कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ (Karnataka Election 2023)च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारपासून (२९ एप्रिल) निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान दोन दिवसांत 6 रॅली आणि दोन रोड शो करणार आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय भाजपचे दिग्गज नेते अमित शहा, जगत प्रकाश नड्डा, राजनाथ, शिवराज सिंह चौहान आणि योगी आदित्यनाथ हे देखील कर्नाटकात रोड शो आणि रॅली काढणार आहेत.
पीएम मोदी आज शनिवारी (२९ एप्रिल) दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर पोहोचत आहेत. पंतप्रधान त्यांच्या वेळापत्रकानुसार शनिवारी सकाळी 11 वाजता हुमनाबादला पोहोचतील. त्यानंतर दुपारी 1 वाजता विजयपुरा आणि 2.45 वाजता कुडची येथे रॅलीला संबोधित करतील. या रॅलींनंतर पंतप्रधान मोदी संध्याकाळी बेंगळुरूला जातील, जिथे ते मेगा रोड शो करतील.
निवडणुकीला फक्त 10 दिवस उरले
30 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता कोलारमध्ये पंतप्रधान मोदींची जाहीर सभा आहे. यानंतर दुपारी 1.30 वाजता रामनगर जिल्ह्यातील चन्नापटना येथे रॅली काढण्यात येणार आहे. रामनगरनंतर पंतप्रधान हसनमधील बेलूर येथे जातील जेथे ते दुपारी 3.45 वाजता जनतेला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी टिपू सुलतानच्या म्हैसूर शहरात असतील. म्हैसूरमध्ये पंतप्रधान रोड शोद्वारे भाजपकडे मते मागणार आहेत.
मतदानाला अवघे १० दिवस उरले असताना कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सभा सुरू होत आहेत. अशा स्थितीत भाजपला आशा आहे की, त्यांचे हे ट्रम्प कार्ड यावेळीही निवडणूक लढत आपल्या बाजूने फिरवेल. कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.