एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांच्या 'त्या' विधानाचा घेतला समाचार; म्हणाले, 'मी लहान माणूस, पण गिरीश महाजन...' (File Photo : Eknath Khadse)
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘गिरीश महाजन हे जगविख्यात माणूस आहे. मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मला कुणी ओळखत नाही’, अशा शब्दांत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोन्ही नेत्यांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यातच एकनाथ खडसे यांनी दावाही केला होता. यामध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यापूर्वी गिरीश महाजन यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल विचारले होते, असा दावा खडसे यांनी केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वाद असल्याचेही दिसून आले.
हेदेखील वाचा : Eknath Shinde Shivsena: शिलेदारांचे कारनाम्यांमुळे एकनाथ शिंदे अडचणीत; अचानक दिल्लीत दौरा, पक्षात अस्वस्थता
तसेच, जवळजवळ चार दशके भाजपमध्ये असलेले खडसे यांचे नाव एका गैरव्यवहारात आले होते. त्यावेळी महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती सत्तेत आल्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 2014 मध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
दरम्यान, भाजप सोडल्यानंतर राष्ट्रवादीत सामील झाले आणि त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले. 2023 मध्ये पक्ष फुटल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (शरद पवार) राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे कोण, असं विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार खडसेंनी घेतला. ते म्हणाले, ‘गिरीश महाजन एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. जगविख्यात माणूस गिरीश महाजन आहे. मी एक लहान माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मला कुणी ओळखत नाही.
हेदेखील वाचा : शिंदे दिल्लीला का गेले हे पक्षाच्या माध्यमातून स्पष्ट…; उदय सामंतांनी दिले टीकाकारांना सडेतोड उत्तर