नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री किरण रिजिजू सैनिकांसोबतच्या एका भेटीचे छायाचित्र शेयर करून वादात सापडलेत. काँग्रेसने त्यांचा हा फोटो 3 वर्ष जुना असल्याचा दावा केला आहे. युवक काँग्रेसचा बी व्ही श्रीनिवास यांनी रिजीजू यांचे दोन्ही फोटो एकत्र ट्विट करत रिजीजू यांना कात्रीत पकडले आहे. 2019 च्या फोटोचा वापर करून 2022 मध्ये सुरक्षेची ग्वाही दिली जात आहे. अद्भूत घोटाळा आहे, असे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतचे एक छायाचित्र ट्विट करत तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला होता. काँग्रेसने त्यांचे हे छायाचित्र 3 वर्ष जुने असल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शनिवारी सैनिकांसोबतच्या भेटीचे एक छायाचित्र ट्विट केले. त्यात त्यांनी तवांग पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील यांगत्से क्षेत्र भारतीय लष्कराच्या बहाद्दर जवानांच्या मुबलक तैनातीमुळे आता पूर्णतः सुरक्षित आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये 9 डिसेंबर रोजी भारत-चीनच्या सैनिकांत झालेल्या चकमकीवरून राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी या प्रकरणी चीनचे सीमेलगतचे बांधकाम भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप केला. ते एका ट्विटमध्ये म्हणाले – चीन डोकलामच्या जामफेरी रिजपर्यंत बांधकाम करत आहे. यामुळे सिलीगुडी कॉरिडोरला धोका उत्पन्न होत आहे. सिलीगुडी नॉर्थ ईस्टचे प्रवेशद्वार आहे. हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक आहे. त्यामुळे मोदीजी, चीनवर केव्हा चर्चा होणार?
दुसरीकडे, भाजप अध्यक्ष जे नड्डा यांनी राहुल यांचे विधान सैनिकांचे खच्चीकरण करणारे असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींचे विधान सैनिकांचे मनोधैर्य कमकूवत करणारे आहे. त्याचा निषेध करावा तेवढे कमी आहे. भारतीय सेना शौर्य व पराक्रमाचे प्रतीक आहे. देशावर संकट येते तेव्हा भारतीय सेना प्राणपणाने देशाची सुरक्षा करते.