नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (दि.२३) विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी (Opposition Leader Meeting) आमंत्रित करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत सर्व राजकीय पक्ष ज्यांना ईव्हीएमच्या कार्यक्षमतेबद्दल शंका आहे, अशांना आमंत्रित करण्यात आले आहे.
The meeting, which will be held at the residence of NCP chief Sharad Pawar, will have all political parties who have doubts about the efficacy of EVM.
"In the All Party Meeting convened by the EC to discuss voting through Rural EVM, some of the political parties raised the very…
— ANI (@ANI) March 22, 2023
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता राजधानी दिल्लीत विरोधकांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये ईव्हीएमच्या कार्यक्षमतेबाबत साशंकता असलेले सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपस्थित राहणार आहेत.
काही पक्षांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित
मतदान यंत्रणांवर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांची उपस्थिती असणार आहे.