काँग्रेसला मोठा धक्का; 'या' माजी मंत्र्याने केला शिवसेनेत प्रवेश
पंढरपूर : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका या सर्व निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदीने लढवणार आहे. सोलापूर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉंग्रेस कमिटीचे सर्व सेलचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणूका लढवण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. यावेळी येणाऱ्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने ताकदीने लढवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसच्या वतीने मोहन जोशी हे निरीक्षक म्हणून पंढरपूर येथे आले होते. तेव्हा त्यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आगामी काळात कॉंग्रेस कार्यकर्त्याला ऊर्जा देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले जाईल. कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही मोहन जोशी यांनी दिली.
हेदेखील वाचा : नाशिक पालकमंत्रिपदासाठी चुरस आणखीनच वाढली; शिवसेना, भाजपनंतर आता राष्ट्रवादीचाही दावा
दरम्यान, या बैठकीस पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, आदित्य फत्तेपूरकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष संदीप शिंदे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करा
महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पंचायतींची निवडणूक प्रक्रिया चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशाप्रकारे, कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने देखील याबाबत महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिले आहेत.