पंतप्रधान मोदी 15 मे ला करणार मुंबईत रोड शो; महाराष्ट्रात होणार 17 वी सभा

राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी (Lok Sabha Election) मतदान होणाऱ्या मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झांझावाती दौरा होणार आहे. यात मोदी मुंबईत 15 मे रोजी रोड शो करणार असून, 17 मे रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे.

    मुंबई : राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी (Lok Sabha Election) मतदान होणाऱ्या मतदारसंघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा झांझावाती दौरा होणार आहे. यात मोदी मुंबईत 15 मे रोजी रोड शो करणार असून, 17 मे रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. निवडणूक प्रचारार्थ मोदींच्या राज्यात आजवर 16 सभा झाल्या असून, ही 17 वी सभा असणार आहे.

    मुंबईत लोकसभेच्या 6 जागा असून, तेथे विजयासाठी भाजपने ‘मेगा प्लान’ तयार केला आहे. त्यानुसार मोदी यांचा 15 मे रोजी ईशान्य मुंबईत भव्य रोड शो होणार आहे. तसेच 17 रोजी पंतप्रधानांची मुंबईत पहिली जाहीर सभा होणार आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मोदींच्या राज्यातील सभा वाढल्या आहेत.

    बांद्रा येथील एमसीए क्लबवर बुधवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, किरण पावसकर, नितीन सरदेसाई, मनीषा कायंदे यांच्यासह महायुतीमधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.