मुंबईतील होळी, धूलिवंदनानिमित्त बाजारपेठ गजबजली; रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह रंग बाजारात पिचकाऱ्यांना मोठी मागणी (फोटो सौजन्य-Gemini)
मुंबई : होळी आणि धुळवडीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊ ठेपला आहे. यानिमित्त शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या पिचकाऱ्या आणि रंगांनी सजल्या आहेत. यंदा शहरातील बाजारपेठांत इलेट्रिक वॉटर गन तसेच कार्टुनचे छायाचित्र असलेल्या पिचकारीची क्रेझ वाढली आहे. त्याचप्रमाणे यावर्षी नैसर्गिक रंगांना विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांसाठी कार्टूनचे छायाचित्र असलेले विविध आकारांतील पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये डोरेमॉन, स्पायडर मॅन, मिकी माऊस, डोनाल्ड डक, छोटा भीम आहे. तसेच बटनवाली पिचकारी देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये घोडा, बटरफ्लाय, बंदूक, बेडूक असे विविध प्रकार आहेत.
या पिचकाऱ्या ५०० ते १२०० रुपयांपर्यंत मिळत आहेत. तरुणाईसाठी मोठ्या प्रेशरच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच होळी निमित्त विशेष टी-शर्ट देखील बाजारात पहायला मिळत आहेत. होळी हा रंगांचा सण मानला जातो. देशभरात होळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. होळीच्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनाला सगळीकडे रंगांची उधळण केली जाते. त्यामुळे बाजारपेठा रंगीबेरंगी रंगांनी आणि पिचकाऱ्यांनी सजलेल्या दिसतात. सध्या बाजारामध्ये लहान मुलांसाठीच्या कार्टून पिचकारी ट्रेंडिंगला आहेत. मुंबईतील मार्केटमध्ये अगदी ३० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत अनेक व्हरायटीच्या पिचकारी उपलब्ध आहेत.
धुलीवंदनाला देशभरामध्ये होळीचे रंगाची दहन उधळण होईल आणि करत सर्वजण रंगांचा हा उत्सव साजरा करतील, त्यासाठी पर्यावरणपुरक, रासायनिक, खाद्य रंगांची विक्री आता जोरात सुरू आहे. पण या बदलत्या काळात लहान मुलांसाठी खास पिचकारी आणि पिचकारीचे वेगवेगळी ट्रेंड सध्या मार्केटमध्ये आलेले आहेत. या पिचकारी घेण्यासाठी चिमुकले सध्या दुकानावर गर्दी करत आहेत, अशी माहिती विक्रेते हेतल कोटक यांनी दिली.
रंगीबेरंगी पिचकाऱ्यांसह रंग बाजारात पाठीवरचा पंप, छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, सिनचॅन, बार्थी डॉल, स्पायडरमॅन, आदी पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे. या पिचकाऱ्यांची किमत ३० पासून ८०० रुपयांपर्यंत आहे. या पिचकारीला पाठीमागे असणाऱ्या टैंक मध्ये पाणी भरून किंवा रंग भरून पिचकारी मधून रंग खेळला जातो. यामध्ये एक फूट आणि २ फूट अशा स्वरूपात पिचकारी मिळतात.
मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन सुपरहिरो, अॅनिमेशन पात्रे आणि प्राण्यांच्या आकारातील पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. रंगीत आणि आकर्षक डिझाइनमुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांच्या मते, यंदा हलक्या व मजबूत प्लास्टिकपासून बनवलेल्या पिचकाऱ्यांना अधिक पसंती मिळत आहे. पालकांकडून सुरक्षिततेवर भर दिला जात असल्याने टोकदार कडा असलेल्या पिचकाऱ्यांना टाळण्यात येत आहे.
२०० रु. क्षेपणास
-२०० रु. डेंगन
-२०० रु. पाईप
१५० रु. टैंक
१२५ रु. डोरेमॉन
-१२५ रु. छोटा भीम
७० रु. बंदूक






