थानावर प्रभाव पडेल. अशावेळी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करणे टाळा. आर्थिक स्थिती चांगली राहील ज्यामुळे तुमचा बॅंक बॅलेन्स वाढण्यास मदत होईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह पहिल्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे आणि मिथुन राशीतील संक्रमण पहिल्या घरात होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळ तुमच्यासाठी चांगला राहील आणि या काळात चांगली बातमी मिळू शकते. या संक्रमणामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो आणि मान सन्मान मिळू शकतो. यावेळी तुम्हाला आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध हा तुमच्या कर्म घरांचा स्वामी आहे. ७ जुलै रोजी बुध तुमच्या दहाव्या घरात संक्रमण करेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात नवनवीन कल्पना राबवण्याची व काहीतरी नवीन साध्य करण्याची संधी मिळेल. व्यवसायात असलेल्यांना एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार मिळू शकतो. हे बुधाचे भ्रमण तुमच्या कामात यश आणेल आणि व्यवसायात असंख्य संधी उपलब्ध करून देईल.
धनु राशीसाठी बुध तुमच्या कुंडलीतील सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी आहे. बुधाचे गोचर तुमच्यासाठी काही सकारात्मक परिणाम आणू शकते. या काळात, तुम्हाला अतिरिक्त उत्पन्नाच्या भरपूर संधी मिळू शकतात. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात वैवाहिक जीवनात लक्षणीय सुधारणा होईल आणि काही चांगल्या व फायदेशीर संधी निर्माण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध ग्रहाचे मिथुन राशीतील संक्रमण मंगळवार, 7 जुलै रोजी होणार आहे
Ans: मिथुन ही बुध ग्रहाची स्वगृही रास मानली जाते. त्यामुळे या राशीत बुध अधिक प्रभावीपणे शुभ फळ देते, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.
Ans: बुधाच्या संक्रमणाचा मेष, मिथुन, कन्या आणि धनु राशींच्या लोकांना फायदा होणार आहे






