नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपला अपेक्षित असे यश मिळाले नाही. तर काँग्रेसला चांगल्या जागा मिळाले. त्यामुळे काँग्रेसचे मनोबल अधिक भक्कम झाले आहे. त्यावरून आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एनडीए सरकार कधीही पडू शकते, असे म्हटले आहे.
सध्या संयुक्त जनता दल आणि तेलुगू देसम पक्षाच्या पाठिंब्यावर भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेवर आहे. यावरच बोलताना खर्गे म्हणाले, ‘एनडीए सरकार कधीही पडू शकते. एनडीएचे सरकार चुकून स्थापन झाले. मोदींना जनादेश नाही. हे अल्पमतातील सरकार आहे. हे सरकार कधीही पडू शकते. ते चालू राहावे अशी आमची इच्छा आहे. हे देशासाठी चांगलेच असावे. देश मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. पण आपल्या पंतप्रधानांना काहीही न होऊ देण्याची सवय आहे. पण देश मजबूत करण्यासाठी आम्ही सहकार्य करू.
दरम्यान, खर्गे यांच्या वक्तव्यावर राजदचे प्रवक्ते एजाज अहमद यांनी ‘खर्गे बरोबर आहेत. जनादेश मोदी सरकारच्या विरोधात होता. त्याला मतदारांनी स्वीकारले नाही. तरीही ते सत्तेवर आले’.
टीडीपी-जेडीयूच्या पाठिंब्यावर सरकार
एनडीए आघाडीने सरकार स्थापन केले असले तरी इंडिया आघाडीला 234 जागा जिंकण्यात यश आले. नितीशकुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीच्या पाठिंब्यावर भाजपला सरकार चालवावे लागत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.