पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून भरला उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्री शिंदेंसह इतर 12 मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) सध्या वातावरण आहे. ही लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. यापैकी आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यातच आता वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) सध्या वातावरण आहे. ही लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होत आहे. यापैकी आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यातच आता वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

    पंतप्रधान मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून अर्ज दाखल करण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. हा उमेदवारी अर्ज केला असून, या ठिकाणी 25 मे रोजी मतदान होत आहे. या जागेवर अर्ज करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशातील 12 मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच केंद्र सरकारमधील 18 मंत्रीही याठिकाणी हजर होते.

    दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यापूर्वी वाराणसी येथील काशी कोतवाल बाबा काल भैरव मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.