मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन (फोटो- ट्विटर)
बिहार विधानसभेत एनडीएने मिळवले प्रचंड बहुमत
दिल्लीतील भाजप मुख्यालयात साजरा केला गेला जल्लोष
भाजप बिहारमध्ये ठरला सर्वात मोठा पक्ष
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत एनडीएने प्रचंड मोठे बहुमत प्राप्त केले आहे. एनडीने एकूण 203 जागा जिंकल्या आहेत. तर महाआघाडीला केवळ 36 जागा जिंकता आलेल्या आहेत. दरम्यान भाजप हा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 90 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
दिल्लीमध्ये भाजप मुख्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही एनडीएचे लोक जनतेचे सेवक आहोत. आम्ही आमच्या मेहनतीने जनतेचे मन जिंकतो. हे संपूर्ण बिहारने दाखवून दिले आहे. आम्ही कामांमधून जनतेचा विश्वास जिंकतो. जंगलराज, कट्टा सरकारबाबत बोलताना आरजेडी कधी विरोध करत नसे. तर कॉँग्रेसवले टीका करत असायचे. मी पुन्हा म्हणतो कट्टा सरकार पुन्हा येणार नाही.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “बिहारने 2010 नंतरचा सर्वात मोठा जनमत एनडीएला दिले आहे. मी एनडीएच्या सर्व सहयोगी पक्षांतर्फे बिहारच्या जनतेचे आभार मानतो. बिहारमध्ये एनडीएचा नाही तर लोकशाहीचा विजय झाला आहे. बिहारच्या जनतेने विकासाला, समृद्धीला मतदान केले आहे.
Speaking from the @BJP4India HQ.
https://t.co/z9kQk3U2be — Narendra Modi (@narendramodi) November 14, 2025
“बिहारमध्ये काही पक्षांनी तुष्टीकरण करत m-y फॉर्म्युला केला होता. मात्र आज जनतेने आज m-y हा खरा म्हणजेच महिला आणि युवा हा फॉर्म्युला दिला आहे. बिहारच्या जनतेने रेकॉर्ड ब्रेक मतदान केले. जनतेने जंगलराज नष्ट केले आहे. बिहारला नव्या उंचीवर नेणार. मी सर्वांना नमन करतो. मी संपूर्ण एनडीएचे आभार मानतो”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट
पुन्हा एकदा एनडीए सरकार!
बिहारमधील हा विजय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रद्धेचे, आपले नेते माननीय अमितभाई शाह यांच्या चाणक्य धोरणाचे, भाजप अध्यक्ष माननीय जे.पी. नड्डा यांचे मार्गदर्शनाचे, भाजपचे सरचिटणीस आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांचे कठोर परिश्रम आणि निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कठोर परिश्रम आणि एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कठोर परिश्रमाचे परिणाम आहे. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. बिहार, या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि प्रचंड पाठिंब्यासाठी धन्यवाद!
Bihar मध्ये ‘एनडीए’ला प्रचंड बहुमत मिळताच मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदनपर पोस्ट; म्हणाले…
देवेंद्र फडणवीसांचा जलवा
बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने बिहारचा गड राखला आहे. दरम्यान भाजपने बिहारसाठी स्टार प्रचारक घोषित केले होते. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील अनेक मतदारसंघात प्रचार केला होता.






