Photo Credit- Social Media कर्जत जामखेड नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल
मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये आपचा दारुण पराभव झाला आहे. 27 वर्षांनंतर भाजपला दिल्ली काबीज करण्यामध्ये यश मिळाले आहे. यामुळे दिल्लीसह संपूर्ण देशभरातून भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसून येत आहे. दिल्लीच्या 70 जागांचा निकाल हाती आला आहे. यामध्ये 22 जागांवर आपला तर 47 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. यामुळे दिल्लीमध्ये कमळ फुलले आहे. यावर आता महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर खास पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये आप व कॉंग्रेसने वेगवेगळे न लढता एकत्र लढले पाहिजे होते असे सूचवले आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती,” असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन!
१५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती.दिल्ली…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 8, 2025
पुढे रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी,” असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन!
१५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती.दिल्ली…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 8, 2025
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
आणखी एका ट्वीटमध्ये रोहित पवारांनी लिहिले आहे की, “दिल्लीच्या जंगपुरामध्ये मनीष शिसोदिया ७०० मतांनी पराभूत झाले तर काँग्रेसच्या सुरी यांना ७३५० मते मिळाली. नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल जवळपास ३४०० मतांनी पराभूत झाले, तिथं काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना ४५०० हून अधिक मते मिळाली, कस्तुरबानगरमध्ये काँग्रेस उमेदवाराचा ११००० मतांनी पराभव झाला तर ‘आप’ला १८००० मते मिळाली. २० हून अधिक मतदारसंघात अशीच काहीशी स्थिती आहे. दोन्ही पक्षांनी समन्वय साधला नाही, परिणामी अहंकार आणि इगोमुळे दोन्ही पक्ष कळतनकळत भाजपची ‘बी टीम’ प्रमाणेच काम करून गेले, ही शोकांतिका आहे. या निकालातून धडा घेऊन INDIA आघाडीचे नेते किमान यापुढच्या निवडणुका तरी समन्वयाने लढतील का? हा खरा प्रश्न आहे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीमध्ये 70 जागांवर आपने उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळे कॉंग्रेसने देखील वेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. यामुळे इंडिया आघाडी एकत्रित असून देखील एकत्रितपणे लढली नाही. याचा फायदा भाजपला झाला असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यासारखे आपचे बडे नेते देखील हारले आहेत. यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा हा निकाल आप पक्षाला मोठा धक्का देणारा आहे.