देशात नवीन कामगार संहिता लागू! (Photo Credit - X)
कामगारांना मिळणार ‘या’ १० मोठ्या हमी
आजपासून लागू झालेल्या नवीन कामगार संहितांमुळे (New Labour Codes) देशातील कामगारांना खालील महत्त्वाच्या हमी मिळणार आहेत:
किमान वेतन: सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची (Minimum Wage) कायदेशीर हमी.
नियुक्ती पत्र: तरुणांना नोकरीच्या सुरुवातीलाच नियुक्ती पत्र (Appointment Letter) देणे बंधनकारक.
समान वेतन: महिलांना समान वेतन (Equal Pay) आणि कार्यस्थळावर सन्मानाची हमी.
सामाजिक सुरक्षा: देशभरातील ४० कोटी असंघटित आणि संघटित कामगारांना सामाजिक सुरक्षेची (Social Security) हमी.
ग्रॅच्युइटी: फिक्स टर्म एम्प्लॉईजना (Fixed Term Employees) फक्त एक वर्षानंतर ग्रॅच्युइटीची हमी.
आरोग्य तपासणी: ४० वर्षांवरील कामगारांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची (Health Check-up) हमी.
ओव्हरटाईम: निश्चित वेळेपेक्षा जास्त काम केल्यास दुप्पट वेतन (Double Pay) देण्याची हमी.
धोकादायक क्षेत्र: खदान, केमिकल युनिट्स आणि अन्य जोखमीच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कामगारांना १००% हेल्थ सिक्युरिटीची हमी.
सामाजिक न्याय: आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामगारांना सामाजिक न्याय मिळण्याची हमी.
PM मोदी म्हणाले: ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ला प्रोत्साहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बदलांवर ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
“आज, आमच्या सरकारने चार लेबर कोड लागू केले आहेत. स्वातंत्र्यानंतरचे हे सर्वात मोठे आणि प्रगतीशील कामगार-केंद्रित सुधारणांपैकी एक आहे. यामुळे आमच्या कामगारांना मोठे बळ मिळते. हे नियम कम्प्लायंस (Compliance) देखील खूप सोपे करतात आणि ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ (Ease of Doing Business) ला प्रोत्साहन देतात. हे कोड सामाजिक सुरक्षा, वेळेवर आणि पुरेसा पगार, सुरक्षित कामाची जागा आणि विशेषतः नारी शक्ती व युवा शक्तीसाठी चांगल्या संधींसाठी मजबूत पाया म्हणून काम करतील.”
PM Narendra Modi tweets, “Today, our Government has given effect to the Four Labour Codes. It is one of the most comprehensive and progressive labour-oriented reforms since Independence. It greatly empowers our workers. It also significantly simplifies compliance and promotes… pic.twitter.com/wveeLf0wAz — ANI (@ANI) November 21, 2025
केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनीही ‘X’ वर पोस्ट करत, “मोदी सरकारची हमी: प्रत्येक श्रमिकाचा सन्मान! आजपासून देशामध्ये नवीन श्रम संहिता लागू झाल्या आहेत…” असे सांगितले.
मोदी सरकार की गारंटी: हर श्रमिक का सम्मान! आज से देश में नई श्रम संहिताएं लागू हो गई हैं, जिससे मिलेगी : ✅ सभी कामगारों को समय से न्यूनतम वेतन की गारंटी
✅ युवाओं को नियुक्ति पत्र की गारंटी
✅ महिलाओं को समान वेतन और सम्मान की गारंटी
✅ 40 करोड़ श्रमिकों को सामाजिक सुरक्षा की… — Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) November 21, 2025






