येणाऱ्या काळात शेअर बाजारावर दबाव राहू शकतो. जपानच्या सेंट्रल बँकेने व्याजदर वाढवले आहेत, ज्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर लक्षणीय दबाव वाढेल. १७ वर्षांनंतर, जपानच्या सेंट्रल बँकेने व्याजदर नकारात्मक दरांवरून २.५० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे जपानी ट्रेडेबल बाँडची मागणी वाढेल. जपानच्या सेंट्रल बँकेची पुढील बैठक १८ आणि १९ मार्च रोजी होणार आहे, ज्यावर शेअर बाजार बारकाईने लक्ष ठेवेल.
जपानी ट्रेझरी बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने अमेरिकन ट्रेझरी बाँडवर दबाव वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत होईल आणि तिथं महागाई वाढेल. या सर्व घडामोडींमुळे अमेरिकन शेअर बाजारावर लक्षणीय दबाव येईल. भारतीय शेअर बाजारही यातून सुटणार नाही असं तज्ज्ञाचं मत आहे. 2027च्या अखेरीस निफ्टी 50 निर्देशांक 15000 पर्यंत पोहोचू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.
पुढील दोन वर्षे शेअर बाजारासाठी फार आव्हानात्मक असतील आणि गुंतवणूकदारांना सुरक्षित मार्गांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
पेस 360 चे अमिल गोयल सांगतात की या वर्षाच्या अखेरीस निफ्टी 21000 च्या खाली येऊ शकतो. निफ्टी 50 पुढील वर्षीही घसरण सुरुच राहील. पुढच्या वर्षी तो 15000 च्या आसापास संपू शकतो.
अमिल गोयल म्हणतात, परिस्थिती सुधारेपर्यंत गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन सरकारी रोख्यांवर लक्ष केंद्रीत करावं.
हे युद्ध इतकं तीव्र झालं आहे की, सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण होऊ शकते. असं तज्ज्ञांचं मत आहे. ही घसरण किती प्रमाणात होईल हे गुंतवणूकदारांच्या भावना किंवा विक्रीच्या दबावावर अवलंबून असणार आहे. शुक्रवारीच भारतीय बाजारात या बदलाची चिन्हं दिसू लागली आहेत. त्या इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेतून काहीही निष्पन्न झालं नाही. यानंतर सेन्सेक्स 961 अंकांनी म्हणजे 1.17 टक्के आणि निफ्टी 317 अंकांनी म्हणजेच 1.25 टक्क्यांनी घसरण होऊन बंद झाला. आता गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारकडे लागून राहिले आहे.






