Top world Leaders : पंतप्रधान मोदींचा जागतिक दबदबा कायम; बनले सर्वात लोकप्रिय नेते, जाणून घ्या ट्रम्प कितव्या स्थानावर?
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक स्तरावर सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांनी आपला दबदबा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कायम ठेवला आहे. असे म्हणतात एखादा नेता हा केवळ एका समाजाचा नव्हे तर संपूर्ण देशाचा, मर्गदर्शक असतो. त्याच्या निर्णयामुळे देशाचा विकास, सुरक्षितता आणि प्रगती निश्चित होते. पण या नेत्यांचे निर्णय केवळ एखाद्या देशापुर्ते मर्यादित नसतात, तर जागतिक स्तरावर देखील प्रभाव टाकतात. तसेच जागतिक घडमोडींमध्ये देखील त्यांचे नेतृत्व अत्यंत महत्वाचे असते.
दरम्यान अमेरिकन बिझनेस इंटेलिजेंस कंपनी मॉर्निग कन्सल्टने जुलै २०२५ चा ग्लोबल लिडर अप्रूवल लिडरचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींना ७५ टक्के लोकांचे समर्थन मिळाले आहे. पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहे, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यामध्ये सर्वात खाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ४ ते १० जुलै दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २० देशांच्या नेत्यांचा समावेश होता.
Loved by over a billion Indians and respected by millions across the globe, PM Narendra Modi tops the Morning Consult Global Leader Approval Tracker once again — the highest-rated and most trusted leader worldwide. Strong leadership. Global respect. Bharat is in safe hands. 🙌 pic.twitter.com/eYbtiiyjmt — Amit Malviya (@amitmalviya) July 26, 2025
तर यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर, जपानचे फिशादा, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि चेक प्रजासत्ताचे पंतप्रधान पेट्र फियाला सर्वात कमी लोकप्रिय नेते आहेत. याअध्यक्षांना केवळ १८ टक्के मते मिळाली आहे.