मोदींच्या भाषणावर पाकिस्तानची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यामध्ये त्यांनी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. पाकिस्तानकडून आता कोणताही हल्ला झाला तर भारत शांत बसणारणही असा इशारा मोदी यांनी दिला आहे. यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला विरोध केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, “पाकिस्तान नुकत्याच झालेल्या युद्धबंदी कराराशी बांधील आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण चिथावणीखोर असल्याची टीका पाकिस्तानने केली. तसेच तणाव कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. भारताने प्रादेशिक स्थिरता आणि नागरिकांच्या कल्याणला महत्व द्यावे अशी अपेक्षा आहे.भविष्यात कोणत्याही आक्रमणाला चोख उत्तर दिले जाईल.”
मोदींनी पाकिस्तानला सुनावले
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पहालगाम हल्ल्याचा बदल घेतला आहे. त्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानला सज्जड इशारा दिला आहे. काल रात्री देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधन केले. तर आज अचानक पंतप्रधान मोदी आदमपूर एअरबेसवर दाखल झाले आणि जवानांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशाला संबोधित केले.
आदमपूर एअरबेसवरुन बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.”
PM Narendra Modi: “… तर आम्ही घरात घुसून मारणार; आदमपूर एअरबेसवरून मोदींनी पाकिस्तानला सुनावले
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले.”
“कोणत्या प्रकारची अणुहल्ल्याची धमकी भारत सहन करणार नाही. भारताची लक्ष्मण रेषा एकदम स्पष्ट आहे. पाकिस्तानने नागरी विमानांच्या मागून भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनेक एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे हल्ले परतवून लावले. आता पुन्हा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत आपल्या पद्धतीने उत्तर देईल”, असे मोदी म्हणाले.