Rahul Gandhi (Photo Credit- X)
काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना अलाहाबाद हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना शीख समुदायाबद्दल त्यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात दाखल झालेली याचिका फेटाळून लावून हायकोर्टाने हा निर्णय दिला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर, हायकोर्टाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी निर्णय राखून ठेवला होता, जो आज, २६ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती समीर जैन यांच्या एकल खंडपीठाने सुनावला. त्यामुळे आता राहुल गांधींविरोधातील खटला वाराणसीच्या एमपी-एमएलए कोर्टात सुरू राहणार आहे.
Prayagraj, Uttar Pradesh | The Allahab d High Court has dismissed a revision petition filed by Congress MP and Leader of the Opposition in the Lok Sabha, Rahul Gandhi, challenging the order of the MP/MLA Special Court in Varanasi. The case relates to the statement made by him… — ANI (@ANI) September 26, 2025
सप्टेंबर २०२४ मध्ये राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान, त्यांनी टेक्सासच्या डल्लास, व्हर्जिनियाच्या हर्नडन आणि वॉशिंग्टन डीसीच्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये अनेक बैठका घेतल्या आणि मुलाखती दिल्या होत्या. भारतीय प्रवासी समुदायांसोबत, विद्यार्थ्यांसोबत आणि अमेरिकन खासदारांसोबत संवाद साधताना त्यांनी भारतात वाढत असलेली बेरोजगारी, आरक्षण, जात जनगणना आणि लोकशाहीवर आपले विचार व्यक्त केले होते. याचवेळी, १० सप्टेंबर २०२४ रोजी जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘भारतात शीख समुदायाच्या लोकांना पगडी आणि कडे घालण्याचे किंवा गुरुद्वारांमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य नाही.’
राहुल गांधींच्या या विधानाला भाजपने ‘देशविरोधी’ आणि भारताची प्रतिमा खराब करणारे विधान ठरवत मोठा वाद निर्माण केला होता. त्यानंतर, सारनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील तिलमापूरचे माजी ग्रामप्रमुख नागेश्वर मिश्रा यांनी २८ नोव्हेंबर २०२४ रोजी वाराणसीच्या एमपी-एमएलए कोर्टात राहुल गांधींविरोधात एक याचिका दाखल केली. कोर्टाने ती याचिका फेटाळली. त्यानंतर, २१ जुलै २०२५ रोजी नागेश्वर मिश्रा यांनी वाराणसीच्या सेशन कोर्टात राहुल गांधींविरोधात पुन्हा एक याचिका दाखल केली, जी स्वीकारण्यात आली. याचिकेला आव्हान देण्यासाठी राहुल गांधींनी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती, परंतु त्यांची याचिका कोर्टाने आज फेटाळून लावली.