पीएम नरेंद्र मोदी यांचे कानपूरमध्ये हिस्ट्री शीटर संदीप ठाकूरने स्वागत केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे (फोटो - एक्स)
लखनौ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची अतिशय काटेकोरपणे काळजी घेतली जाते. पण एक धक्कादायक बाब समोक आली आहे. पंतप्रधानांच्या स्वागताला चक्क हिस्ट्रीशीटर आल्याचे दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानपूर दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने म्हटले आहे की कानपूर विमानतळावर एक हिस्ट्रीशीटर पंतप्रधान मोदींना भेटला. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यात आहे.
भाजपच्या प्रादेशिक समन्वयक संदीप ठाकूर याच्या सोशल मीडिया पोस्टने वादाची ठिणगी पडली हे. संदीप ठाकूर यानी पंतप्रधानांचे स्वागत करतानाचा त्यांचा फोटो पोस्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कानपूरच्या दौऱ्यावर आले होते. 30 मे रोजी चकेरी विमान तळावरील हा फोटो आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या मते, संदीप ठाकूर यांच्यावर अनेक गंभीर गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. यानंतरही ते पंतप्रधानांचे स्वागत करत आहेत. सोशल मीडियावर, सपाने त्यांच्या अधिकृत हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संदीप ठाकूर असा फोटो पोस्ट केला आणि ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे लिहिले.
‘मोदीजींना गुन्हेगारांशी काहीही अडचण नाही’
समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. यामध्ये लिहिले आहे की मोदीजी जनतेची दिशाभूल करत आहेत, ते स्वतः गुन्हेगारांसोबत उभे आहेत. काँग्रेसने लिहिले- तो कानपूरचा गुन्हेगार आहे. पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा त्यांच्यासोबत उभे आहेत. याचा अर्थ असा की मोदीजींना गुन्हेगारांशी काहीही अडचण नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाने टीकास्त्र डागले आहे.
थाना बर्रा कानपुर का हिस्ट्रीशिटर, गैंगस्टर, गुंडा, हत्या और हत्या के प्रयास जैसे जघन्य मामलों में नामजद संदीप ठाकुर एयरपोर्ट पर प्रधानमंत्री मोदी जी से मिल रहा है और मिलकर तस्वीर भी पोस्ट कर रहा है। @PMOIndia @narendramodi
भाजपा सत्ता में आएगी तो अपराधियों को राजनीति से भगाएगी… pic.twitter.com/419HD3CLr8
— Samajwadi Party Media Cell (@mediacellsp) June 1, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संदीप ठाकूर हे पंतप्रधानाचे निकटवर्तीय – काँग्रेस
या प्रकरणावरुन यूपी काँग्रेसने सोशल मीडियाद्वारेही पंतप्रधानांवर निशाणा साधला. काँग्रेसने एक्सवर लिहिले की, “पंतप्रधानांसोबत उभा असलेला हा व्यक्ती संदीप ठाकूर आहे. आता त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड जाणून घ्या. तो कानपूरच्या बारा पोलिस स्टेशनचा हिस्ट्रीशीटर आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, दंगल, हल्ला आणि बेकायदेशीर शस्त्रे खरेदी-विक्री यासारख्या अनेक गंभीर कलमांखाली एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. यासोबतच, त्याच्यावर NSA (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) देखील लावण्यात आला आहे. आता पंतप्रधानांची डबल इंजिन सरकारच्या या लाडक्याशी किती जवळीक आहे ते जाणून घ्या.” असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे.
‘माननीय’ म्हणून आला तर
तसेच पुढे लिहिले आहे की, कानपूर विमानतळावर पंतप्रधानांच्या निरोपाच्या वेळी त्यांना भेटलेल्या २५ लोकांच्या यादीत त्यांचे नाव २२ व्या क्रमांकावर होते. मी तुम्हाला सांगतो की पंतप्रधानांसोबतची ही त्यांची दुसरी भेट आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की मोदीजींना गुन्हेगारांशी काहीही अडचण नाही. असो, भाजप आणि गुन्हेगार एकमेकांना पूरक आहेत. मोठ्या गुन्हेगारांचे आणि भ्रष्ट लोकांचे पाप भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले आहे, त्यांचीही पापे धुतली जातील. आणि हो.. भविष्यात तो तुमच्यामध्ये ‘माननीय’ म्हणून आला तर आश्चर्यचकित होऊ नका.
प्रधानमंत्री जी के साथ खड़ा यह शख्स संदीप ठाकुर है..
अब इसका आपराधिक रिकॉर्ड जानिए👇
👉ये कानपुर के बर्रा थाना का हिस्ट्रीशीटर है। (हिस्ट्रीशीट नीचे संलग्न है)
👉 इस पर हत्या, हत्या के प्रयास, धोखाधड़ी, बलवा, मारपीट और अवैध असलहे के खरीद-फरोख्त समेत कई गंभीर धाराओं के कुल 27… pic.twitter.com/CDzs5FmA7i
— UP Congress (@INCUttarPradesh) June 1, 2025
DSP यांनी दिले स्पष्टीकरण
सपा आणि काँग्रेसच्या राजकीय हल्ल्यानंतर हा मुद्दा गंभीर होऊ लागला, तेव्हा डीसीपी दक्षिण दीपेंद्र नाथ चौधरी यांनी एक निवेदन जारी केले. त्यांनी दावा केला की फोटो व्हायरल झाल्यानंतर संदीपच्या गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी करण्यात आली. २०१९ मध्ये संदीप ठाकूरची हिस्ट्री शीट रद्द करण्यात आल्याचे समोर आले. तथापि, हिस्ट्री शीट कशी रद्द करण्यात आली हे स्पष्ट करण्यात आले नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संदीप ठाकूर वादाच्या भोवऱ्यात
कानपूर न्यायालयाने त्याला खून प्रकरणातूनही निर्दोष मुक्त केले. त्याच्यावरील बहुतेक गुन्हेगारी खटले रद्द करण्यात आले आहेत. आता न्यायालय उघडल्यानंतर, त्याच्या गुन्हेगारी खटल्यांची सद्यस्थिती उघड होईल. संदीपच्या गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी सुरू आहे. संदीप ठाकूर हे सध्या भाजपचे प्रादेशिक समन्वयक निवडणूक आयोग आहेत. तो यापूर्वीही वादात सापडला आहे.