राजीव गांधी स्मृती दिनानिमित्त पीएम मोदी आणि राहुल गांधी सोशल मीडिया पोस्ट केली आहे (फोटो - एक्स)
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज (दि.21) स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. राजीव गांधी यांची आत्मगाती बॉम्बहल्ला करुन हत्या करण्यात आली होती. आज राजीव गांधी यांची 34 वी पुण्यतिथी असून कॉंग्रेस नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांना स्मृतिदिनाबाबत अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, मी आपले माजी पंतप्रधान श्री राजीव गांधीजींना आदरांजली वाहतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
On his death anniversary today, I pay my tributes to our former Prime Minister Shri Rajiv Gandhi Ji.
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2025
त्याचबरोबर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना राहुल गांधी यांनी देखील अभिवादन करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राहुल गांधी यांनी त्यांचे वडील असलेल्या राजीव गांधी यांच्यासोबत लहानपणीचा फोटो देखील शेअर केला आहे. त्याचबरोबर स्मृतीस्थळाला अभिवादन केलेले फोटो देखील कॉंग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेअर केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडियावर राजीव गांधी यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करताना राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, बाबा, तुमच्या आठवणी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतात. “तुमची अपूर्ण स्वप्ने सत्यात उतरवण्याचा माझा संकल्प आहे – आणि मी ती नक्कीच पूर्ण करेन, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासोबत असणारा लहानपणीचा फोटो देखील शेअर केला आहे.
पापा, आपकी यादें हर कदम पर मेरा मार्गदर्शन करती हैं।
आपके अधूरे सपनों को साकार करना ही मेरा संकल्प है – और मैं इन्हें पूरा करके रहूंगा। pic.twitter.com/jwptCSo1TN
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. 21 मे 1991 रोजी त्यांची आत्मघाती बॉम्बस्फॉट करुन त्यांची हत्या करण्यात आली. तामिळनाडूतील श्रीपेरंबुदूर येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये मारेकऱ्यांसह तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि 14 जणांचा मृत्यू झाला. राजीव गांधी प्रचार सभेत भाषण देण्यासाठी असलेल्या व्यासपीठाकडे चालायला सुरुवात केली. वाटेत त्यांना अनेक शुभचिंतक, काँग्रेस कार्यकर्ते आणि शाळकरी मुलांनी हार घातली. मारेकरी कलैवनी राजरत्नम ही त्यांच्या जवळ आली आणि स्वागत केले. त्यानंतर तिने त्यांच्या पायांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकली आणि रात्री ठीक 10.10 वाजता तिच्या कपड्यांखाली असलेल्या आरडीएक्स स्फोटकांनी भरलेल्या बेल्टचा स्फोट केला. अशा प्रकारे राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली.