२०१९ मध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सीआरपीएफ जवान राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. (फोटो - सोशल मीडिया)
दिल्ली : 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामामध्ये आतंकवादी हल्ला झाला. यामध्ये भारताचे जवान शहीद झाले. 2019 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना वीरमरण आले. यामुळे भारतासाठी आजचा दिवस हा देशासाठी समर्पण देणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ आहे. भारतासाठी हा एक काळा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॉंग्रेस नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, देश नेहमीच शूर शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा ऋणी राहील. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या शूर सैनिकांना सलाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली. देश नेहमीच शूर शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा ऋणी राहील. जय हिंद.” अशा भावना प्रियांका गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, 2019 मध्ये पुलवामा येथे आपण गमावलेल्या धाडसी वीरांना श्रद्धांजली. येणाऱ्या पिढ्या त्यांचे बलिदान आणि राष्ट्राप्रती त्यांचे अढळ समर्पण कधीही विसरणार नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सोशल मीडिया पोस्ट केली आहे. राहुल गांधींनी लिहिले आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिकांना मी मनापासून अभिवादन आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. भारत त्यांचे सर्वोच्च बलिदान कधीही विसरणार नाही, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
पुलवामा आतंकी हमले में शहीद हमारे वीर जवानों को शत-शत नमन और विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं।
भारत उनका सर्वोच्च बलिदान कभी नहीं भूलेगा। pic.twitter.com/R8UIixtH3E
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2025
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही श्रद्धांजली वाहिली आणि हा हल्ला “दहशतवादाचा भ्याड कृत्य” असल्याचे वर्णन केले. अमित शाह यांनी लिहिले आहे की, “2019 मध्ये आजच्याच दिवशी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असे त्यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले. ते म्हणाले, “दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि संपूर्ण जग त्याच्या विरोधात एकजूट आहे. सर्जिकल स्ट्राईक असो किंवा एअर स्ट्राईक, मोदी सरकार दहशतवाद्यांविरुद्ध ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवून त्यांच्या पूर्णपणे नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याशिवाय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये योगी म्हणाले की, भारतमातेच्या शूर सुपुत्रांचे बलिदान आपल्याला दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याची प्रेरणा देते, अशा शब्दांत सर्व नेत्यांनी भारतीय शहीद जवानांच्या त्यागाला सलाम केला आहे.